|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.99° से.

कमाल तापमान : 25.79° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 47 %

वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

24.11°से. - 25.77°से.

शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.33°से. - 26.99°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.57°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.47°से. - 27.72°से.

सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.64°से.

मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.05°से. - 27.04°से.

बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यतानवी दिल्ली, २८ नोव्हेंबर – संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होणार असून, पेगासस, महागाई आणि इतर अनेक मुद्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी विधेयक सादर केले जाणार आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्षभरापासून काही संघटना आंदोलन करीत आहेत. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकर्‍यांचा लहान गट आंदोलन करीत असला तरी, सर्वंकष विकासासाठी सर्वांना सोबत घेणे ही काळाची गरज...28 Nov 2021 / No Comment / Read More »

हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरअखेरीस!

हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरअखेरीस!नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर – संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. संसदीय सूत्रांनी याबाबतचे संकेत आज शुक्रवारी दिले. २२ नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू करण्याची शिफारस संसदीय कामकाज मंत्रालयाने केंद्र सरकारकडे केली असल्याचे समजते. महिनाभर चालणार्‍या अधिवेशनाचा समारोप २३ डिसेंबरला करण्याची सूचनाही या मंत्रालयाने केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिवेशनाच्या तारखांबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. २९ नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू करण्याबाबतचा एक प्रस्तावही संसदीय कामकाज मंत्रालयाने सरकारला...23 Oct 2021 / No Comment / Read More »

मार्शल प्रकरणावरून राजकीय महाभारत

मार्शल प्रकरणावरून राजकीय महाभारतआरोप-प्रत्यारोप, वादळी घटनाक्रमाने तापले वातावरण, नवी दिल्ली, १२ ऑगस्ट – संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आज गुरुवारी मार्शल प्रकरणावरून राजकीय महाभारत झाले. यात विरोधी पक्षाने सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले, तर सरकारनेही या आरोपांना पुराव्यानिशी तेवढेच दमदार प्रत्युत्तर देत विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेतली. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांना मार्शलांनी मारहाण केल्याचा आरोप केला. मार्शलांनी विरोधी पक्षांच्या महिला खासदारांशी धक्काबुक्की केली, असेही ते म्हणाले. मात्र, सरकारने...13 Aug 2021 / No Comment / Read More »

ओबीसी आरक्षण दुरुस्ती विधेयकावर संसदेचे शिक्कामोर्तब

ओबीसी आरक्षण दुरुस्ती विधेयकावर संसदेचे शिक्कामोर्तबराज्यांना मिळाले प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार, नवी दिल्ली, ११ ऑगस्ट – आरक्षणासाठी प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्यांना देणार्‍या १२७ वी घटना दुरुस्ती विधेयकावर आज बुधवारी संसदेने शिक्कामोर्तब केले आहे. लोकसभेत मंगळवारी हे पारित करण्यात आल्यानंतर आज बुधवारी राज्यसभेतही ते बहुमताने मंजूर करण्यात आले. यामुळे महाराष्ट्र सरकारचाही ओबीसींना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभेप्रमाणेच आज राज्यसभेतही सर्व विरोधी पक्षांनी हे घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यात सरकारला संपूर्ण सहकार्य केले. विरोधात एकही...11 Aug 2021 / No Comment / Read More »

विरोधकांचा आणखी एक खोडसाळपणा

विरोधकांचा आणखी एक खोडसाळपणाराज्यसभेत पुन्हा फेकले कागद, नवी दिल्ली, ११ ऑगस्ट – मागील अधिवेशनात झालेल्या उत्कृष्ट कामकाजाला यंदाच्या पावसाळी अधिवेशनात कलंक लागला असून, विरोधकांनी आणखी एक खोडसाळपणा केला. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केलेल्या भावनिक आवाहनाचा कोणताही परिणाम विरोधकांवर झाला नाही. आज बुधवारी देखील त्यांनी कागद फाडून फेकले. या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज आज सायंकाळी अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आले. मंगळवारी निर्लज्जपणे गोंधळ घातल्यानंतर राज्यसभेत विरोधकांनी आजही मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. हौदात उतरलेल्या विरोधकांनी...11 Aug 2021 / No Comment / Read More »

१२७ वी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर

१२७ वी घटनादुरुस्ती विधेयक मंजूरआज राज्यसभेत मतदान, राज्यांना मिळणार आरक्षणाचे अधिकार, नवी दिल्ली, १० ऑगस्ट – लोकसभेत आज मंगळवारी १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने ३८६, तर विरोधात कोणत्याही सदस्याने मतदान केले नाही. एसईबीसी अर्थात् सामाजिक-आर्थिक मागास घटकात नवीन प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्यांना देणारे हे विधेयक उद्या बुधवारी राज्यसभेत सादर केले जाणार आहे. तिथे ते पारित झाल्यानंतर महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दाही सुटणार आहे. दिवसभराच्या चर्चेनंतर आज सायंकाळी लोकसभेत...11 Aug 2021 / No Comment / Read More »

ओबीसी आरक्षणाचा मार्ग सुकर होणार

ओबीसी आरक्षणाचा मार्ग सुकर होणार१२७ वे दुरुस्ती विधेयक लोकसभेत, राज्यांना मिळणार प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार, नवी दिल्ली, ९ ऑगस्ट – लोकसभेत आजही गोंधळामुळे चार वेळा कामकाज स्थगित करावे लागले. मात्र, या गोंधळात राज्यांना सामाजिक-आर्थिक मागास वर्गात प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना देणारे विधेयक सभागृहात सादर करण्यात आले. हे विधेयक पारित झाल्यानंतर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. दुपारी १२ वाजता कामकाज सुरू होताच पीठासीन सभापती राजेंद्र अग्रवाल यांनी कागदपत्र पटलावर ठेवण्याचा निर्देश दिला....9 Aug 2021 / No Comment / Read More »

स्वार्थासाठी विरोधकांनी ठप्प केले संसदेचे कामकाज

स्वार्थासाठी विरोधकांनी ठप्प केले संसदेचे कामकाजपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात, नवी दिल्ली, ५ ऑगस्ट – देशाची सर्वच क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल होत असताना विरोधी पक्षांनी स्वार्थासाठी संसदेचे कामकाज बंद पाडून स्वत:चीच नाचक्की करून घेतली आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी केली. पेगासस स्पायवेअर वाद आणि इतर मुद्यांवरून संसदेचे कामकाज ठप्प केल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका केली. एकीकडे, आपला देश विजयी गोल करीत आहे, तर दुसरीकडे, काही लोक राजकीय स्वार्थामुळे अशा काही गोष्टी करीत...5 Aug 2021 / No Comment / Read More »

तृणमूल कॉंग्रेसचे सहा सदस्य निलंबित

तृणमूल कॉंग्रेसचे सहा सदस्य निलंबितराज्यसभेत गोंधळ घालणे महागात पडले, नवी दिल्ली, ४ ऑगस्ट – पेगासस हेरगिरी प्रकरण तसेच कृषी कायद्याच्या मुद्यावर आजही राज्यसभेत गदारोळ झाला, यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. गोंधळ घालणार्‍या तृणमूल कॉंग्रेसच्या सहा सदस्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. आज सकाळी सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सर्व स्थगन प्रस्ताव फेटाळल्याची माहिती दिली. यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत घोषणाबाजी केली. या...5 Aug 2021 / No Comment / Read More »

कागदाचे तुकडे पीठासीन अध्यक्ष, मंत्र्यांच्या दिशेने भिरकावले

कागदाचे तुकडे पीठासीन अध्यक्ष, मंत्र्यांच्या दिशेने भिरकावलेलोकसभेत गदारोळ, नवी दिल्ली, २८ जुलै – पेगासस हेरगिरी प्रकरण, शेतकरी आंदोलन, महागाई तसेच अन्य मुद्यावरून आज बुधवारी लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. विरोधी सदस्यांनी शासकीय कामकाजाचे कागद फाडत त्याचे तुकडे पीठासीन अध्यक्ष आणि मंत्र्यांच्या अंगावर भिरकावले. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज अनेकवेळा स्थगित करावे लागले. आज लोकसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. आज प्रश्‍नोत्तराचा तास...29 Jul 2021 / No Comment / Read More »

संसदेत तिसर्‍या दिवशीही विरोधकांचा गोंधळ

संसदेत तिसर्‍या दिवशीही विरोधकांचा गोंधळकामकाज दिवसभरासाठी तहकूब, नवी दिल्ली, २२ जुलै – पेगासस टेलिफोन टॅपिंग प्रकरण आणि कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या मुद्यावरून राज्यसभेत, तर विविध मुद्यांवरून लोकसभेत आज गुरुवारी लागोपाठ तिसर्‍या दिवशीही विरोधकांनी गोंधळ घातल्याने संसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आज राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे निर्देश दिले. याचवेळी कॉंग्रेसचे दिग्विजयसिंह यांनी एका वृत्तपत्रसमूहाच्या देशभरातील कार्यालयांवर घालण्यात आलेल्या आयकर छाप्यांचा मुद्दा उपस्थित करण्याचा...23 Jul 2021 / No Comment / Read More »

रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीजवानांच्या खांद्यावरून वाहून नेणे शक्य, नवी दिल्ली, २१ जुलै – स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या, वजनाने अत्यंत हलक्या, मारा करा आणि विसरून जा, या तत्त्वावर आधारित रणगाडाविरोधी दिशादर्शक क्षेपणास्त्राची आज बुधवारी भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओने घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. हे क्षेपणास्त्र जवानांना खांद्यावरून वाहून नेणे शक्य आहे. क्षेपणास्त्राच्या या यशस्वी चाचणीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आत्मनिर्भर भारताला बळ मिळणार आहे तसेच लष्कराची क्षमता...21 Jul 2021 / No Comment / Read More »