|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे ग्लोबल वॉर्मिंगची गती मंदावली

ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे ग्लोबल वॉर्मिंगची गती मंदावली=नव्या अभ्यासातील निष्कर्ष= लंडन, [१३ जुलै] – ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे त्यातील काही कण वातावरणात मिसळत असतात आणि या कणांच्या प्रभावामुळे ग्लोबल वॉर्मिंगची गती मंदावली आहे, असे एका ताज्या अभ्यासात दिसून आले आहे. मोठमोठे कारखाने आणि उद्योगांमधून बाहेर पडणार्‍या वायुमुळे जगभरातील तापमानात वाढ झाली आहे. पण, ज्वालामुखींचे एरोसोल्स गेल्या दहा वर्षांपासून हे तापमान कमी करण्यासाठी नैसर्गिक छत्र म्हणून काम करीत आहे. या दहा वर्षांच्या काळात कारखाने व उद्योगांकडून निघणार्‍या वायूच्या वातावरणावर होणार्‍या...14 Jul 2015 / No Comment / Read More »

सौरवादळाची पूर्वसूचना देणारे यंत्र

सौरवादळाची पूर्वसूचना देणारे यंत्र=अनिवासी भारतीयाने विकसित केले= न्यूयॉर्क, [१३ जून] – नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत कार्यरत भारतीय वंशाचे संशोधक नील सवानी यांनी सौरवादळाची पूर्वसूचना देणारे यंत्र विकसित केले आहे. यामुळे, सौरवादळाची सूचना किमान २४ तास आधी मिळून संभाव्य नुकसान टाळणे शक्य होणार आहे. . अशाप्रकारच्या वादळांमुळे जीपीएस यंत्रणा प्रभावित होण्यासह दळणवळणाची यंत्रणा कोलमडण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर वायू उत्सर्जित झाल्याने ‘कोरोनल मास इजेक्शन’ हे चुंबकीय क्षेत्र निर्माण...14 Jun 2015 / No Comment / Read More »

तापमानात प्रचंड वाढ होणार

तापमानात प्रचंड वाढ होणार=हवामान खात्याचा इशारा= नवी दिल्ली, [२० एप्रिल] – दोन आठवड्यांपूर्वी देशाच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातल्यानंतर देशभरातच उन्हाचा कहर सुरू झाला असून, आगामी काळात तापमानात प्रचंड वाढ होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या अन्य भागात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत काही ठिकाणी तापमान ४४ ते ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये रविवारी पारा चाळीशीच्या वर पोहोचला होता....21 Apr 2015 / No Comment / Read More »

खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक

खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक=भारतीय शास्त्रज्ञांची कमाल, ऍव्हरेज २२.५ किमी= कोची, [८ फेब्रुवारी] – पेट्रोल आणि डिझेल सध्या स्वस्त होत असले, तरी हे इंधन किती काळ टिकेल याची शाश्‍वती नसल्याने भविष्याची गरज लक्षात घेऊन भारतीय शास्त्रज्ञांनी चक्क खोबरेल तेलावर मिनी ट्रक चालविण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. विशेष म्हणजे, एक लिटर खोबरेल तेलावर या मिनी ट्रकने २२.५ किमी अंतर सहजपणे कापले. तिथेच, एक लिटर डिझेलमध्ये ट्रक केवळ १६ किमी अंतर पार करू शकला. केरळच्या वैज्ञानिकांनी...10 Feb 2015 / No Comment / Read More »

इस्रोने विकसित केले अग्निरोधक आवरण

इस्रोने विकसित केले अग्निरोधक आवरणभागीदारीसाठी उद्योगाचा शोध सुरू रेल्वे डबे, इमारतींचेही रक्षण करण्याची क्षमता तिरुवनंतपुरम्, [१२ जानेवारी] – गेल्या वर्षी ‘मंगळ’ भरारी घेणार्‍या आणि मानवाला मंगळावर पाठविण्याच्या दिशेने पावले उचलणार्‍या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोने आता अतिशय कमी खर्चात अग्निरोधक आवरण विकसित केले असून, रेल्वेचे डबे आणि इमारतींचेही आगीपासून संरक्षण करण्यासाठी या आवरणाचा वापर होऊ शकणार आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर करण्यासाठी इस्रो आता योग्य अशा औद्योगिक भागीदाराचा शोध घेत आहे. प्रत्यक्षात...13 Jan 2015 / No Comment / Read More »

नैराश्यग्रस्त व्यक्तींची स्मरणशक्तीही होते दुर्बळ

नैराश्यग्रस्त व्यक्तींची स्मरणशक्तीही होते दुर्बळ=अमेरिकेच्या शास्त्रज्ञांचे संशोधन= वॉशिंग्टन, [८ जानेवारी] – मनुष्याला नेहमीच सुखद आठवणीत रमायला आवडते. पण जर माणूस दु:खी, हताश निराश असेल तर… तेव्हा स्मरणशक्तीचे काय होते? चांगल्या आणि सकारात्मक स्मृती मनाच्या तळाशी साठवत माणूस आनंदाने जगतो. स्मरणशक्ती आणि तीही शिस्तीची स्मरणशक्ती ही माणसाला मिळालेली उत्तम देणगी आहे. स्मरणशक्तीच्या भरवशावर माणसे आपली बहुतांश व्यावहारिक कामे तडीस नेत असतात. मनुष्याचे मन जेव्हा आनंदी, उत्साही, आशावादी असते, मनात जेव्हा सकारात्मक विचार असतात तेव्हा त्याला...9 Jan 2015 / No Comment / Read More »

नव्या वर्षात येणार ‘ड्रायव्हरलेस कार’

नव्या वर्षात येणार ‘ड्रायव्हरलेस कार’न्यूयॉर्क, [२५ डिसेंबर] – सरत्या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेली ‘गूगल’ची ‘ड्रायव्हरलेस’ अर्थात चालकविरहित कार नव्या वर्षात बाजारपेठेत धडकणार आहे. इंटरनेटवरील आघाडीचे सर्च इंजिन असणार्‍या ‘गूगल’ने गेल्या दोन दिवसात या अनोख्या कारची छायाचित्रे विविध संकेतस्थळांवर पोस्ट केली आहेत. त्यानुसार ही कार साधारणपणे गोलाकार असणार आहे. पुढील वर्षी साधारणतः मे महिन्यात ही कार बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षाच्या सुरुवातीला ही कार इंग्लंडच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. मात्र, त्याआधी...26 Dec 2014 / No Comment / Read More »

आता झाडापासून मिळणार वीज

आता झाडापासून मिळणार वीजपॅरिस, [६ डिसेंबर] – फ्रान्समधील अभियंत्यांनी वीज तयार करणारे एक कृत्रिम झाड तयार करण्यात यश मिळवले आहे. हे झाड हवेचा उपयोग करून वीजनिर्मिती करेल. या ‘विंड ट्री’बाबत माहिती देताना जेरोम मिचौड लेरिविरे यांनी सांगितले की, हवा नसतानासुद्धा झाडाची पाने हलताना पाहिल्यानंतर असे झाड बनवण्याची कल्पना आपल्याला सूचली. हे विंड ट्री बनवून त्याची पुढील वर्षी बाजारात विक्री करण्याची आपली योजना असून निर्माण होणारी ऊर्जा वॉटमध्ये परिवर्तित केली जाईल. या झाडाची पानं...7 Dec 2014 / No Comment / Read More »

विस्मृती ही आनुवंशिक देणगीच

विस्मृती ही आनुवंशिक देणगीचवॉशिंग्टन, [२६ नोव्हेंबर] – स्वामी विवेकानंद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या तिघांची कार्यक्षेत्रे निरनिराळी असली आणि ही व्यक्तिमत्त्वे जनमानसात अतिशय लोकप्रिय असली तरी या तिघांमध्ये एक साम्य होते आणि ते म्हणजे त्यांची अफाट स्मरणशक्ती. माणसाच्या स्मरणशक्तीबाबत भरपूर संशोधन झाले असले तरी विस्मृतीबाबत अजून बरेच संशोधन होणे बाकी आहे. आधुनिक माणसाला मात्र जणू विस्मरणाचा रोगच झाला आहे की काय अशी आजची परिस्थिती आहे. स्मृतिभ्रंश, विस्मरण हे शब्द आपण नेहमीच...27 Nov 2014 / No Comment / Read More »

आता कमी खर्चात डायलेसिस होणार

आता कमी खर्चात डायलेसिस होणार=मुंबई आयआयटीतील शास्त्रज्ञांचे यश= नवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] – मुंबईतील आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी किडनीग्रस्त रुग्णांसाठी एक विशेष पडदा तयार केला असून त्याचा वापर केल्यास ५० टक्के कमी खर्चात व कमी वेळात डायलेसिस करणे शक्य होणार आहे. किडनी खराब झाल्यानंतर कृत्रिमपणे मशीनच्या साह्याने रक्तातील अशुद्ध पाणी काढून टाकण्यात येते. भारतात त्यावर उपचार घेण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो. पण तो करणे शक्य होत नसल्याने दगावणार्‍यांची संख्या अधिक असल्याचे दिल्लीतील आयआयएमने केलेल्या एका पाहणीत...22 Nov 2014 / No Comment / Read More »

मानवाचे धूमकेतूवर यशस्वी पाऊल

मानवाचे धूमकेतूवर यशस्वी पाऊलडार्मस्टॅण्डट, [१३ नोव्हेंबर] – चंद्र, मंगळापर्यंत यशस्वी झेप घेणार्‍या मानवाने आता थेट आपले पाऊल फिरत्या धूमकेतूवर ठेवले आहे. युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने ‘फिली’ हा यंत्रमानव यशस्वीरित्या ६७ पी/ च्युरूयूमोव्ह गेरासिमेन्का’ या धूमकेतूवर उतरवला आहे. रोसेटा या अवकाशयानातून ‘फिली’ला धूमकेतूवर उतरविण्यात आले. युरोपीयन प्रमाणवेळेनुसार पहाटे तीनच्या सुमारास फिली धूमकेतूवर उतरला. अवकाश संशोधन क्षेत्रातील ही अत्यंत महत्वाची घटना असून, या मोहिमेद्वारे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने एक नवी उंची गाठली आहे. फिलीचा प्रवास...14 Nov 2014 / No Comment / Read More »

अग्नी-२ ची यशस्वी चाचणी

अग्नी-२ ची यशस्वी चाचणीबालासोर (ओडिशा), [९ नोव्हेंबर] – अण्वस्त्रासह मध्यम पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नी-२ या क्षेपणास्त्राची भारताने आज रविवारी यशस्वी चाचणी घेतली. दोन हजार किमी अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची भारतीय लष्करासाठी ही नियमित चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र इंटग्रेटेड टेस्ट रेंजस्थित (आयटीआर) लॉन्च कॉम्प्लेक्स-४ येथून आज सकाळी ९.४० वाजता हवेत झेपावले, असे संरक्षण खात्याच्या अधिकार्‍याने याबाबत माहिती देताना सांगितले. या अत्याधुनिक...10 Nov 2014 / No Comment / Read More »