Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– केंद्रीय गृहमंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राची शिफारस, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – आर्थिक गुन्ह्यांशी निगडीत संघटित बेकायदेशीर गुंतवणूक आणि नेमून दिलेल्या कार्यावर आधारित अर्धवेळ नोकरी देण्यात गुंतलेल्या १०० पेक्षा जास्त संकेतस्थळांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ही संकेतस्थळे विदेशातील लोकांकडून चालवली जात होती आणि अर्धवेळ नोकरीच्या शोधात असलेले तरुण, सेवानिवृत्त, महिला आणि बेरोजगारांना लक्ष्य करायचे, असे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचा भाग असलेल्या भारतीय सायबर गुन्हे...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 4th, 2023
– केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नवी दिल्ली, (०४ डिसेंबर) – केंद्र सरकारने देशात वापरण्यात येत असलेल्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवर डार्क पॅटर्नच्या वापरावर बंदी आणली आहे. त्यामुळे ऑनलाईन मार्केटिंगसंबंधी फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण होणार आहे. या संदर्भात सेन्ट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अॅथॉरिटीने निवेदन जारी केले आहे. ऑनलाईन मार्केटिंग कंपन्या डार्क पॅटर्नचा वापर करून ग्राहकांना कोणतेही उत्पादन खरेदी करण्यास निर्माण करीत होत्या. यात आतापर्यंत देशभरात अनेकांची फसवणूक आणि आर्थिक हानी झाली आहे. या संदर्भात ग्राहक...
4 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
नवी दिल्ली, (२९ नोव्हेंबर) – केंद्र सरकारने ८१ कोटी जनतेसाठी मोठी बातमी दिली आहे. सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना १ जानेवारी २०२४ पासून आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लोकांना दर महिन्याला ५ किलो मोफत अन्नधान्य दिले जाते. यासोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत १६व्या वित्त आयोगाच्या काही अटींना हिरवा कंदील देण्यात आला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 26th, 2023
– चलनाची बचत, अर्थव्यवस्थेला फायदा, नवी दिल्ली, (२६ नोव्हेंबर) – केंद्र सरकारने सीएनजी आणि पीएनजीमध्ये बायोगॅसचे मिश्रण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या पावलामुळं अर्थव्यवस्थेला फायदा होणार असल्याचे मत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केलं. कंप्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) मध्ये बायोगॅस मिसळणे बंधनकारक असेल, असे सरकारने म्हटले आहे. याशिवाय कॉम्प्रेस्ड बायो गॅसचे उत्पादन आणि वापरही वाढेल. या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार...
26 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 23rd, 2023
– बैठकीत नियमन मसुदा तयार करण्याचा निर्णय, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ’डीपफेक्स’च्या मुद्द्यावर आज म्हणजेच गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकार डीपफेकच्या मुद्द्यावर सतर्क आहे आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत नियमन मसुदा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडेच अनेक बॉलिवूड कलाकारांना लक्ष्य करणारे अनेक...
23 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 16th, 2023
नवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांचे जीवन सुलभ करणे आणि ते उंचावण्यासाठी निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग डिजिटल जीवन प्रमाणपत्र म्हणजेच डीएलसी प्रणालीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. २०१४ मध्ये, बायोमेट्रिक उपकरणांचा वापर करून डीएलसी सादर करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, विभागाने आधार डेटाबेसवर आधारित फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्यासाठी एमईआयटीवाय आणि यूआयडीएआय सोबत सहभाग घेतला, ज्याद्वारे कोणत्याही अँड्रॉईड आधारित स्मार्ट फोनवरून जीवन प्रमाणपत्र जमा करणे शक्य...
16 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 12th, 2023
– केंद्राने घेतले महत्त्वाचे निर्णय, नवी दिल्ली, (११ नोव्हेंबर) – केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी तथा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह काही छोट्या बचत योजनांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. सरकारने केलेल्या नव्या नियमांनुसार, आता ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत खाते उघडण्याच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी हा कालावधी केवळ एक महिन्याचा होता. मात्र, नव्या नियमांनुसार हा कालावधी दोन महिन्यांचा करण्यात आला आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एखादी व्यक्ती निवृत्तीच्या...
12 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 12th, 2023
-हिवाळी अधिवेशनात मांडणार विधेयक!, नवी दिल्ली, (११ नोव्हेंबर) – विविध प्रसारण सेवा आणि ओटीटीवरील कंटेंटचे नियमन करण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार आहे, असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. त्यांनी यासंदर्भात समाज माध्यम ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. नवे विधेयक मंजूर झाल्यास नेटफ्लिक्स, अमेझॉन आणि डिस्ने हॉटस्टारवर प्रकाशित होणार्या कंटेंटचे देखील नियमन होणार आहे. अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘व्यवसाय सुलभता’ आणि ‘जीवन सुलभते’बाबत दूरदृष्टी...
12 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 6th, 2023
नवी दिल्ली, (०५ नोव्हेंबर) – केंद्र सरकारने मागील काही दिवसांत शेतकरी आणि रेल्वेच्या कर्मचार्यांना दिवाळीची भेट दिली. आता सशस्त्र दलांमध्ये तैनात असलेल्या महिला सैनिकांनाही दिवाळीची भेट दिली आहे. महिला सैनिकांना मातृत्व रजा दिली जावी, याबाबत सशस्त्र दलांनी दिलेला प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मंजूर केला. सुरक्षा दलातील महिला अधिकार्यांप्रमाणेच महिला सैनिकांनाही मातृत्व, बाळांचे संगोपन आणि मुलं दत्तक घेण्यासाठी रजा तसेच इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. सैन्यात तैनात असलेल्या महिलांच्या रजेबाबत...
6 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
– विरोधकांच्या फोन हॅकिंगच्या आरोपांवर केंद्राचा पलटवार, नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर केलेल्या हेरगिरीच्या आरोपांना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी उत्तर दिले. जेव्हा विरोधकांकडे मुद्दा नसतो तेव्हा ते हेरगिरीचा आरोप करू लागतात, असे त्यांनी म्हटले आहे. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, मात्र काही लोकांना टीका करण्याची सवय लागली आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, अनेक प्रसंगी या नेत्यांनी...
31 Oct 2023 / No Comment / Read More »