|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 29.22° से.

कमाल तापमान : 32.4° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 44 %

वायू वेग : 6.06 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

32.4° से.

हवामानाचा अंदाज

27.71°से. - 33.99°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.26°से. - 30.15°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.44°से. - 29.38°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.92°से. - 29.75°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.79°से. - 29.45°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.83°से. - 29.54°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा विधेयक मंजूर

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा विधेयक मंजूर– समान नागरी कायदा लागू करणारे ठरले पहिले राज्य!, डेहराडून, (०७ फेब्रुवारी) – उत्तराखंडने आज इतिहास रचला. स्वातंत्र्यानंतर देशातील पहिले समान नागरी संहिता विधेयक उत्तराखंड २०२४ विधानसभेत मंजूर करण्यात आले. दोन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चा, वादविवाद आणि युक्तिवादानंतर बुधवारी सायंकाळी हे विधेयक सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. चर्चेदरम्यान विरोधकांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची शिफारस केली होती. त्यांचा प्रस्तावही आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक (युसीसी) मंजूर...8 Feb 2024 / No Comment / Read More »

रायचूर जिल्ह्यात आणि अयोध्येजवळच सापडली विष्णूची प्राचीन मूर्ती, शिवलिंग

रायचूर जिल्ह्यात आणि अयोध्येजवळच सापडली विष्णूची प्राचीन मूर्ती, शिवलिंगकर्नाटकात कृष्णा नदीतही विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली अयोध्या, (०७ फेब्रुवारी) – रामनगरी अयोध्येपासून सुमारे १६०० किमी दूर नदीत भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली आहे. विशेष म्हणजे भगवान विष्णूची ही मूर्ती रामललाच्या सध्याच्या मूर्ती सारखी आहे. ही मूर्ती सुमारे हजार वर्षे जुनी असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या भगवान विष्णूच्या मूर्तीसोबत एक प्राचीन शिवलिंगही सापडले आहे. रायचूर जिल्ह्यात कृष्णा नदीतही विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात एक ’चमत्कार’ घडला...8 Feb 2024 / No Comment / Read More »

ज्ञानवापी प्रकरणाची पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीला

ज्ञानवापी प्रकरणाची पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीलाप्रयागराज, (०७ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरात पूजेच्या परवानगीविरोधात दाखल याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात आज सुमारे २ तास सुनावणी झाली. आता या प्रकरणी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान प्रथम ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांनी मंदिराच्या बाजूने आणि नंतर मशिदीच्या बाजूने एसएफए नक्वी यांनी आपली बाजू मांडली. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिमांच्या बाजूने...7 Feb 2024 / No Comment / Read More »

कुराणमध्ये जे नाही ते स्वीकारले जाणार नाही

कुराणमध्ये जे नाही ते स्वीकारले जाणार नाही– सपा खासदाराचे वक्तव्य, डेहराडून, (०७ फेब्रुवारी) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी (६ फेब्रुवारी २०२४) उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता (युसीसी) संबंधित विधेयक सादर केले. याबाबत अनेक मुस्लिम नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या विधेयकावर समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन म्हणाले की, कुराणविरोधी कोणताही कायदा मान्य नाही. ते म्हणाले, ’कुरआन-ए-पाकने आम्हाला दिलेल्या निर्देशांच्या विरोधात कोणताही कायदा बनवला असेल तर… मुस्लिम. जसे आपण गेली १४५० वर्षे आपल्या वडिलोपार्जित...7 Feb 2024 / No Comment / Read More »

यूसीसी विधेयक आज उत्तराखंड विधानसभेत सादर

यूसीसी विधेयक आज उत्तराखंड विधानसभेत सादरडेहराडून, (०६ फेब्रुवारी) – धामी सरकारचे बहुप्रतिक्षित यूसीसी विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी युसीसी विधेयक २०२४ सभागृहात मांडले. मुख्यमंत्री धामी यांनी यूसीसी विधेयक २०२४ सादर करताच विरोधकांनी इतका गदारोळ केला की सभागृहाचे कामकाज पुढे चालवता आले नाही. गदारोळ लक्षात घेऊन सभापती रितू खंडुरी यांनी विधानसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. मुख्यमंत्री धामी यांनी यूसीसी विधेयक २०२४ सादर करताना सभागृहात वंदे मातरम्च्या घोषणांनी...6 Feb 2024 / No Comment / Read More »

गुजरात विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या कौतुक प्रस्तावाला काँग्रेस-आपचा पाठिंबा

गुजरात विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या कौतुक प्रस्तावाला काँग्रेस-आपचा पाठिंबागांधीनगर, (०६ फेब्रुवारी) – अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारा ठराव अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुजरातच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. हे ऐतिहासिक सांस्कृतिक कर्तव्य हजारो वर्षे स्मरणात राहील, यासाठी नरेंद्र मोदींचे आभार मानण्यात आले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सादर केलेल्या या प्रस्तावाला भाजपासोबतच काँग्रेस आणि आपच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८९ मध्ये अयोध्येत जिथे मंदिर उभारले, त्या ठिकाणी पायाभरणीसाठी परवानगी दिली होती, असे...6 Feb 2024 / No Comment / Read More »

महाकुंभासाठी १०० कोटींची तरतूद

महाकुंभासाठी १०० कोटींची तरतूद– उत्तरप्रदेशचा अर्थसंकल्प सादर, – रामायण, वैदिक संशोधन केंद्रासाठीही निधी, लखनौ, (०३ फेब्रुवारी) – उत्तरप्रदेश सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २०२५ मध्ये होणार्या महाकुंभासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त अयोध्येतील आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन केंद्रालाही निधी देण्यात आला आहे. २०२५ मध्ये होणार्या महाकुंभासाठी १०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत, असे अर्थमंत्री सुरेशकुमार खन्ना यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. श्रृंगवरपूर येथे निशाद राज गुहा सांस्कृतिक केंद्र...5 Feb 2024 / No Comment / Read More »

गुजरातमध्ये गरळ ओकणाऱ्या मौलानाला मुंबईत अटक

गुजरातमध्ये गरळ ओकणाऱ्या मौलानाला मुंबईत अटकजुनागढ, (०३ फेब्रुवारी) – द्वेषभावना निर्माण करणारी गरळ ओकणारा मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी याला गुजरात पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मुंबईतून अटक केली, अशी माहिती अधिकार्यांनी सोमवारी दिली. गुजरातच्या जुनागढ शहरातील एका पोलिस ठाण्याजवळील मैदानात ३१ जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात त्याने गरळ ओकली होती. त्याच्या भाषणाची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर अझहरी, स्थानिक आयोजक मोहम्मद युसुफ मालेक आणि अझिम हबिब ओडेदराच्या विरोधात भादंवितील कलम १५३ बी (दोन समुदायांमध्ये वैर निर्माण करणे) आणि...5 Feb 2024 / No Comment / Read More »

मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी जिंकले विश्वासमत

मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी जिंकले विश्वासमत– भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा, राजीनामा देतो: हेमंत सोरेन, रांची, (०३ फेब्रुवारी) – झारखंडमधील प्रचंड राजकीय उलथापलथीनंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपई सोरेन यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. त्यांच्या सरकारने सोमवारी ४७ आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत चाचणी जिंकली. हेमंत सोरेन यांना जमीन भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात रवानगी केली. त्यांच्या जागी चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. या सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. त्यानुसार, सोमवारी...5 Feb 2024 / No Comment / Read More »

आम्हाला नेहमी एकच मंत्रालय का देता?

आम्हाला नेहमी एकच मंत्रालय का देता?– जीतनराम मांझी यांची खंत, पाटणा, (०३ फेब्रुवारी) – बिहारमधील राजकारण पुन्हा एकददा तापू लागले आहे. नितीश सरकारला समर्थन देणा्या एचएएमचे प्रमुख जीतनराम मांझी यांचे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. अद्याप नितीश सरकारचे विधानसभेत बहुमत सिद्ध व्हायचे आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थान आवाम मोर्चा अर्थात एचएएमचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या नाराजीनाट्याचा पहिला अंक सुरू झाला आहे. मांझी यांचा मुलगा संतोष सुमन यांनी बिहार कॅबिनेटमध्ये शपथ घेतली असून, त्यांना एससी- एसटी मंत्रालय देण्यात...5 Feb 2024 / No Comment / Read More »

योगींनी अर्थसंकल्प भगवान श्री राम यांना केला समर्पित!

योगींनी अर्थसंकल्प भगवान श्री राम यांना केला समर्पित!लखनौ, (०३ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी विधानसभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेला अर्थसंकल्प भगवान श्री राम यांना समर्पित केला आणि म्हटले की, राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प हा सर्वांगीण आणि संतुलित विकासासाठी आर्थिक दस्तऐवज आहे. अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या सरकारचा हा आठवा अर्थसंकल्प असून दरवर्षी कोणत्या ना कोणत्या थीमवर आधारित अर्थसंकल्प असतो....5 Feb 2024 / No Comment / Read More »

व्यापक चर्चेनंतर उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू होणार!

व्यापक चर्चेनंतर उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू होणार!डेहराडून, (०३ फेब्रुवारी) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, राज्य विधानसभेत व्यापक चर्चेनंतर समान नागरी संहिता (यूसीसी) लागू केली जाईल. धामी यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की यूसीसीचा मसुदा तयार करणार्‍या समितीने त्याचा मसुदा त्यांच्याकडे सोपवला आहे. ते म्हणाले की, ७४० पानांच्या चार खंडांमध्ये तयार केलेला हा तपशीलवार मसुदा अहवाल ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या राज्य विधानसभेच्या अधिवेशनात सर्व पक्षांच्या सदस्यांसोबत व्यापक चर्चा आणि...3 Feb 2024 / No Comment / Read More »