|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.22° से.

कमाल तापमान : 23.68° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.22° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.27°से.

शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.33°से. - 26.99°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.57°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.64°से. - 27.72°से.

सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.64°से.

मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.05°से. - 27.04°से.

बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल

आव्हाने हाताळण्यासाठी आम्ही सक्षम: नेपाळने चीनला ठणकावले

आव्हाने हाताळण्यासाठी आम्ही सक्षम: नेपाळने चीनला ठणकावलेकाठमांडू, २८ नोव्हेंबर – आमच्या देशातील आव्हाने आणि अंतर्गत समस्या हाताळण्यासाठी आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत. तिसर्‍या देशाच्या मदतीशिवाय आम्ही ती हाताळू शकतो, अशा शब्दांत नेपाळने चीनला ठणकावले आहे. चीनचे राजदूत हू यांकी यांनी अलिकडेच नेपाळचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेतली होती. याच भेटीत ओली यांनी चीनला स्पष्ट शब्दांत बजावताना, आमच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप न करण्याची ताकीद दिली होती. पंतप्रधान ओली यांनी भारतविरोधी...28 Nov 2020 / No Comment / Read More »

इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोदींचे कौतुक

इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोदींचे कौतुकजेरूसलेम, २८ नोव्हेंबर – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी भारत आणि इस्रायल एकत्र काम करीत आहेत. या दिशेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले. नेतान्याहू पुढे म्हणाले, २०३० पर्यंत सौरऊर्जेपासून २५ टक्के ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य दोन्ही देश एकत्रितपणे पूर्ण करतील तसेच अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात नवनिर्मिती करण्याची गरज आहे. इस्रायल आणि भारत यांनी या क्षेत्राची ओळख करून...28 Nov 2020 / No Comment / Read More »

इराणच्या अणुशास्त्रज्ञाची हत्या

इराणच्या अणुशास्त्रज्ञाची हत्याइस्रायलच्या सहभागाचे पुरावे सापडल्याचा दावा, तेहरान, २८ नोव्हेंबर – इराणचे वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ मोहसीन फाखरीजादेह यांची तेहरानमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेनंतर इराण आणि इस्रायलमधील तेढ वाढली आहे. हत्येमध्ये इस्रायलचा सहभाग असल्याचे पुरावे सापडल्याचा दावा इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी केला आहे. फाखरीजादेहच्या यांच्या हत्येच्या प्राथमिक तपासात इस्रायल सामील असल्याचा गंभीर पुरावा मिळाला आहे, असे ते म्हणाले. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांच्या आरोपावर इस्रायलने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अतिरेक्यांनी...28 Nov 2020 / No Comment / Read More »

अजित डोवाल यांची मालदीवच्या संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा

अजित डोवाल यांची मालदीवच्या संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चाकोलंबो, २८ नोव्हेंबर – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मालदीवच्या संरक्षण मंत्री मारिया दीदी यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत त्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याबाबत चर्चा केली. भारत-श्रीलंका-मालदीव या त्रिपक्षीय सामुद्री बैठकांतर्गत त्यांनी येथे ही चर्चा केली आहे. सामुद्री सुरक्षा आणि सहकार्य या विषयावरील तीन देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या चौथ्या बैठकीचे आयोजन येथे करण्यात आले आहे. ही बैठक सहा वर्षांनी झाली असून, यापूर्वी २०१४ साली नवी दिल्ली...28 Nov 2020 / No Comment / Read More »

‘ओआयसी’त पाकिस्तान पुन्हा तोंडघशी

‘ओआयसी’त पाकिस्तान पुन्हा तोंडघशीइस्लामाबाद, २७ नोव्हेंबर – मुस्लिम देशांचे वर्चस्व असलेल्या इस्लामिक सहकार्य परिषदेच्या बैठकीत भारताची कोंड करण्यासाठी पाकिस्तानने काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण इतर सर्वच सदस्य देशांनी विरोध केल्याने, पाकिस्तान तोंडघशी पडला. फजिती झाल्यानंतर, या देशाने मुजोरी कायम ठेवताना, आमच्या बैठकीतील कार्यक्रमसूचीत काश्मीरचा समावेश नव्हता, अशी पळवाटही शोधली. अनेक मुद्यांवरून पकिस्तानचे सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातसोबतचे संबंध ताणले गेले आहेत. सौदीने तर पाकिस्तानला भविष्यात कोणतीही मदत न करण्याचे...27 Nov 2020 / No Comment / Read More »

त्रिपक्षीय सागरी संवादासाठी डोवाल श्रीलंकेत

त्रिपक्षीय सागरी संवादासाठी डोवाल श्रीलंकेतकोलंबो, २७ नोव्हेंबर – भारत, श्रीलंका आणि मालदीव या तीन देशांमधील त्रिपक्षीय सागरी संवाद बैठकीसाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल श्रीलंकेत दाखल झाले आहेत. श्रीलंकेने भारत आणि मालदीवसोबत समुद्री सुरक्षा सहकार्याविषयी चौथ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्रिपक्षीय बैठकीचे शुक्रवारी आणि शनिवारी आयोजन केले आहे. ६ वर्षांनंतर ही बैठक संपन्न होत आहे, यापूर्वी २०१४ साली नवी दिल्ली येथे त्रिपक्षीय बैठक पार पडली होती. अजित डोवाल यांचे कोलंबो येथे श्रीलंकेचे सैन्य कमांडर...27 Nov 2020 / No Comment / Read More »

हाफिझ घरातच भोगतोय् कारावास

हाफिझ घरातच भोगतोय् कारावासइस्लामाबाद, २६ नोव्हेंबर – अफगाणिस्तानातील अल्-कायदाचा बिमोड करण्यासाठी अमेरिकी मदत लाटून या देशालाच धोका देणार्‍या पाकिस्तानने आता नवीन शक्कल लढवली आहे. एफएटीएफच्या काळ्या यादीत समावेश होऊ नये, यासाठी काही पाऊले उचलत असल्याचे पाकिस्तान दर्शवत आहे. याचाच भाग म्हणून या देशाने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईद याला शिक्षा ठोठावली. मात्र, सईद घरातच कारावास भोगत असून, तो मुक्तपणे दहशतवादी संघटनांचे कामकाज करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हाफिझला जुलै २०१९ मध्ये अधिकृत रीत्या अटक...26 Nov 2020 / No Comment / Read More »

अमिरातने रद्द केला १३ मुस्लिम देशांचा रोजगार व्हिसा

अमिरातने रद्द केला १३ मुस्लिम देशांचा रोजगार व्हिसापाकिस्तानलाही दणका, अबुधाबी, २६ नोव्हेंबर – दहशतवादाला कायमच खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानला संयुक्त अरब अमिरातने जबरदस्त दणका दिला आहे. संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तानसह १३ मुस्लिम देशांचा वर्क अथवा रोजगार व्हिसा रद्द केला आहे. या देशांचा केवळ पर्यटक व्हिसा रद्द होईल, असे मानले जात होते. मात्र, अमिरातने एक पाऊल पुढे जाऊन १३ मुस्लिम देशांचा रोजगार व्हिसाच रद्द करून टाकला. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे, असा दावा पाकिस्तान सरकार आतापर्यंत करीत...26 Nov 2020 / No Comment / Read More »

पाकिस्तानने जारी केली १२१० ‘अतिवांछित’ अतिरेक्यांची यादी

पाकिस्तानने जारी केली १२१० ‘अतिवांछित’ अतिरेक्यांची यादीम्होरक्यांना मात्र वगळले, इस्लामाबाद, १३ नोव्हेंबर – पाकिस्तानने, त्यांच्या भूमीत सक्रिय असलेल्या १२१० ‘अतिवांछित’ (मोस्ट वॉण्टेड) अतिरेक्यांची यादी गुरुवारी रात्री जाहीर केली. यात मुंबईवरील २६/११च्या भीषण हल्ल्यात सहभागी असलेल्या अतिरेक्यांचाही समावेश आहे. मात्र, यात लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईद, हिजबुलचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा कुठेही उल्लेख नाही. फेडरल तपास संस्थेच्या दहशतवादविरोधी विभागाने ही यादी जाहीर केली. यात लंडनस्थित मुत्ताहिद कौमी मूव्हमेंटचा म्होरक्या अल्ताफ हुसैन आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ)च्या नासिर बटचाही...13 Nov 2020 / No Comment / Read More »

हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी खासदारांचे सामूहिक राजीनामे

हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी खासदारांचे सामूहिक राजीनामेहॉंगकॉंग, ११ नोव्हेंबर – येथील सरकारने चार लोकशाहीवादी खासदारांना अपात्र ठरवल्यानंतर, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सर्वच लोकशाहीवादी नेत्यांनी खासदारकीचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. खासदार अल्विन येऊंग, डेनिस क्वॉक, क्वॉक का-की आणि केनेथ लेऊंग यांना अपात्र घोषित केले जाईल, अशी घोषणा हॉंगकॉंग सरकारने केल्यानंतर बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत लोकशाहीवादी नेत्यांनी हा निर्णय जाहीर केला. हॉंगकॉंगच्या स्वातंत्र्याचे समर्थन करणारे किंवा शहरातील चीनचे सार्वभौमत्वास मान्यता नकार देणार अथवा राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण करणारे...11 Nov 2020 / No Comment / Read More »

चुकीने पाडले रशियाचे हेलिकॉप्टर; अझरबैजानचे कृत्य

चुकीने पाडले रशियाचे हेलिकॉप्टर; अझरबैजानचे कृत्यमॉस्को, १० नोव्हेंबर – आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या युद्धात रशियाचे एक लढाऊ हेलिकॉप्टर पाडले गेले असल्याचे वृत्त समोर आले आहे. आर्मेनियातील यरस्ख गावातील भागात एक रशियाचे लष्करी हेलिकॉप्टर एमआय-२४ क्षेपणास्त्र हल्ल्यात कोसळले आहे. या हल्ल्यात दोन जण ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा हल्ला चुकून झाला असल्याचे अझरबैजानने मान्य केले आहे. या हल्ल्याबाबत अझरबैजानने दिलगिरी व्यक्त केली आहे. एका क्षेपणास्त्रामुळे एमआय-२४ हेलिकॉप्टर कोसळले, अशी माहिती रशियाच्या...10 Nov 2020 / No Comment / Read More »

बायडेन यांचे अभिनंदन करण्यास चीनचा नकार

बायडेन यांचे अभिनंदन करण्यास चीनचा नकारअधिकृत निकालांची प्रतीक्षा करणार, बीजिंग, ९ नोव्हेंबर – ज्यो बायडेन यांनी आपल्या विजयाची घोषणा केली असली, तरी आम्ही अमेरिकेतील कायदे आणि कार्यपद्धतीनुसार अधिकृतपणे जाहीर होणार्‍या निकालांची प्रतीक्षा करणार आहोत. त्यामुळे बायडेन यांचे आम्ही सध्याच अभिनंदन करणार नाही, अशी ताठर भूमिका चीनने आज सोमवारी घेतली. बायडेन यांच्या विजयावर कायदेशीर शिक्कामोर्तब होणे आवश्यक आहे. त्यांच्या एकतर्फी घोषणेला आमच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही, असे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी पत्रपरिषदेत...9 Nov 2020 / No Comment / Read More »