Posted by वृत्तभारती
Monday, June 29th, 2020
चीनने केला दक्षिण चीन सागरावर दावा, मनिला, २८ जून – दक्षिण चीन सागरावर चीनने केलेला दावा आग्नेय आशियातील देशांनी फेटाळला आहे. दक्षिण चीन सागरी प्रदेशात १९८२ चा संयुक्त राष्ट्रांचा महासागरी करार सार्वभौम हक्क व इतर मालकी हक्कांबाबत आधारभूत मानावा, असे आग्नेय आशियातील नेत्यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी १९८२ मध्ये केलेला यूएनसीएलओएस करार सार्वभौम हक्क, कार्यक्षेत्र व कायदेशीर हक्क यास प्रमाणभूत मानावा, असे आशियाई देशांच्या वतीने व्हिएतनामने जारी केलेल्या एका निवेदनात...
29 Jun 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, June 28th, 2020
ऑकलंड, २८ जून – फेसबुकवरील द्वेषयुक्त भाषणे व समाजामध्ये फूट पाडण्यार्या पोस्ट वाढत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी फेसबुकवर बहिष्कार टाकला आहे. या कंपन्यांच्या बहिष्कारामुळे फेसबुकच्या शेअरची किंमत आठ टक्क्यांनी घसरली असून, कंपनीचे बाजारमूल्य तब्बल ५० अब्ज डॉलर्सनी घसरले आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांच्या पोस्टवर इशारा देणारे झेंड्याचे चिन्ह लावणार असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टवरून या वादाला सुरुवात झाली होती. अध्यक्षपदाच्या मेल-इन मतदानातून घोटाळा होईल, असे भाकीत...
28 Jun 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, October 4th, 2019
एस. जयशंकर यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, ३ ऑक्टोबर – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करून योग्य उपाययोजना करण्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. काश्मीरमधील दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे हा देश कलम ३७० निष्प्रभ करण्याच्या निर्णयाला आव्हान देईल, या निर्णयात अडथळे आणण्याचा प्रयत्न करेल, याची अपेक्षा भारताला होती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ५ ऑगस्ट रोजी कलम ३७०...
4 Oct 2019 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, April 12th, 2019
इस्लामाबाद, ११ एप्रिल – भारताने बालाकोटमध्ये जैशच्या अड्ड्यावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तब्बल ४३ दिवसांनी पाकिस्तान बुधवारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना घटनास्थळी घेऊन गेले होते. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील ज्या जाबा टेकडीच्या परिसरात हल्ला केला त्या भागातील परिस्थिती दाखवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पत्रकार आणि राजनैतिक अधिकार्यांना जाबा टेकडीवरील मदरशामध्ये नेण्यात आले त्यावेळी तिथे १०० ते १५० मुले शिक्षण घेत होती. २६ फेब्रुवारीला भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये जणू काही घडलेच नाही हे दाखवण्याचा पाकिस्तानचा...
12 Apr 2019 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, April 3rd, 2019
लंडन, २ एप्रिल – युरोपियन युनियनसोबत केलेला करार तीन वेळा नाकारणार्या ब्रिटिश खासदारांनी ब्रेक्झिटच्या चार संभाव्य पर्यायी योजनांच्या विरोधात आज मंगळवारी मतदान केले आहे. युरोपियन युनियनच्या बाहेर पडल्यावर त्यासोबत आर्थिक संबंध कायम ठेवण्यासाठी प्रस्तावित पर्यायानुसार दुसर्यांदा सार्वमत घेण्यासाठी किंवा ब्रेक्झिट रोखण्यासाठी बहुमत प्राप्त करण्यास ब्रिटिश संसद अपयशी ठरली आहे. दुसर्या सार्वमतादरम्यान प्रस्तावाच्या बाजूने सर्वाधिक २८० मते प्राप्त झाली. मात्र, प्रस्तावाविरोधात २९२ मते पडली आहेत. युरोपियन युनियनसोबत कायम ठेवण्याचा सर्वाधिक मते...
3 Apr 2019 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, June 10th, 2018
=जमात-उद-दावा लढणार २०० जागा, वृत्तसंस्था लाहोर, ९ जून – मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदची जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात पुढील महिन्यात होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा लढवणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात आता अतिरेक्यांचाही प्रवेश होणार आहे. पाकमध्ये येत्या २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. जमात-उद-दावाने मिल्ली मुस्लिम लीग हा राजकीय पक्ष स्थापन केला आहे, तथापि, त्याची निवडणूक आयोगात अद्याप नोंद झालेली नाही. आता...
10 Jun 2018 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 3rd, 2017
►चिनी माध्यमांकडून जाहीर कौतुक, बीजिंग, ३१ ऑगस्ट – डोकलाम मुद्यावरून भारताला युद्धापर्यंतची धमकी देणार्या चीनमधील प्रसारमाध्यमांनी आता मात्र भारताचे गुणगाण गाण्यास सुरुवात केली आहे. भारतात हिंदू धर्माची ध्वजा फडकत असल्यामुळे तिथे कट्टर इस्लामचा प्रसार होऊ शकला नाही, असे जाहीर कौतुक कट्टर इस्लामिक देश पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीनमधील ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्राने केले. चीनमध्ये ३ ते ५ सप्टेंबर या काळात आयोजित ब्रिक्स देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे...
3 Sep 2017 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 3rd, 2017
- डोकलाम वाद, मॉस्को, २ सप्टेंबर – बदलत्या जागतिक राजकीय समिकरणामुळे पाकिस्तान आणि चीनने रशियाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना जवळजवळ यशही आले होते. डोकलाम मुद्यावर चीनने भारताला थेट युद्धाची धमकी दिली. भारताचा प्रामाणिक मित्र असलेल्या रशियाला ही बाब मान्य झाली नाही. चीनने भारताविरोधात रशियाला भडकविण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, रशियाने चीनचे समर्थन न करता तटस्थ भूमिका घेतली. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली कणखर भूमिका यामुळेच डोकलाम वादात...
3 Sep 2017 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, August 24th, 2017
– ट्रम्प यांचा पाकला गर्भित इशारा – अफगाणात शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वपूर्ण, वॉशिग्टन, २२ ऑगस्ट – दहशतवाद्यांना थारा देऊन त्यांच्यासाठी सुरक्षित स्वर्ग बनू देऊ नका, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम निश्चितच थोडेथोडके नसतील, अशा कडक शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला गर्भित इशारा दिला आहे. सोबतच अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. अशा प्रकारे अमेरिकेने पाकिस्तानवर दहशतवादाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आसूड...
24 Aug 2017 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 3rd, 2017
=तरुणांची संख्या राहणार सर्वाधिक =अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरचा अंदाज, वृत्तसंस्था न्यूयॉर्क, २ मार्च – भारतातील वाढत्या मुस्लिम लोकसंख्येवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे जगात सर्वाधिक मुस्लिम व्यक्ती भारतात राहतील, असे संकेत देणारा अहवाल सध्या विशेष चर्चेचा विषय बनला आहे. एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जगात मुस्लिम धर्मीयांची संख्या सर्वाधिक असेल, असा अंदाज प्यू रिचर्स सेंटरने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. सध्याच्या घडीला जगभरात ख्रिश्चन धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. २०१० पर्यंत जगभरातील...
3 Mar 2017 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 7th, 2017
►रशियाप्रमाणेच आम्हीही निर्दोष नाही : डोनाल्ड ट्रम्प, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ६ फेब्रुवारी – अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वखालील रशिया आणि यापूर्वीच्या अमेरिकेत साम्य असल्याचे नमूद करताना, अमेरिकेने केलेल्या चुकांमुळे जगभरात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी जाहीर कबुली दिली. यामुळे अमेरिकेतील सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्या टीकेची झोड उठवली आहे. व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देखील जगात असंख्य लोकांचा बळी गेला आहे. पुतिन...
7 Feb 2017 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, October 7th, 2016
=मॉलेक्युलर मशिन्सचा शोध= स्टॉकहोम, [५ ऑक्टोबर] – रेणुंशी संबंधित असलेल्या मॉलेक्युलर मशिन्सचा (नॅनो मशिन्स) शोध लावल्याबद्दल फ्रान्सचे जीन पीरे सौवेज, ब्रिटिशचे जे. फ्रासेर स्टॉडर्ट आणि नेदरर्लंडचे बर्नार्ड फेरिंगा या वैज्ञानिकांना आज बुधवारी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. नियंत्रित राहील अशा पद्धतीने रेणुंची रचना आणि संश्लेषणाची महत्त्वाची कामगिरी या तीन वैज्ञानिकांनी केली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला असून, ९ लाख ३० हजार डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरूप...
7 Oct 2016 / No Comment / Read More »