किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
23.64°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपावसामुळे पिकांना फटका, नागपूर शहर भर दुपारी अंधारले,
नागपूर, ११ जानेवारी – हवामान खात्याचा अंदाज पुन्हा एकदा खरा झाला आणि मुसळधार पावसासह नागपूर शहर व विदर्भातील अनेक शहरांना आणि गावांना गारपिटीचा फटका सहन करावा लागला. या पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील पीकपाण्याला जबर फटका बसला. मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूर शहर ढगांच्या गर्दीमुळे इतके अंधारले होते की, रात्र झाल्यासारखे वाटत होते.
मागील तीन दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने आणि गारपिटीने जिल्ह्यातील अनेक गावांमधील उभ्या पिकांचे नुकसान झाले असून गहू, चणा, भाजीपाला आणि फळे आदी पिकांचे नुकसान झाले. लिंबू आणि संत्र्याला आलेला बहर झडला असल्याची माहिती आहे. कामठी तालुक्यातील कोराडी पंचायत समिती अंतर्गत लोणखैरी, खापा, पाटण, गुमथी, चिचोली, बाभूळखेडा येथे अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. मंगळवारी दुपारी झालेल्या पावसाने नागपूर शहरात गारवा वाढला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, खरीप हंगामातील कापूस, तूर तसेच रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने नुकसानीच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या पावसाने कापूस काळा पडणार असून, शेतकर्यांचे नुकसान होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळी वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. झरी तालुक्यात पावसासह गारपिटीनेही हजेरी लावली. पावसामुळे तापमानाचा पारा चांगलाच खाली घसरला. रबी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वर्धा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुक्कामाला असलेल्या पावसाने आज मंगळवारी नुकसानग्रस्त तालुक्यांना सोडून दिले. रविवारी आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यात वादळीवार्यासह पाऊस आणि गारपीट झाली होती. मंगळवारी पहाटे ४ ते ७ दरम्यान जोरदार पाऊस झाला. त्यानंतर ११.३० वाजताच्या सुमारास आकाश प्रचंड काळवंडून आले आणि फक्त १५ मिनिटं वर्धा, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात पाऊस कोसळला. दुपारी १ वाजताच्या सुमारास चक्क ऊन्ह पडले. सायंकाळी पुन्हा आकाश दाटून आले होते. आजच्या पावसाने कुठेही नुकसान झाल्याची नोंद नाही. सायंकाळी तळेगाव (श्या.पंत) परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
भंडारा जिल्ह्यात आज सर्वत्र पावसाची हजेरी लागली. सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पडलेल्या पावसाने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत केले.
प्रादेशिक वेधशाळेने गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. अंदाज खरा ठरत जिल्ह्यात रविवार ९ जानेवारीपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मंगळवारीही शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच काही ठिकाणी तुरळक, मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. सततच्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात शेतकर्यांना मोठा फटका
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांना फटका बसला आहे. धान पिकांसह इतरही पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर नाल्यावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक आज, मंगळवारी सकाळपासून ठप्प झाली होती. मात्र, सायंकाळी ५ वाजतानंतर पाणी ओसरल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
वर्हाडात विश्रांती
दरम्यान, अकोला, वाशीम, बुलडाणा या वर्हाड प्रांतात मात्र आज पावसाने उसंत घेतली होती. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस पडला नाही, असे वृत्त आहे.