किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
23.64°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– सीता गायत्री अन्नदानम यांचे प्रतिपादन,
– रा.से. समितीचा मकर संक्रमणोत्सव,
नागपूर, (२९ जानेवारी) – महिलांविषयक भारतीय चिंतन व विचारांची समाजात पुनर्स्थापना करण्याचे कार्य राष्ट्र सेविका समिती करीत असल्याचे प्रतिपादन समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री अन्नदानम यांनी आज केले.
राष्ट्र सेविका समितीचा मकर संक्रमणोत्सव जरीपटक्यातील दयानंद पार्कमध्ये आयोजित करण्यात आला. बी.जी. श्रॉफ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चित्रा दौलतानी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत कार्यवाहिका रोहिणी आठवले, नागपूर विभाग कार्यवाहिका करुणा साठे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
प्रमुख वक्त्या सीता अन्नदानम म्हणाल्या की, जगातील महिलांची सर्वात मोठी संघटना रा.से. समिती आहे. भारतात ५९० जिल्ह्यांमध्ये समितीच्या शाखा कार्यरत असून दरवर्षी सेविकांना आवश्यक ते कठोर प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच शिस्तबद्ध कार्यकर्त्या निर्माण करू शकतो. ही कार्यकर्ता निर्माण पद्धती केवळ रा.से. समितीमध्येच आहे. रा.से. समिती महिलांविषयक भारतीय चिंतन व विचारांबाबत समाजात प्रबोधन करण्याचा प्रयत्न करते. भारतीय चिंतनाची देशाला गरज आहे. महिला व पुरुष एकदुसर्यांप्रति परस्परपुरक जगण्याने कुटुंब व समाज विकासाच्या गतीत पुढे जातात. आर्थिक स्वावलंबन म्हणजेच महिलांचे स्वावलंबन नसून सर्व क्षेत्रात महिला निर्णय घेण्याच्या क्षमतेत असाव्या, अशी परिस्थिती निर्माण व्हावी, असे त्या म्हणाल्या. या प्रयत्नासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
चित्रा दौलतानी म्हणाल्या की, राष्ट्रप्रेम व नैतिक संस्कार राष्ट्र सेविका समिती शिकविते. आपल्या राष्ट्राचे भवितव्य खुपच उज्ज्वल आहे. आज चारित्र्य निर्माणाचे आव्हान असल्याचे दिसते. मोबाईल मुलांना बांधून ठेवतो. त्यांच्या शारीरिक व मानसिक शिस्त लावण्याचे काम रा.से. समितीच करू शकते. माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, अ.भा. शारीरिक प्रमुख मनीषा संत, कार्यकारिणी सदस्या भारती बंबावाले आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.
पथ संचलनाचे प्रचंड स्वागत
प्रारंभी सेविकांचे पथ संचलन दयानंद पार्कमधून निघून मुख्य बाजारपेठेत प्रदक्षिणा केल्यावर दयानंद पार्ककडे परत आले. रा.से. समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, कार्यवाहिका सीता गायत्री अन्नदानम, मुख्याध्यापिका चित्रा दौलतानी यांनी वसन चौकात पथ संचलनाचे निरीक्षण केले. मार्गात पथ संचलनाचे नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवर्षावाने स्वागत केले. स्वागतासाठी विविध संस्था- संघटना, आस्थापनांनी स्वागताचे बॅनर्स लावले होते.