किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलखासदार प्रताप जाधव यांची मागणी,
बुलडाणा, १३ डिसेंबर – विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या संतनगरी शेगाव येथे दर्शनासह पर्यटनासाठी लाखो भाविकांची ये-जा असते. संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे आणि समाधी मंदिरामुळे देश विदेशातील भाविकांसाठी शेगाव हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे शेगाव येथील रेल्वेस्थानकाचे श्री संत गजानन महाराज रेल्वेस्थानक शेगाव असे नामकरण व्हावे, अशी मागणी खासदार प्रताप जाधव यांनी देशाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
सेवा आणि समर्पण भावनेने शेगाव संस्थानचे कार्य सुरू असून, आनंद सागरसारख्या पर्यटन केंद्राला देखील भाविक भेट देतात. संस्थानद्वारा संचालित या पर्यटन केंद्राच्या स्वच्छतेची कीर्ती जगभरामध्ये आहे.
रेल्वेमुळे दळणवळणाची चांगली सुविधा येथे उपलब्ध आहे. येथील स्थानकाला अ वर्ग दर्जा देखील मिळालेला आहे.
सद्गुरू श्री संत गजानन महाराज हे श्री साई बाबा शिर्डी यांच्या समकालीन संत असून, साईबाबांच्या कर्मस्थळी शिर्डीला रेल्वेस्थानकाचे नाव साईनगर शिर्डी असे ठेवलेले आहे. त्यामुळे गजानन महाराजांची कर्मभूमी असलेल्या शेगाव येथील रेल्वेस्थानकाचे श्री संत गजानन महाराज रेल्वेस्थानक शेगाव असे नामकरण व्हावे, अशी मागणी खासदार प्रताप जाधव यांनी केली आहे.