किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
23.64°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलश्री गजानन महाराज संस्थान, संतनगरी झाली पोरकी, सेवेकरी व भक्तमंडळी शोकसागरात बुडाले..,
शेगाव, ४ ऑगस्ट – शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि आपल्या सेवाभावी स्वभाव व वर्तणुकीमुळे समाजात आदर्श निर्माण करणारे शिवशंकरभाऊ सुकदेव पाटील यांचे बुधवार, ४ ऑगस्ट रोजी देहावसान झाले. त्यांच्या निधनामुळे गजानन महाराज संस्थान व संतनगरी पोरकी झाली असून निधनाचे वृत्त ऐकताच संस्थानचे सेवेकरी व गजानन महाराजांची भक्तमंडळी शोकसागरात बुडाली. कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन करीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला, तर असंख्य भाविकांनी घरूनच या आदर्शवत व्यक्तिमत्त्वाला अखेरचा निरोप दिला.
शिवशंकरभाऊंची बुधवार, दुपारी ५ वाजता प्राणज्योत मालवल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर बाळापूर मार्गावरील निवासस्थानासमोरील त्यांच्या शेतात कोरोनाचे नियम पाळून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला. ते ८२ वर्षांचे होते. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव व संस्थानचे विश्वस्त नीळकंठ पाटील यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला.
शिवशंकरभाऊ गेल्या तीन महिन्यांपासून आजारी होते. मंगळवारपासून त्यांची प्रकृती जास्त खालावली होती. त्यांचे कनिष्ठ चिरंजीव श्रीकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नगराध्यक्षा शकुंतला बूच, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार ऍड. आकाश फुंडकर, डॉ. रमेश डांगरा, रा. स्व. संघाचे श्रीराम पुंडे, माजी आमदार दिलीप सानंदा, शहरातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वारकरी सांप्रदायातील गणमान्य त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले.
‘सेवा परमो धर्म’ मानून निःस्वार्थपणे श्रींची सेवा करणारे भाऊ आधुनिक काळातील संतच होते. संस्थानमध्ये संचालक मंडळात येण्यापूर्वी त्यांनी नगराध्यक्ष म्हणून संतनगरीची सेवा केली. संस्थानच्या कारभारात सहभागी झाल्यावर त्यांनी राजकारण सोडून दिले व श्रींच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संस्थानची सेवा केली.
विशेष म्हणजे, संस्थानमधून कोणताही मोबदला न घेता त्यांनी आपले आयुष्य श्रींच्या सेवेत खर्ची घातले. श्रींच्या दर्शनासाठी येणार्या भक्तांकरिता त्यांनी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. श्रींच्या भक्तांनाच त्यांनी आपले दैवत मानले होते. त्यांनी संस्थानचे अतिशय कल्पकतेने व भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थापन राबविले. संस्थानच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातील अभ्यासक येथे येतात. देशातील इतर तीर्थक्षेत्रांचा अभ्यास करून त्यातील उणिवा दूर करून तसे व्यवस्थापन त्यांनी संस्थानमध्ये अवलंबिले. त्यांच्या निधनाने गणेश परिवार, संतनगरवासी, वारकरी सांप्रदायासह श्रींच्या भक्तांवर शोककळा पसरली.
शिवशंकरभाऊंच्या निधनाची वार्ता समजताच रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी भ्रमणध्वनीवरून भाऊंचे ज्येष्ठ चिरंजीव नीळकंठ पाटील यांच्याशी संपर्क साधून शोकसंवेदना व्यक्त करीत त्यांचे सांत्वन केले.
‘संत माळेतील मणी शेवटचा, आज ओघळला एकाएकी’
‘‘श्री शिवशंकरभाऊ पाटील यांच्या देहावसानाची वार्ता ऐकून या ओळी मनात आल्या. पराकोटीची नि:स्पृहता आणि मनामध्ये कणव बाळगून श्री शिवशंकरभाऊंनी प्रपंचाची वाटचाल परमार्थाच्या आधारावर करून दाखविली. व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात कमलपत्रांवरील जलबिंदूप्रमाणे निर्लिप्त वृत्तीने अखंड सेवेचे व्रत चालविले. …
श्री गुरुजी जन्मशताब्दी समितीचे सदस्य असताना त्यांच्या संतसदृश जीवनाचे दर्शन मला जवळून घेता आले, हे मी माझे व्यक्तिगत सौभाग्य मानतो. एकादशीच्या पवित्र दिवशी त्यांनी सुरू केलेल्या पुढच्या प्रवासात शांती व प्रकाशाचा अधिकार त्यांनी मिळविलेलाच आहे. त्यांच्यासारखेच निरलस वृत्तीने भक्ती व सेवेचे व्रत अखंड सुरू ठेवण्याचे दायित्व आपणा सर्वांवर आले आहे. ते उत्तमरीतीने पार पाडण्याचे धैर्य व शक्ती प्राप्त व्हावी, अशी प्रार्थना श्री परमेश्वर चरणी करीत, मी श्री शिवशंकरभाऊंच्या पवित्र स्मृतीला माझी व्यक्तिगत तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो.’’
-डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
व्रतस्थ कर्मयोगी
‘‘शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन दु:ख देणारे आहे. भाऊ एक व्रतस्थ आणि कर्मयोगी होते. श्री गजानन महाराज संस्थानचे पावित्र्य राखण्याबरोबरच संस्थानला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी सर्वार्थाने सामाजिक आणि धार्मिक कार्यात आदर्श निर्माण केला. एक व्रतस्थ कर्मयोगी म्हणून शिवशंकरभाऊ कायम स्मरणात राहतील. त्यांना भेटण्याचा योग अनेकदा आला. चांगले मार्गदर्शनही लाभले.’’
-नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
व्रतस्थ सेवेकरी, समर्पण भावातील मूर्तिमंत हरपला
‘‘शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, व्यवस्थापन गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते. शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे.
-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. महाजनादेश यात्रेप्रसंगी शेगावला दर्शनाला गेलो, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी मार्गदर्शकाला मुकलो आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’’