|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

लाइफ मिशन घोटाळ्या प्रकरणी शिवशंकरला अटक!

लाइफ मिशन घोटाळ्या प्रकरणी शिवशंकरला अटक!नवी दिल्ली, (१५ फेब्रुवारी ) – लाइफ मिशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी मुख्य सचिव एम शिवशंकर यांना अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने शिवशंकर यांना निवृत्तीच्या दिवशी चौकशीसाठी बोलावले होते. त्याची सोमवार आणि मंगळवारी चौकशी करण्यात आली. या प्रकरणातील ही पहिलीच अटक आहे. हे प्रकरण राज्य सरकारच्या लाइफ मिशन प्रकल्पाशी संबंधित आहे. लाइफ मिशन योजनेच्या माध्यमातून, त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे १४० कुटुंबांसाठी घरे बांधण्यासाठी करार करण्यात आला. या...15 Feb 2023 / No Comment / Read More »

अय्यापा मंदिरात विक्रमी दान मंदिरात दान करण्याची अनोखी पद्धत!

अय्यापा मंदिरात विक्रमी दान मंदिरात दान करण्याची अनोखी पद्धत!कोची, (१३ फेब्रुवारी ) – केरळमधील सबरीमाला येथील भगवान अय्यप्पाच्या प्रसिद्ध मंदिराला यावेळी विक्रमी दान मिळाले आहे. मंदिराला सुमारे ३५१ कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. मंदिर व्यवस्थापनाने नाणी मोजण्यासाठी ६०० कर्मचार्‍यांना कामाला लावले आहे, मात्र अद्याप मोजणी पूर्ण झालेली नाही. नाणी मोजताना कर्मचार्यांची दमछाक होऊ लागल्याने त्यांना काम आटोपून काही काळ विश्रांती देण्यात आली. अहवालानुसार, ६० दिवसांचा मंडलम-मकरविलक्कू महोत्सव नोव्हेंबर २०२२ पासून सुरू झाला. यामध्ये भगवान अयप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो...13 Feb 2023 / No Comment / Read More »

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे!

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे!कोची, (१२ फेब्रुवारी ) – केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. राज्य सरकारने इंधनावर उपकर लावण्याचे बजेट प्रस्ताव मागे घेण्यास नकार दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या युवा शाखेने सुरुवातीला कालामासरी येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. कामगारांच्या आणखी एका गटाने अंगमली येथे ताफ्यासमोर उडी मारण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांना पकडले. अर्थसंकल्पातील नवीन कर प्रस्ताव आणि सामाजिक सुरक्षा उपकर यांचे औचित्य साधून विजयन म्हणाले होते की,...12 Feb 2023 / No Comment / Read More »

मुख्य रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग सक्तीचे!

मुख्य रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग सक्तीचे!तिरुअनंतपुरम, (१० फेब्रुवारी ) – राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मार्किंग करून त्यावर पादचारी क्रॉसिंग सक्तीचे करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. पादचार्‍यांच्या सुरक्षेसाठी राज्यातील रस्ते अजूनही अपुरे आहेत, अशी टिपण्णीही न्यायालयाने केली. पादचारी क्रॉसिंग क्वचितच योग्यरित्या चिन्हांकित केले जातात आणि जेथे आहेत तेथेही, चालकाकडून फारसे लक्ष दिले जात नाही. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन यांच्या एकल खंडपीठाने याला अधिकार्‍यांचे ‘फॉरेन्सिक ड्युटी’ म्हटले आहे. यासोबतच न्यायालयाने संबंधित प्रकरणातील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा आदेशही...10 Feb 2023 / No Comment / Read More »

केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या घरावर हल्ला

केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या घरावर हल्लातिरुअनंतपुरम, (९ फेब्रुवारी ) – केरळमधून मोठी बातमी समोर येत आहे. राजधानी तिरुवनंतपुरममध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या घरावर हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी व्ही. मुरलीधरन यांच्या घरावर दगडफेक केली. सध्या केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री असलेले व्ही. मुरलीधरन यांनी नुकतीच तुर्कीमधील भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी तुर्कीच्या राजदूतांसोबत बैठक घेतली....9 Feb 2023 / No Comment / Read More »

न्यायालयाने फेटाळली याचिका, ठोठावला दंड

न्यायालयाने फेटाळली याचिका, ठोठावला दंडलसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचे छायाचित्र, तिरुवनंतपुरम्, २१ डिसेंबर – गेल्या वर्षभरापासून देशभरात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरू आहे. मात्र, लसीकरण झाल्यानंतर मिळणार्‍या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र आणि संदेशावर काहींनी तीव्र आक्षेप घेतला. याच अनुषंगाने मोदींचा फोटो हटविण्याची विनंती करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळताना याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. यावर आज मंगळवारी न्यायालयाने आपला निर्णय दिला. ही याचिका म्हणजे न्यायालयाचा वेळ वाया...21 Dec 2021 / No Comment / Read More »

मल्याळम् दिग्दर्शक अकबर स्वीकारणार हिंदू धर्म

मल्याळम् दिग्दर्शक अकबर स्वीकारणार हिंदू धर्मसीडीएस रावत यांच्या मृत्युनंतरच्या प्रतिक्रियांमुळे संताप, थिरुअनंतपूरम्, ११ डिसेंबर – मल्याळम् दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लाम धर्म सोडला असून, लवकरच ते हिंदू धर्म स्वीकारणार आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्युनंतर काही इस्लामवाद्यांकडून आनंद व्यक्त केल्याच्या निषेधार्थ अली अकबर यांनी इस्लाम धर्माचा त्याग केला. जनरल रावत यांच्या अपघाती निधनाच्या पोस्ट आणि प्रतिक्रियांच्या खाली अनेक इस्लामवाद्यांनी स्मायली इमोजी वापरल्याने ते संतप्त झाले. दिग्दर्शक अली अकबर यांनी यापूर्वी सीडीएस रावत यांच्या मृत्युबाबत आक्षेपार्ह...12 Dec 2021 / No Comment / Read More »

केरळमध्ये भीषण पूरस्थिती; २१ मृत्युमुखी, २० बेपत्ता

केरळमध्ये भीषण पूरस्थिती; २१ मृत्युमुखी, २० बेपत्ताअनेक शहरे पाण्यात, बचाव मोहिमेसाठी वायुसेना सज्ज, तिरुवनंतपुरम्, १७ ऑक्टोबर – केरळमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. २० पेक्षा अधिक जण बेपत्ता आहेत, तर कोक्कायारमध्ये आज रविवारी तीन मृतदेह आढळून आले. मुवत्तुपुझा नदीची पातळी वाढत असून, पुरात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी लष्कराला तैनात करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. केरळमध्ये मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पुरामुळे कोट्टायम् येथील २१ आणि इडुक्कीमधील...17 Oct 2021 / No Comment / Read More »

केरळमध्ये निपाह विषाणूचा शिरकाव

केरळमध्ये निपाह विषाणूचा शिरकाव१२ वर्षीय मुलाचा बळी, केरळ, ५ सप्टेंबर – देशात कोरोनाचे संकट असताना आता निपाह विषाणूचा शिरकाव झाला असून, जिवघेण्या निपाह विषाणूची लागण झालेल्या केरळमधील १२ वर्षीय मुलाचा बळी गेला आहे. ३ सप्टेंबर रोजी १२ वर्षीय निपाह संशयित मुलाला कोझिकोड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या मेंदूला सूज आलेली अन् हृदयस्नायूचा दाह असा त्रास होत होता. या मुलात निपाह विषाणू संसर्गाची लक्षणे दिसून येत होती. आज रविवारी सकाळी...6 Sep 2021 / No Comment / Read More »

ख्यातनाम आयुर्वेदाचार्य डॉ. वॉरियर कालवश

ख्यातनाम आयुर्वेदाचार्य डॉ. वॉरियर कालवशमलपुरम्, १० जुलै – ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आणि कोट्टाक्काल आर्य वैद्य शाळेचे व्यवस्थापकीय ट्रस्टी डॉ. पी. के. वॉरियर यांचे आज शनिवारी निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. ते १०० वर्षांचे होते. डॉ. वॉरियर यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २०१० मध्ये पद्मभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ८ जून रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात आले होते. त्यांनी जगभरात आयुर्वेदिक उपचार करून, असंख्य लोकांना जीवनदान दिले आहे. कोट्टाक्कल येथील...10 Jul 2021 / No Comment / Read More »

वायनाडमधील तीन मतदारसंघांत चुरशीची लढत!

वायनाडमधील तीन मतदारसंघांत चुरशीची लढत!राहुल गांधींची प्रतिष्ठा पणाला, वायनाड, ५ एप्रिल – केरळा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी थंडावल्या. वायनाड जिल्ह्यातील तीन मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर हा जिल्हा प्रकाशझोतात आला होता. वायनाड जिल्ह्याने राहुल गांधी यांना लोकसभेत पाठवले असले, तरी कॉंग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफ आघाडीसाठी विधानसभा निवडणूक सोपी नाही. त्यांची प्रतिष्ठा या जिल्ह्यात पणाला लागली आहे. वायनाडमध्ये सुल्तान बाथरी,...5 Apr 2021 / No Comment / Read More »

एलडीएफने नागरिकांचा विश्‍वासघात केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

एलडीएफने नागरिकांचा विश्‍वासघात केला : पंतप्रधान नरेंद्र मोदीपलक्कड, ३० मार्च – चांदीच्या काही तुकड्यांसाठी जुडासने येशूचा ज्या प्रमाणे विश्‍वासघात केला, तसाच विश्‍वासघात केरळातील सत्ताधारी माकपा सरकार येथील नागरिकांचा करीत आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे सोने तस्करी प्रकरणावरून एलडीएफवर केला. निष्पाप भाविकांवर लाठ्या बरसवणार्‍या डाव्या आघाडीला लाज वाटायला पाहिजे, अशी टीका त्यांनी एलडीएफ सरकारवर शबरीमलै मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत केली. चांदीच्या काही तुकड्यांसाठी जुडासने प्रभू येशू यांचा विश्‍वासघात केला होता. तसाच विश्‍वासघात...30 Mar 2021 / No Comment / Read More »