|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.14° C

कमाल तापमान : 28.71° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 67 %

वायू वेग : 2.43 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.71° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.45°C - 30.54°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.69°C - 30.8°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.08°C - 31.07°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.26°C - 30.62°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.88°C - 30.09°C

sky is clear

बंगालच्या उपसागरात युद्धनौकेवरून ब्रह्मोसची यशस्वी चाचणी

बंगालच्या उपसागरात युद्धनौकेवरून ब्रह्मोसची यशस्वी चाचणीनवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – भारतीय नौदलाने बुधवारी बंगालच्या उपसागरात युद्धनौकेवरून ब्रह्मोसची यशस्वी चाचणी घेतली. युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाने घेतलेल्या चाचणीदरम्यान ब्रह्मोसने सर्वच निर्धारित निकष पूर्ण केले. भारतीय नौदलाच्या बंगालच्या उपसागरातील ईस्टर्न कमांड येथे ही चाचणी घेण्यात आली. या यशस्वी चाचणीच्या माध्यमातून चिनी नौदलाच्या तयारीला प्रत्युत्तर देण्याची तयारी होत असल्याचा संदेश देण्यात आला आहे. यापूर्वीही नौदलाने विविध क्षमता आणि क्षमता असलेल्या वाढीव मारक क्षमता असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी...1 Nov 2023 / No Comment /

गगनयान मोहिमेचे चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या प्रक्षेपित

गगनयान मोहिमेचे चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या प्रक्षेपित– बंगालच्या उपसागरात सॉफ्ट लँडिंग, नवी दिल्ली, (२१ ऑक्टोबर) – गगनयान मिशनचे पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले आहे. गगनयानच्या चाचणी उड्डाणात क्रू एस्केप मॉड्यूलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे मॉड्यूल बंगालच्या उपसागरात उतरले आहे. त्याचा लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे. शनिवारच्या रॉकेटने त्याच्या क्रू मॉड्यूलच्या आपत्कालीन बचाव प्रणालीची चाचणी केली, जी थ्रस्टरपासून विभक्त झाली आणि प्रक्षेपणानंतर सुमारे १० मिनिटांनी समुद्रात सॉफ्ट लँडिंग केली. हे मिशन वाहनाच्या क्रू एस्केप...21 Oct 2023 / No Comment /

ग्रॅण्डमास्टर प्रज्ञानंद इस्रोसोबत काम करणार; सोमनाथ यांनी घेतली भेट

ग्रॅण्डमास्टर प्रज्ञानंद इस्रोसोबत काम करणार; सोमनाथ यांनी घेतली भेटचेन्नई, (१७ ऑक्टोबर) – इस्रोचे अध्यक्ष श्रीधर सोमनाथ यांनी भारतीय बुद्धिबळ ग्रॅण्डमास्टर प्रज्ञानंदची त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी भेट घेतली. प्रत्येक भारतीयाप्रमाणेच आम्हालाही प्रज्ञानंदच्या कामगिरीबद्दल खूप अभिमान आहे. तो आता जागतिक क‘मवारीत १५ व्या क्रमांकावर आहे आणि लवकरच तो जगातील नंबर १ बनेल. आपण चंद्रावर जे केले, ते त्याने पृथ्वीवर करून दाखविले, असे गौरवोद्गार सोमनाथ यांनी काढले. सोमनाथ म्हणाले की, बुद्धिबळ हा जुना खेळ भारतात सुरू झाला आणि त्याचे मूळ इथेच...17 Oct 2023 / No Comment /

गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी २१ ऑक्टोबरला

गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी २१ ऑक्टोबरलानवी दिल्ली, (१३ ऑक्टोबर) – भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम ’गगनयान’ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था द्वारे २०२४ मध्ये प्रक्षेपित केले जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत, अंतराळवीरांना पृथ्वीच्या ४०० किमी कक्षेत घेऊन जाणे, त्यांना भारतीय समुद्राच्या पृष्ठभागावर उतरवणे आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे या यानाच्या क्षमतेचे मूल्यांकन केले जाणार आहे. भारताच्या अंतराळ पर्यटनाच्या उद्दिष्टांच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. तथापि, महिला रोबोट अंतराळवीर व्योमित्राला पुढील वर्षी (२०२४) गगनयान मोहिमेच्या...13 Oct 2023 / No Comment /

गगनयानची पहिली चाचणी २१ रोजी: जितेंद्रसिंह

गगनयानची पहिली चाचणी २१ रोजी: जितेंद्रसिंहनवी दिल्ली, (११ ऑक्टोबर) – गगनयान मोहीम प्रत्यक्षात हाती घेण्यापूर्वी त्याच्या ज्या काही महत्त्वाच्या चाचण्या करणे आवश्यक आहेत, त्यातील पहिली चाचणी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो येत्या २१ ऑक्टोबर रोजी करणार आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. ही पहिली चाचणी क्रू मॉड्यूलची असून, आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या अखेरीस प्रक्षेपित होणार्या गगनयान मोहिमेतील हा महत्त्वाचा भाग...11 Oct 2023 / No Comment /

गगनयान मोहिमेसाठी ‘अबॉर्ट’ चाचणी याच महिन्यात

गगनयान मोहिमेसाठी ‘अबॉर्ट’ चाचणी याच महिन्यात-पहिल्या मानवी मोहिमेबाबत इस्रोची माहिती, बंगळुरू, (०९ ऑक्टोबर) – चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर आता इस्रोच्या गगनयान मोहिमेकडे नजरा लागल्या आहेत. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेची तयारी जोरदार सुरू आहे. गगनयान मोहिमेसाठीची महत्त्वाची अबॉर्ट चाचणी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी घेण्यात येणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. इस्रोला गगनयानसाठी पहिले क्रू मॉड्युल मिळाले असून, त्याची पहिली अबॉर्ट चाचणी २५-२६ ऑक्टोबर या काळात होण्याची शक्यता आहे. गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असल्याने याकडे सर्वांच्या...9 Oct 2023 / No Comment /

रोबोटिक सर्जरीतही भारतीयांचे वर्चस्व

रोबोटिक सर्जरीतही भारतीयांचे वर्चस्वनवी दिल्ली, (०७ ऑक्टोबर) – रोबोटिक सर्जरीसाठी केएस इंटरनॅशनल इनोव्हेशन अवॉर्ड्स २०२३ च्या शर्यतीत तीन भारतीय रोबोटिक सर्जन टॉप टेनमध्ये आहेत. १४ देशांतील शल्यचिकित्सकांच्या १४० हून अधिक नोंदींमधून टॉप १० यादी आली. यूरोलॉजी, स्त्रीरोग, गॅस्ट्रो-इंटेस्टाइनल, अवयव प्रत्यारोपण आणि डोके व मान स्पेशॅलिटीजमधील प्रक्रियांमध्ये त्यांनी अव्वल स्थानासाठी स्पर्धा केली. भारतातील तीन शल्यचिकित्सकांमध्ये डॉ. सोमशेखर एसपी, एस्टर हॉस्पिटल्स, बेंगळुरू; डॉ. संदीप नायक, फोर्टिस कॅन्सर इन्स्टिट्यूट, बेंगळुरू आणि डॉ. आदित्य कुलकर्णी, रुबी हॉल...7 Oct 2023 / No Comment /

स्वतःच जागे होईल विक्रम-प्रज्ञान: इस्रो

स्वतःच जागे होईल विक्रम-प्रज्ञान: इस्रोनवी दिल्ली, (२४ सप्टेंबर) – सूर्याचा प्रकाश मिळाल्यानंतर स्वतःच जागे होता येईल, असे तंत्रज्ञान चांद्रयान-३ च्या विक्रम लॅण्डर आणि प्रज्ञान रोव्हरमध्ये वापरण्यात आले आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. ते स्वयंचलितपणे सक्रिय होतील. आपल्याला केवळ दोन्हींवर नजर ठेवायची आहे. आपल्याकडे अजूनही १३-१४ दिवस आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली. चांद्रयान-३ च्या विक्रम लॅण्डर आणि प्रज्ञान रोव्हरला स्लीप मोडवर टाकण्यात आले, त्यावेळी त्यातील काही सर्किट्सला जागृतावस्थेत राहण्याची...24 Sep 2023 / No Comment /

इस्रो प्रक्षेपित करणार युरोपियन कंपनीचे बिकिनी यान

इस्रो प्रक्षेपित करणार युरोपियन कंपनीचे बिकिनी यानबंगळुरू, (२४ सप्टेंबर) – चांद्रयान-३ आणि आदित्य एल-१ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर जगभरातील नावाजलेल्या अंतराळ संशोधन संस्थांचे लक्ष इस्रोने आपल्याकडे खेचले आहे. इस्रोकडे आता अनेक महत्त्वाच्या मोहिमा आहेत. याशिवाय इस्रो अन्य अंतराळ संस्थांनी विकसित केलेले यान देखील प्रक्षेपित करणार आहे. यापैकीच बिकिनी ही एक महत्त्वाची मोहीम आहे. बिकिनी एक युरोपियन अंतराळ यान आहे, जे पुढील वर्षी इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटने अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हे यान अतिशय बारीक आणि पातळ आहे....24 Sep 2023 / No Comment /

आदित्य एल-१ मिशनवर हा मोठा धोका

आदित्य एल-१ मिशनवर हा मोठा धोका-सौर वादळामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली, नवी दिल्ली, (२२ सप्टेंबर) – इस्रोचे मिशन आदित्य एल-१ अडचणीत अडकल्याचे दिसत आहे. नासाने कोरोनल मास इंजेक्शनशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. यानंतर शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. पार्कर सोलर प्रोब वादळाचा हा व्हिडिओ आहे. पार्कर सोलर प्रोब यातून कसेबसे बचावले पण आदित्य एल-१ मिशन धोक्यात आले आहे. मात्र, आदित्य एल-१ या वादळातून तग धरू शकेल, असे बोलले जात आहे. हे पृथ्वीपासून अवघ्या १५...22 Sep 2023 / No Comment /

शनिवारीपासून पुन्हा सक्रिय होऊ शकते लॅण्डर-रोव्हर

शनिवारीपासून पुन्हा सक्रिय होऊ शकते लॅण्डर-रोव्हरबंगळुरू, (२१ सप्टेंबर) – इस्रोची चांद्रयान-३ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. मात्र, ही मोहीम पुन्हा सुरू होऊ शकते असे वृत्त आहे. चांद्रयान-३ चे लॅण्डर आणि रोव्हर शनिवारी पुन्हा सक्रिय होऊ शकते, अशी माहिती इस्रोच्या संशोधकांनी दिली. असे झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावरील केलेल्या प्रयोगांचा डेटा प्रज्ञान रोव्हर पुन्हा इस्रोला पाठवू शकतो. ३ सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र झाल्याने विक्रम आणि प्रज्ञानला स्लीप मोडवर टाकण्यात आले होते, अशी माहिती इस्रोच्या स्पेस अ‍ॅप्लिकेशन...22 Sep 2023 / No Comment /

आदित्य-एल१ नी दिली आनंदाची बातमी

आदित्य-एल१ नी दिली आनंदाची बातमीनवी दिल्ली, (१८ सप्टेंबर) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने भारताच्या पहिल्या सौर मिशन आदित्य-एल१ मिशनबाबत नवीन अपडेट दिले आहे. इस्रो ने म्हटले आहे की आदित्य-एल१ ने वैज्ञानिक डेटा गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. इस्रोने ट्विटरवर आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आदित्य-एल१ मध्ये स्थापित केलेल्या स्टेप्स उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून ५० हजार किमी पेक्षा जास्त अंतरावर सुपर-थर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार,...18 Sep 2023 / No Comment /