Posted by वृत्तभारती
Thursday, August 8th, 2024
– बांगलादेशाच्या सीमेवर तणाव, कोलकाता, (०८ ऑगस्ट) – शेजारी राष्ट्र बांगलादेशातील अराजकतेचा आता भारतावर होऊ लागला आहे. सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा एका मोठा गटाचा प्रयत्न सीमा सुरक्षा दल अर्थात् बीएसएफने उधळून लावला. बीएसएफच्या अधिकार्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर बांगलादेशींच्या मोठ्या गटाचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. बीएसएफच्या कर्मचार्यांनी पूर्वेकडील राज्यातील अनेक ठिकाणांहून भारतीय बाजूने जाण्याचा प्रयत्न सुमारे १२०-१४० बांगलादेशी नागरिकांना रोखले. पश्चिम बंगालमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा...
8 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, August 7th, 2024
गुवाहाटी, (०७ ऑगस्ट) – बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटना आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर झालेले बदल पाहता सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) देखील पूर्ण सतर्कतेवर आहे. बंगाल, आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये भारत-बांगलादेश सीमेवर नागरिकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली असून सीमेवरील सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. आसाम, मेघालय आणि त्रिपुरा सरकारांनी सुरक्षा दलांना आणि बांगलादेशच्या सीमेवरील जिल्ह्यांना बांगलादेशातील हिंसाचाराच्या कोणत्याही परिणामास सामोरे जाण्यासाठी हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. बेकायदेशीर प्रवेश आणि तस्करीच्या...
7 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, July 26th, 2024
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्पष्ट संदेश, द्रास, (२६ जुन) – आपले अस्तित्व टिकविण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद आणि छुप्या युद्धाचा वापर करीत आहे. तुमचा हा दहशतवाद आमचे जवान पूर्ण शक्तिनिशी चिरडून टाकणार आहेत, असा स्पष्ट आणि कठोर संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार पाकिस्तानला दिला. कारगिल विजय दिनानिमित्त लडाखच्या द्रास येथे आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित होते. १९९९ मधील कारगिल युद्धात आमच्या शूर जवानांनी पाकी सैनिक आणि अतिरेक्यांना गुडघ्यावर आणले होते. या...
26 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
– तेलंगणा पोलिसांचा प्रयोग यशस्वी, हैदराबाद, (१५ मार्च) – तेलंगणा पोलिसांकडून शत्रूच्या ड्रोनला रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या ड्रोनला एद्यादे यंत्र नाही, तर गरूड पक्षी रोखणार आहे. तेलंगणा पोलिसांनी एक ऐतिहासिक पाऊल टाकत या पक्ष्याला ड्रोनला रोखण्याचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. याची यशस्वी चाचणी करण्यात आली. पुढच्या काळात धोकादायक ड्रोनचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित गरुड तैनात करण्याची योजना आहे. पोलिस अधिकार्यांच्या मते, या गरुडांना दररोज एक तासाचे प्रशिक्षण...
15 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 4th, 2024
– भारतीय नौदलाची ताकद वाढणार, नवी दिल्ली, (०४ मार्च) – कोची येथे भारतीय नौदल बुधवारी आयएनएस गरुड युद्धनौकेवर एमएच-६० आर सीहॉक मल्टिरोल हेलिकॉप्टर तैनात करणार आहे. ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची ही एक सामुद्री आवृत्ती आहे. संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. सीहॉक स्क्वाड्रनचा भारतीय नौदलात आयएनएस ३३४ च्या रूपात समावेश केला जाईल. सीहॉकची स्क्वाड्रन सहा हेलिकॉप्टरची असेल. हे हेलिकॉप्टर्स नौदलाला सोपविण्यात आले आहेत. नौदलाने आधुनिकीकरणासाठी...
4 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 15th, 2024
– नजरेपलीकडे मारा करण्याची क्षमता, नवी दिल्ली, (१५ जानेवारी) – भारतीय वायुदलाला रविवारी पहिले स्वदेशी ‘अस्त्र’ क्षेपणास्त्र मिळाले आहे. हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे आहे. ते बियाँड व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) म्हणजे नजरेच्या पलीकडील लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. भारतीय संरक्षण संशोधन संस्था अर्थात् डीआरडीओने विकसित केलेले अस्त्र क्षेपणास्त्र सुखोई-३० एमकेआय, मिग-२९ आणि तेजस या लढाऊ विमानात बसवले जाऊ शकते. तेजस एमके २, एएमसीए आणि टीईडीबीएफ लढाऊ विमानांमध्येही ते बसवण्याची...
15 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 12th, 2024
नवी दिल्ली, (१२ जानेवारी) – भारताने आज शुक्रवारी नवीन पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. ही चाचणी डीआरडीओने ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या चांदीपूरच्या एकात्मिक चाचणी श्रेणी (आयटीआर) मधून घेतली. चाचणी अत्यंत कमी उंचीवर उच्च-वेगवान मानवरहित हवाई लक्ष्याविरुद्ध होती. यादरम्यान, लक्ष्य यशस्वीरित्या रोखले गेले आणि नंतर शस्त्रास्त्र प्रणालीद्वारे नष्ट केले गेले. या यशस्वी उड्डाण चाचणीने वापरकर्त्यांच्या चाचण्यांसाठी पुढे जाण्याचा मार्ग दाखवला आहे. अधिकार्यांनी सांगितले की, ’हे स्वदेशी विकसित रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर,...
12 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 10th, 2024
-पाकिस्तान-चीनच्या धोक्याचा सामना करण्याचे सामर्थ्य, हैदराबाद, (१० जानेवारी) – अदानी डिफेन्स अॅण्ड एयरोस्पेसद्वारे निर्मिती करण्यात आलेल्या दृष्टी १० स्टार लायनर हे ड्रोन नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार यांच्या हस्ते बुधवारी लाँच करण्यात आले. सर्व प्रकारांच्या वातावरणात उड्डाण करण्यास सक्षम असलेला हा एकमेव लष्करी मंच आहे, असे उत्पादक कंपनीने म्हटले. नौदलाच्या मोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी हे ड्रोन हैदराबाद येथून पोरबंदरपर्यंत उड्डाण करणार आहे. भारतीय नौदलाच्या गरजांप्रमाणे तयार केलेल्या आराखड्याचा उल्लेख करताना आ....
10 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, January 7th, 2024
नवी दिल्ली, (०७ जानेवारी) – वायुदलाने रात्रीच्या वेळी किर्र अंधारात सी-१३० जे सुपर हर्क्युलस विमान यशस्वीरीत्या कारगिलच्या धावपट्टीवर उतरवले. वायुदलाचे हे मोठे यश मानले जात आहे. या विमानात वायुदलाचे गरुड कमांडो होते. आपत्कालीन परिस्थितीत लवकरात लवकर जवानांना तैनात करण्यासाठी या प्रशिक्षणाचा भाग म्हणून रात्रीच्या वेळी हर्क्युलस विमान कारगिलमध्ये उतरवण्यात आले. अडचणीच्या परिस्थितीत उंच ठिकाणांवर विमान उतरवणे नेहमी आव्हानात्मक राहते. अशा परिस्थितीत कारगिल येथील उंच पर्वतीय भागात हर्क्युलस विमानाचे लॅण्डिंग हे...
7 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 6th, 2024
नवी दिल्ली, (०४ जानेवारी) – संरक्षण मंत्रालयाने अलीकडे दोन करारांना अंतिम रूप दिले आहे, एक मेसर्स ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड आणि दुसरा मेसर्स बीईएमएल लिमिटेड सोबत, लष्करी उपकरणांच्या खरेदीमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती दर्शविते. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडसोबतच्या ४७३ कोटी रुपयांच्या करारामध्ये ६९७ बोगी ओपन मिलिटरी (बीओएम) वॅगन्सचे अधिग्रहण समाविष्ट आहे. यासह, ५६ मेकॅनिकल माइनफिल्ड मार्किंग इक्विपमेंट (एमएमएमई) मार्क खख च्या खरेदीसाठी बीईएमएल लिमिटेडसोबत ३२९ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. बाय (इंडियन-आयडीडीएम)...
6 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, January 4th, 2024
नवी दिल्ली, (०४ जानेवारी) – पाकिस्तानला लागून असलेल्या पश्चिम सीमेवर भारत स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणा बसवण्याच्या तयारीत आहे. शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी पाकिस्तान दीर्घ काळापासून ड्रोनचा वापर करत आहे. हे थांबवण्यासाठी भारत येत्या सहा महिन्यांत पश्चिम सीमेवर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवणार आहे. भारत या ड्रोनविरोधी प्रणालीसाठी तीन प्रकारच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. चाचणी केल्यानंतर, या तीनपैकी एक तंत्रज्ञान निवडले जाईल किंवा तिन्हींचे संयोजन केले जाईल. पाकिस्तानकडून पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनद्वारे शस्त्रे,...
4 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 26th, 2023
श्रीनगर, (२६ डिसेंबर) – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी-पूंछ सेक्टरला भेट देऊन तेथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. वरिष्ठ लष्करी अधिकार्यांनी त्यांना दहशतवादविरोधी कारवाई आणि सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी उचललेल्या उपाययोजनांची माहिती दिली. राजौरी सेक्टरमधील डेरा की गलीच्या जंगल परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू आहे. यामुळे पूंछ जिल्ह्यातील बाफलियाज भागात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. मागील आठवड्यात गुरुवारी राजौरी सेक्टरमधील थानंडीजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला...
26 Dec 2023 / No Comment / Read More »