Posted by वृत्तभारती
Wednesday, January 31st, 2024
डेहराडून, (२९ जानेवारी) – मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील उत्तराखंड सरकार लवकरच समान नागरी संहिता (यूसीसी) वर मोठा निर्णय घेऊ शकते. सरकारने समान नागरिकत्व संहिता विधेयक विधानसभेत आणण्याची तयारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. ५ फेब्रुवारीपासून उत्तराखंड विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. उत्तराखंड विधानसभा सचिवालयाने विधानसभेच्या अधिवेशनाची अधिसूचना जारी केली आहे. विधानसभेचे अधिवेशन ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हे तीन दिवसीय अधिवेशन ५ फेब्रुवारी ते ८...
31 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 26th, 2024
– येडियुरप्पा आणि भाजपा प्रदेशध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्या उपस्थितीत शेट्टर यांची भाजपामध्ये घरवापसी, – केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली, बेंगळुरू, (२५ जानेवारी) – आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेले जगदीश शेट्टर पुन्हा भाजपमध्ये ’घरवापसी’ केली आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात माजी मुख्यमंत्री-वरिष्ठ पक्ष नेते बीएस येडियुरप्पा आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्या उपस्थितीत जगदीश शेट्टर...
26 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
– मंदिर उघडण्याआधीच लांब रांगा, अयोध्या, (२४ जानेवारी) – सोमवारी रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दोन दिवसांनंतरही भाविकांची गर्दी कायम आहे. मंदिर उघडण्यापूर्वीच पहाटेपासून लाखो लोक थंडीची तमा न बाळगता तेथे उभे असतात. दर्शनासाठी मंदिर सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. भाविकांना आवरताना पोलिसांची दमछाक होत आहे. दरम्यान, गर्दीसंबंधी माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थेट अयोध्येत पोहोचले. त्यांच्या सूचनेनंतर सुरक्षेच्या...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
लखनौ, (२४ जानेवारी) – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेश स्थापना दिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन जमिनीवर अंमलात आणण्यासाठी एक सशक्त माध्यम बनले आहे. ते म्हणाले की २०१८ मध्ये या दिवशी आमच्या सरकारने ’जिल्हा एक उत्पादन योजना’ सुरू केली होती, जी आज उत्तर प्रदेशला एक नवीन ओळख देत आहे. हा कार्यक्रम सुरू केल्याचा परिणाम असा आहे की पूर्वीच्या सरकारच्या काळात उत्तर प्रदेशची निर्यात ८६ हजार कोटी रुपयांची...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
– दीक्षू कुकरेजांवर विकासाची जबाबदारी, – ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व कायम, अयोध्या, (२४ जानेवारी) – पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व लाभलेली आणि रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी आता आधुनिक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी रामललाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटात झाली. त्यानंतर भक्तांनी येथे रामललाच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे. आता उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या विकासाची जबाबदारी प्रसिद्ध वास्तुविशारद दीक्षू कुकरेजा यांच्यावर सोपवली आहे. कुकरेजा यांनी नवी दिल्लीत जी-२० परिषदेसाठी भारत मंडपम् आणि...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
– २२८ काँग्रेस कार्यकर्त्यांचा काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश, भोपाळ, (२४ जानेवारी) – मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपने आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपचे दिग्गज नेते सातत्याने आपापल्या भागात जाऊन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया त्यांच्या पाच दिवसांच्या दौर्यावर ग्वाल्हेर-चंबळ प्रदेशात आहेत. येथे सिंधिया यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासमोर २२८ काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला....
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
इंदूर, (२४ जानेवारी) – अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेकनंतर मध्य प्रदेशचे शहरी प्रशासन मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. मध्य प्रदेशच्या शिक्षणात रामजन्मभूमीचा इतिहास समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. राज्याचे शहरी प्रशासन मंत्री विजयवर्गीय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रभू रामाने रामजन्मभूमीत प्रवेश केला आहे, हा इतिहास प्रत्येकाने वाचावा. शिक्षणातही त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. आपला मुद्दा पुढे नेत विजयवर्गीय म्हणाले की,...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
नवी दिल्ली, (२४ जानेवारी) – २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी ड्युटीवर जाणार्या लोकांच्या सोयीसाठी दिल्ली मेट्रो सर्व मार्गांवर पहाटे ४ वाजल्यापासून आपली सेवा सुरू करेल. दिल्ली मेट्रो ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) अधिकार्यांनी बुधवारी ही माहिती दिली. सकाळी ६ वाजेपर्यंत दर ३० मिनिटांनी मेट्रो रेल्वेची सुविधा उपलब्ध असेल आणि त्यानंतर दिवसभर सामान्य सेवा सुरू राहील, असे अधिकार्यांनी सांगितले. डीएमआरसीने एका निवेदनात म्हटले आहे की, ज्यांच्याकडे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– २५ जानेवारीपासून होणार अशाप्रकारे भाविकांना रामललाचं दर्शन, अयोध्या, (२३ जानेवारी) – अयोध्येत रामलालाचा अभिषेक झाल्यानंतर आता सर्वांना अयोध्येत जाऊन भगवान श्रीरामाचे दर्शन घ्यायचे आहे. अशा स्थितीत भाजपा आता उत्तराखंडमध्ये दर्शन मोहीम राबवणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर भाजपा आता राम मंदिर दर्शन मोहीम सुरू करणार आहे. राज्यातील प्रत्येक लोकसभेतून सहा हजार भाविकांना रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत नेण्यात येणार आहे. ही मोहीम २५ जानेवारी ते २५ मार्च या कालावधीत चालणार आहे. भाजपाचे प्रवक्ते विनोद...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– रामललाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी, अयोध्या, (२३ जानेवारी) – अयोध्या राम मंदिरात होणारी प्रचंड गर्दी पाहता अयोध्येला जाणार्या यूपी रोडवेजच्या सर्व बसेस थांबवण्यात आल्या आहेत. परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक ऑपरेशन मनोज पुंडीर यांनी सांगितले की, अयोध्येला जाणार्या सर्व मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. गर्दी कमी झाल्यावर त्याचा आढावा घेतला जाईल. अयोध्येतील मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते चार ते पाच किलोमीटर आधीच बंद करण्यात आले आहेत. या मार्गावरून फक्त पादचार्यांनाच जाण्याची परवानगी...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– आसाम पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चकमक, खानापारा, (२३ जानेवारी) – सध्या आसाममध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचे अधिकारी आणि आसाम सरकारचे अधिकारी यांच्यात कुस्तीचा सामना सुरू आहे. त्यानंतर काही वेळातच गुवाहाटचा प्रवेश केंद्र खानापारा क्रॉसिंग येथे आसाम पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्याच्या डीजीपींना कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्यास त्वरित गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– जगन मोहन रेड्डी यांना मोठा झटका!, अमरावती, (२३ जानेवारी) – आगामी निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाला (वायएसआरसीपी) आणखी एक धक्का बसला असून, नरसरावपेटचे खासदार लवू श्रीकृष्ण देवरायालू यांनी मंगळवारी पक्षाचा तसेच संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षातील अलीकडच्या घडामोडी लक्षात घेऊन वायएसआरसीपीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी जाहीर केले. देवरायालू म्हणाले की, वायएसआरसीपीमध्ये अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आपण त्यास जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले....
23 Jan 2024 / No Comment / Read More »