Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– राम भक्तांच्या अत्याधिक गर्दीमुळे राम मंदिरात दुपारी २ वाजेपर्यंत प्रवेश बंद, अयोध्या, (२३ जानेवारी) – अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन झाले असून रामलला आपल्या भव्य आणि दिव्य गर्भगृहात स्थायिक झाले आहेत. भव्य अभिषेक झाल्यानंतर आता सर्वसामान्य रामभक्त रामललाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. आजपासून म्हणजेच मंगळवारपासून राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य भाविकांसाठी खुले झाले आहेत. रामलल्लाच्या अभिषेकासाठी लाखो भाविक रामनगरीत पोहोचले असून दररोज लाख ते दीड लाख भाविक राम लल्लाच्या दर्शनासाठी येण्याची...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
अयोध्या, (२२ जानेवारी) – अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार झाला. या सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर ‘मी पृथ्वीवरील सर्वांत भाग्यवान व्यक्ती’ अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी दिली आहे. शिल्पकार योगीराज यांनी म्हटले आहे की, मी स्वतःला या पृथ्वीवरील सर्वांत् भाग्यवान व्यक्ती मानतो. माझे शिल्प अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निवडले गेले. माझ्या पूर्वजांचा, कुटुंबातील सदस्यांचा आणि प्रभू रामललाचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. कधीकधी मला असे वाटते की, मी स्वप्नांच्या...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
सुरत, (२२ जानेवारी) – गुजरातमधील सुरत येथील एका हिरे व्यापार्याने अयोध्येतील नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात बसवण्यात आलेल्या रामलल्लाच्या मूर्तीसाठी ’मुकुट’ दान केला आहे. नव्याने बांधलेल्या राम मंदिरातील देवतेसाठी ११ कोटी रुपयांचा मुकुट खास तयार करण्यात आला होता. सुरतमधील ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश पटेल यांनी भगवान रामाला सोने, हिरे आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेला ६ किलो वजनाचा मुकुट भेट दिला. मंदिर ट्रस्टच्या अधिकार्यांना काळजीपूर्वक तयार केलेला मुकुट सादर करण्यासाठी...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
अयोध्या, (२२ जानेवारी) – अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर रामलला अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. नागर शैलीत बांधलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर अतिशय भव्य-दिव्य आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू होते. यासाठी देशासह जगभरातून देणग्या आल्या होत्या. या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी १८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यापैकी ११०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सर्वसामान्यांपासून ते मोठ्या उद्योगपतींनी सुमारे ३२०० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
अयोध्या, (२२ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यम नियमांचे कठोर पालन ज्या पद्धतीने केले, ते आम्हा सर्व धार्मिक नेत्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त असल्याचे कौतुकोद्गार श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी काढले. अयोध्येतील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांचे अनुष्ठान केले. त्यात उपवास आणि कठोर तपाचरण अभिप्रेत असते. मात्र, इतक्या मोठ्या पदावर असूनही पंतप्रधानांनी संन्यासीजनांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त प्रभावीपणे हे अनुष्ठान...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– हात-पायात कडा, कमरेला कमरपट्टा, नखापासून कपाळापर्यंत रत्नजडित, – अनुष्ठानाचे पूर्णत्व म्हणून पंतप्रधानांनी रामललांना चांदीचे छत्र अर्पण केले, अयोध्या, (२२ जानेवारी) – रामललाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे. प्रभू श्री राम सिंहासनावर विराजमान झाले आहेत. सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या रामललाला पाच वर्षांच्या बालरूपात पाहून लोक भावूक झाले. २०० किलो वजनाच्या या मूर्तीला ५ किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. प्रभू त्यांच्या नखापासून कपाळापर्यंत रत्नजडित आहेत. रामललाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. त्याच्या काठाला...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, अयोध्या, (२२ जानेवारी) – आज अयोध्येत प्रभू श्रीरामासोबत भारताचे स्वत्व परतले आहे. जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज आहे. आगामी काळात संपूर्ण जगाला येणार्या संकटातून दिलासा देण्याचे काम भारत करणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासोबतच श्रीरामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
अयोध्या, (२२ जानेवारी) – मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठा करण्याची प्रक्रिया सर्वांत महत्त्वाची असते. मत्स्य पुराण, वामन पुराण आणि नारद पुराणात प्राणप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले गेले आहे. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे. वास्तविक, हा एक विधी आहे, ज्याद्वारे मंदिरात देव कींवा देवतेच्या मूर्तीचा अभिषेक केला जातो. वेद मंत्रांच्या पठणात मूर्तीची स्थापना केली जाते, यानंतर मूर्तीला देवत्व प्राप्त होते, अशी मान्यता आहे. प्राणप्रतिष्ठा का महत्त्वाची? प्राणप्रतिष्ठा का महत्त्वाची आहे, हे जाणून घेण्यापूर्वी त्याचा...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
– श्री रामलला शिल्पकार म्हैसूरचे अरुण योगीराज यांच्या भावना, अयोध्या, (२२ जानेवारी) – प्रभू रामाचे बालस्वरूप असलेल्या रामललाची मूर्ती बनवून अरुण योगीराज खूप खास झाले आहेत. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली रामललाची मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात स्थापनेसाठी निवडण्यात आली आहे. योगीराजांनी बनवलेली रामललाची नवीन ५१ इंची मूर्ती गेल्या गुरुवारी मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली. या प्रसंगी शिल्पकार अरुण योगीराज यांनी सोमवारी सांगितले की, मला वाटते की मी या पृथ्वीवरील सर्वात...
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
अयोध्या, (२२ जानेवारी) – अयोध्येत रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे यजमान होते. राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहरे असलेल्या साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांना डोळ्यांसमोर भव्य राम मंदिर पाहून अश्रू आवरता आले नाहीत आणि दोन्ही नेत्यांना मिठी मारली आणि खूप रडले. या दोघांचे फोटो इंस्टाग्रामवर समोर आले आहेत. जगभरातून लोक अयोध्येत पोहोचले आहेत. साध्वी ऋतंभरा आणि उमा भारतीही भव्य मंदिराच्या साक्षीसाठी आल्या आहेत....
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
– अयोध्येत आपले राम आले, अयोध्या, (२२ जानेवारी) – प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने रविवारी मी रामसेतूच्या प्रारंभ बिंदूवर होतो. प्रभू श्रीराम समुद्र ओलांडून जाण्यास निघाले, त्या क्षणी कालचक्र फिरले होते. आता कालचक्र पुन्हा शुभ दिशेने फिरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ते उपस्थितांना संबोधित करीत होते. कित्येक शतकांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत आपले राम आले आहेत. शतकांपासून ठेवलेले अभूतपूर्व धैर्य, कित्येकांनी दिलेली प्राणांची आहुती, त्याग आणि तपस्येनंतर प्रभू...
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
अयोध्या, (२२ जानेवारी) – संकल्प केला तिथेच राम मंदिर उभारले, असा सिंहनाद उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर केला. हे केवळ राम मंदिर नव्हे, तर राष्ट्र मंदिर आहे. देशातील बहुसंख्य समाजाने आपल्या आराध्य दैवतासाठी इतका दीर्घकाळ लढा दिल्याचे श्री राम जन्मभूमी हे एक अनोखे उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले. आज माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण आहे. रामजन्मभूमी मुक्तीच्या संकल्पामुळे मला गुरुदेव राष्ट्रसंत ब्रह्मलीन महंत श्री अवेद्यनाथ...
22 Jan 2024 / No Comment / Read More »