|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.23° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 1.77 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.81°C - 31.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.58°C - 31.35°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.47°C - 30.26°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.66°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.35°C - 29.99°C

broken clouds

…तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस !

…तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस !न्यायालयाने का म्हटलं : हा मानसिक अत्याचार नाही, मुंबई, (१७ सप्टेंबर) – पती आपलं शारीरिक आणि मानसिक शोषण करतो, असा आरोप पत्नीने उच्च न्यायालयात केला आणि घटस्फोटाची मागणी केली. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने पत्नीने पतीवर केलेले मानसिक आणि शारीरिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले. मुंबई उच्च न्यायालयाने तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस ही मराठी भाषेत सर्रास वापरली जाणारी वाक्ये असून ती पतीने पत्नीला उद्देशून म्हणणे म्हणजे मानसिक अत्याचार नाही,...17 Sep 2023 / No Comment /

उद्या हरतालिका; शुभ मुहूर्तावर करा शिव-पार्वतीची पूजा

उद्या हरतालिका; शुभ मुहूर्तावर करा शिव-पार्वतीची पूजामुंबई, (१७ सप्टेंबर) – हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत पाळले जाते. या विशेष दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार या विशेष दिवशी शिव-पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येते. याशिवाय, हे व्रत मूल होण्यासाठी देखील खूप प्रभावी मानले जाते. यावर्षी हरतालिका व्रत सोमवार, १८ सप्टेंबर २०२३ रोजी पाळण्यात येणार आहे. तजाणून घेऊया, हरतालिका व्रत २०२३ शुभ मुहूर्त आणि पूजा...17 Sep 2023 / No Comment /

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; १५ सप्टेंबरपासून मुसळधार

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; १५ सप्टेंबरपासून मुसळधारपुणे, (१४ सप्टेंबर) – १५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून बुधवारपर्यंत उत्तर-पश्चिम आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागा ने अंदाज वर्तवला आहे की, ही प्रणाली चांगल्या चिन्हांकित कमी दाबाच्या क्षेत्रात आणखी मजबूत होईल आणि दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल. भारतीय हवामान विभाग-पुणे, हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, हवांची हालचाल महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरण्याची...14 Sep 2023 / No Comment /

‘आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करेल: मुख्यमंत्री शिंदे

‘आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करेल: मुख्यमंत्री शिंदेमुंबई, (१३ सप्टेंबर) – आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशात उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. आजपासून देशात ‘आयुष्मान भव’ मोहिमेस सुरुवात झाली असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवर या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी...13 Sep 2023 / No Comment /

एनआयएने जाहीर केले चार अतिरेक्यांवर बक्षीस

एनआयएने जाहीर केले चार अतिरेक्यांवर बक्षीस– पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरण, मुंबई, (१२ सप्टेंबर) – पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरणातील चार फरार अतिरेक्यांच्या माहितीसाठी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती अधिकार्याने मंगळवारी दिली. मोहम्मद शाहनवाझ अब्दुल्ला, रिझवान अब्दुल अली, अब्दुल्ला फैयाझ शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान अशी या फरार अतिरेक्यांची नावे आहेत. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे एनआयएने सांगितले. एनआयएने नुकतीच पुण्यातील मॉड्युलचा एक...12 Sep 2023 / No Comment /

महापर्जन्य यागानंतर मुसळधार पाऊस

महापर्जन्य यागानंतर मुसळधार पाऊसछत्रपति संभाजीनगर, (१२ सप्टेंबर) – श्री स्वामी मच्छिंद्रनाथ व श्री सप्तशृंगी माता मंदिर मिटमिटा,छत्रपति संभाजीनगर येथे पंचकुंडी महापर्जन्य याग व परमपूज्य श्री मंगलनाथ महाराज जन्मोत्सव असंख्य शिष्य व भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला दिनांक ८ सप्टेंबर रोजी महापर्जन्य यागाला सुरुवात झाली. पर्जन्य याग पुण्यवाचन, देवता स्थापन, मातृका पूजन होऊन इंद्रदेवाचे , वरुण देवाची मंत्रोच्चारात पर्जन्य देवतेची प्रार्थना करण्यात आली. निसर्गाने ही या कार्यक्रमाला भरभरून आशीर्वाद देऊन मुसळधार पावसाची बरसात...12 Sep 2023 / No Comment /

दाऊदचा नातेवाईक नाजिर फकीला विदेशात अटक

दाऊदचा नातेवाईक नाजिर फकीला विदेशात अटक– १९९२ पासून होता फरार, भारतात आणणार, मुंबई, (१२ सप्टेंबर) – कुख्यात दाऊद इब्राहिमचा नातेवाईक आणि जेजे हॉस्पिटल गोळीबार प्रकरणातील फरार गुन्हेगार नाजिर मोहम्मद फाकीला विदेशात अटक करण्यात आली. हसिना पारकरचा पती इस्माईल पारकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दाऊदने त्याचा वापर केला होता. १९९२ पासून फरार असलेल्या नाजिरला भारतात आणल्यानंतर अत्यंत महत्त्वाची माहिती हाती येणार आहे. नाजिर पाकिस्तानात दाऊद आणि छोटा शकीलसोबतही राहिला आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांत त्याची भूमिका...12 Sep 2023 / No Comment /

बळीराजावरील संकट दूर कर, समाधानकारक पाऊस पडू दे

बळीराजावरील संकट दूर कर, समाधानकारक पाऊस पडू दे-मुख्यमंत्र्यांची भीमाशंकराकडे प्रार्थना, पुणे, (११ सप्टेंबर) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत् पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे, सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे, अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ....11 Sep 2023 / No Comment /

राज्यात सरासरीच्या ८६ टक्के पाऊस

राज्यात सरासरीच्या ८६ टक्के पाऊस– पुणे, नाशिक विभागात स्थिती गंभीर, मुंबई, (११ सप्टेंबर) – सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हात दिल्याने राज्यातील सरासरी पावसाचे प्रमाण ८६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, कोकण विभाग वगळता राज्यातील उर्वरित विभागांतील पावसाची टक्केवारी शंभरपेक्षा कमीच आहे. विशेषतः पुणे आणि नाशिक विभागाची स्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे. कोकण विभागात ११ सप्टेंबरपर्यंत १०१.१४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ विदर्भातील नागपूर विभागात ९४.१५ टक्के पाऊस आणि अमरावती विभागात ८६.११ टक्के पावसाची नोंद...11 Sep 2023 / No Comment /

लालबागच्या राजाला २६ कोटींचे विमा कवच

लालबागच्या राजाला २६ कोटींचे विमा कवच– मंडळाने दोन महिन्यांसाठी मोजले लाखो रुपये, मुंबई, (११ सप्टेंबर) – लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदा मोठा निर्णय घेतला आहे. मंडळाने तब्बल २६.५ कोटी रुपयांचे विमा संरक्षण ५ लाख ४० हजारांचा विमा हप्ता भरून घेतले आहे. हा विमा न्यू इंडिया इन्श्यूरन्स कंपनीकडून उतरवण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवासाठी काहीच दिवस राहिले आहेत. गणपतीच्या भक्तांना गणेश चतुर्थीचे वेध लागले आहेत. यंदा गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरला असून, त्या दिवसापासून पुढील काही दिवस भक्तांसाठी आनंदाची...11 Sep 2023 / No Comment /

लवकरच पाकिस्तानातही हनुमान चालीसा म्हणू!

लवकरच पाकिस्तानातही हनुमान चालीसा म्हणू!-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशावाद, अमरावती, (१० सप्टेंबर) – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हनुमान चालीसा म्हणणार्‍यांना कारागृहात टाकले होते. मी त्यांना सांगू इच्छितो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी पाकिस्तानात हनुमान चालीसा म्हटला जाईल, असा आशावाद उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केला. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी रविवारी आयोजित केलेल्या नवाथे चौक येथील दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ....10 Sep 2023 / No Comment /

राज्यात महिनाभर धो धो कोसळणार

राज्यात महिनाभर धो धो कोसळणार– कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, मुंबई, (०९ सप्टेंबर) – संपूर्ण ऑगस्ट महिना जवळजवळ कोरडा गेल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. सप्टेंबरच्या उर्वरित काळात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याने शनिवारी दिली. गुरुवारपासून मान्सून राज्यात सक्रिय झाला. कोकण, मराठवाडा आणि विदर्भासह बहुतांश भागांमध्ये कोसळत आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दोन दिवस कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे....9 Sep 2023 / No Comment /