|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.49° C

कमाल तापमान : 32.49° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 65 %

वायू वेग : 7.32 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.49° C

Weather Forecast for
Monday, 06 May

28.07°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.48°C - 30.68°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.18°C - 30.48°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

28°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.95°C - 29.94°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.81°C - 30.39°C

sky is clear

देवेंद्र फडणवीसांची निर्दोष मुक्तता

देवेंद्र फडणवीसांची निर्दोष मुक्तता-गुन्हे लपविले नसल्याच्या निरीक्षणाची नोंद, नागपूर, (०९ सप्टेंबर) – भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध २०१४ च्या विधानसभा निवडणूक शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याचा कथित आरोप असलेल्या खटल्यात प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी संग्राम जाधव यांनी आज अंतिम निकाल घोषित करीत देवेंद्र फडणवीस यांना निर्दोष मुक्त केले आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार फडणवीस यांच्यावरील दोन्ही गुन्हे निवडणूक प्रभावित करणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी मुद्दाम गुन्हे लपवले ही बाब सिद्ध होत नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. फडणवीस...9 Sep 2023 / No Comment /

वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी काही जणांनी पक्ष सोडला

वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी काही जणांनी पक्ष सोडला– शरद पवार गटाची निवडणूक आयोगाला माहिती, मुंबई, (०९ सप्टेंबर) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. काही जणांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी पक्ष सोडला आहे, असे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राकाँच्या गटाने शनिवारी निवडणूक आयोगाला सांगितले. अजित पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाने आमच्याकडे उत्तर मागितले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनात दिली. पक्षाने ७ सप्टेंबर रोजी आपला प्राथमिक प्रतिसाद आयोगाकडे सादर केला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. अजित पवार वारंवार...9 Sep 2023 / No Comment /

शरद पवार गटाने फेटाळले अजित पवार गटाचे दावे

शरद पवार गटाने फेटाळले अजित पवार गटाचे दावे– निवडणूक आयोगाकडे दाखल केले उत्तर, नवी दिल्ली, (०९ सप्टेंबर) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येदेखील आता पक्षाच्या चिन्हावरून आणि नावावरून न्यायालयीन लढाई सुरू होणार आहे. अजित पवार यांच्याकडून काही महिन्यांपूर्वी बंडखोरी करण्यात आल्यानंतर त्यांनी थेट पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ही अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. त्यानंतर या प्रकरणी आक्रमक झालेल्या शरद पवार गटाकडून या प्रकरणी निवडणूक आयोगात दाद मागण्यात आली होती....9 Sep 2023 / No Comment /

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘पर्यावरण विघ्नहर्ता’ स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘पर्यावरण विघ्नहर्ता’ स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशनमुंबई, (०७ सप्टेंबर) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते ‘पर्यावरण विघ्नहर्ता -२०२३’ या पर्यावरणस्नेही राज्यस्तरीय श्रीगणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन नुकतेच मंत्रालयात झाले. ही स्पर्धा १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पार पडले. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून, ती सार्वजनिक आणि घरगुती अशा दोन गटांमध्ये होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नुकतेच केलेले आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या...7 Sep 2023 / No Comment /

जीआरमध्ये दुरुस्ती केल्यानंतरच उपोषण मागे घेणार

जीआरमध्ये दुरुस्ती केल्यानंतरच उपोषण मागे घेणार-मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली भूमिका, मुंबई, (०७ सप्टेंबर) – महाराष्ट्र सरकारने मराठा-कुणबी जातीच्या जात प्रमाणपत्राबाबत जीआर जारी केला आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी जीआरमध्ये दुरुस्ती सुचवली आहे. जीआरमध्ये वंशावळीचा उल्लेख काढण्यात यावा. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा मागण्या जरांगे यांनी केल्या. दुरुस्त केलेला जीआर जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र सरकारने...7 Sep 2023 / No Comment /

यंदा महाराष्ट्रात दुष्काळाच्या २२ जिल्ह्यांना झळा

यंदा महाराष्ट्रात दुष्काळाच्या २२ जिल्ह्यांना झळामुंबई, (०७ सप्टेंबर) – महाराष्ट्र दुष्काळी संकटाच्या सावटाखाली आहे. राज्यात यावर्षी फार कमी पाऊस पडला. त्यामुळे आगामी काळात पाऊस पडला नाही तर, पाणीटंचाईच्या झळा जास्त तीव‘ झालेल्या बघायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, राज्यात सध्याच्या स्थितीत कमी पाणीसाठा आहे. अनेक धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहू शकते. याशिवाय पाऊस नसल्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील काही भागांत पिकांचे प्रचंड...7 Sep 2023 / No Comment /

तीन लाख कांदा उत्पादकांना ३०० कोटी अनुदान देणार

तीन लाख कांदा उत्पादकांना ३०० कोटी अनुदान देणार-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण सुरू, मुंबई, (०६ सप्टेंबर) – राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकर्यांना ३५० रुपये क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला....6 Sep 2023 / No Comment /

संपूर्ण महाराष्ट्रात ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविणार

संपूर्ण महाराष्ट्रात ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविणारमुंबई, (०६ सप्टेंबर) – राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. आरोग्य भवन येथील सभागृहात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मु‘य...6 Sep 2023 / No Comment /

कुणबी प्रमाणपत्राबाबतचा अहवाल आठ दिवसांत द्या

कुणबी प्रमाणपत्राबाबतचा अहवाल आठ दिवसांत द्या-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश, मुंबई, (०६ सप्टेंबर) – मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील अहवाल आठ दिवसांच्या आत देण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिला आहे. अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला मुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिला आहे. या समितीला आधी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, मनोज जरांगे उपोषण मागे घेत नसल्यामुळे ही मुदत आठ दिवसांवर आणली आहे. जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर मराठा आंदोलनाचा मुद्दा...6 Sep 2023 / No Comment /

मराठा आरक्षणाच्या निषेधार्थ ४६ बस डेपो बंद

मराठा आरक्षणाच्या निषेधार्थ ४६ बस डेपो बंद– १३.२५ कोटी रुपयांचे नुकसान, राज्यातील किमान ४६ बस डेपो बंद, मुंबई, (०५ सप्टेंबर) – मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) २५० पैकी किमान ४६ बस डेपो पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत आणि एमएसआरटीसीचे गत काही काळात १३.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांतील बस संचालनाला या आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे, असे एमएसआरटीसीच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले....5 Sep 2023 / No Comment /

देशाचे नाव बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही: शरद पवार

देशाचे नाव बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही: शरद पवारजळगाव, (०५ सप्टेंबर) – जी-२० परिषदेतील भोजनाच्या निमंत्रणावर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी, देशाचे नाव बदलण्याचा अधिकार कुणालाही नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी बुधवारी इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रमुखांसोबत बोलावलेल्या बैठकीत पुढील सार्वत्रिक निवडणुकांसोबतच या विषयावर चर्चा होईल, असे शरद पवार यांनी सांगितले. देशाशी संबंधित नावावर सत्ताधारी का इतके अस्वस्थ आहेत, हेच कळत नसल्याचे शरद...5 Sep 2023 / No Comment /

गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला एअर होस्टेसचा मृतदेह

गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला एअर होस्टेसचा मृतदेहमुंबई, (०४ सप्टेंबर) – एका एअर होस्टेसचा मृतदेह येथील एका अपार्टमेंटमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर मुंबई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत, एका व्यक्तीला ताब्यात घेतले. रूपल ओग्रे असे हत्या झालेल्या एअर होस्टेसचे नाव आहे. ती मूळची छत्तीसगडची आहे. एअर इंडियाच्या प्रशिक्षणासाठी ती एप्रिल महिन्यात मुंबईत आली होती. अंधेरीतील मरोळ येथील एन. जी. कॉम्पलेक्स येथील सदनिकेत रविवारी रात्री तिचा मृतदेह आढळला. पवई पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करीत एका व्यक्तीला...4 Sep 2023 / No Comment /