|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.07° C

कमाल तापमान : 29.35° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 76 %

वायू वेग : 2.31 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.35° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.94°C - 31.7°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.31°C - 30.4°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.05°C - 30.2°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.73°C - 30.04°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.81°C - 29.81°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 10 May

27.73°C - 29.97°C

sky is clear

बेजबाबदार देशाकडून ‘यूएनक्लॉज’ची चुकीची व्याख्या

बेजबाबदार देशाकडून ‘यूएनक्लॉज’ची चुकीची व्याख्याराजनाथसिंह यांची चीनवर टीका, आयएनएस विशाखापट्टणम् नौदलात दाखल, मुंबई, २१ नोव्हेंबर – काही बेजबाबदार देश त्यांच्या संकुचित पक्षपाती हितसंबंध आणि वर्चस्ववादी प्रवृत्ती जपण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सामुद्री कायद्यांचा (यूएनक्लॉज) चुकीचा अर्थ लावत आहेत, अशी टीका संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज रविवारी येथे केली. राजनाथसिंह यांच्या हस्ते प्रोजेक्ट-१५ बी मधील शत्रूला गुंगारा देण्याची क्षमता असलेली पहिली दिशादर्शक क्षेपणास्त्र विनाशिका आयएनएस विशाखापट्टणम् आज औपचारिकरीत्या नौदलाला सोपवण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्याला ते संबोधित करीत होते....22 Nov 2021 / No Comment /

पाच अतिरेक्यांचा खात्मा; टीआरएफच्या वरिष्ठ कमांडरचा समावेश

पाच अतिरेक्यांचा खात्मा; टीआरएफच्या वरिष्ठ कमांडरचा समावेशकुलगाम जिल्ह्यात चकमक, श्रीनगर, १७ नोव्हेंबर – कुलगाम जिल्ह्यातील पोम्बई आणि गोपालपुरा येथे आज बुधवारी झडलेल्या चकमकीत सुरक्षा दलाने द रेजिस्टन्स फोर्स अर्थात् टीआरएफच्या वरिष्ठ कमांडरसह पाच अतिरेक्यांचा खात्मा केला. पोम्बई येथे झडलेल्या चकमकीत तीन, तर गोपालपुरा येथे दोन अतिरेक्यांना ठार करण्यात आले. गोपालपुरा येथे अतिरेकी आले असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली. अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर केलेल्या गोळीबारानंतर ही शोधमोहीम चकमकीत बदलली. अतिरेक्यांच्या...18 Nov 2021 / No Comment /

नौदलाला पुढील आठवड्यात मिळणार क्षेपणास्त्र विनाशिका, पाणबुडी

नौदलाला पुढील आठवड्यात मिळणार क्षेपणास्त्र विनाशिका, पाणबुडीव्हाईस ऍडमिरल घोरमाडे यांची माहिती, नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर – दिशादर्शक क्षेपणास्त्र विनाशिका आणि कलवरी श्रेणीतील पाणबुडीचा पुढील आठवड्यात भारतीय नौदलात समावेश केला जाणार आहे. भारतीय समुद्रात चिनी नौदलाची घुसखोरी वाढत असून, क्षेपणास्त्र विनाशिका आणि कलवरी श्रेणीतील पाणबुडीच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची लढाऊ क्षमता वाढणार आहे. विशाखापट्टणम् ही विनाशिका २१ नोव्हेंबर रोजी, तर वेला ही पाणबुडी २५ नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलात समावेश केला जाणार असल्याची माहिती नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल सतीश...16 Nov 2021 / No Comment /

एस-४०० चा भारताला पुरवठा सुरू

एस-४०० चा भारताला पुरवठा सुरूपहिली स्क्वाड्रन होणार पश्‍चिम सीमेवर तैनात, नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर – रशियाने एस-४०० ट्रायम्फ हवाई संरक्षण यंत्रणेचा पुरवठा सुरू केला असून, याची पहिली स्क्वाड्रन पश्‍चिम सीमेवर तैनात होणार आहे. भारताला एस-४०० यंत्रणेचा पुरवठा सुरू झाल्याची घोषणा रशियन फेडरल सर्व्हिस फॉर मिलिट्री-टेक्निकल कोऑपरेशनचे (एफएसएमटीसी) संचालक दिमित्री शुगाएव्ह यांनी दुबई येथील एअर शोमध्ये केली. एफएसएमटीसी ही रशियातील संरक्षण उपकरणांच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. एस-४०० च्या स्क्वाड्रनमधील मुख्य भाग भारतात पोहोचण्यास सुरुवात...15 Nov 2021 / No Comment /

भारताचा खरा शत्रू पाकिस्तान नाही, चीन

भारताचा खरा शत्रू पाकिस्तान नाही, चीनसीडीएस रावत यांची भूमिका, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – पाकिस्तान हा भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू नाही, तर चीन आहे, अशी स्पष्ट भूमिका तिन्ही सशस्त्र दलांचे सेनापती (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी आज शुक्रवारी विशद केली. मागील काही महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर तणाव कायम आहे. याचसंदर्भात बिपीन रावत यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात सहभागी होत आपली भूमिका मांडली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात सैन्यकपात करण्याऐवजी सैनिकांची संख्या आणखी वाढविण्याचा आमचा उद्देश आहे. यामागील मुख्य...12 Nov 2021 / No Comment /

आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान आवश्यक

आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान आवश्यकलष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, ८ नोव्हेंबर – संघर्षाच्या काळात भारतीय लष्कराला केवळ स्वदेशी तंत्रज्ञान उपलब्ध असेल आणि संरक्षण आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच विदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान आवश्यक आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आज सोमवारी केले. भारतीय लष्कराचे वेगाने आधुनिकीकरण केले जात आहे आणि कारवायांच्या गरजेसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक झाले आहे, असे त्यांनी औद्योगिक संघटना फिक्कीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सांगितले. संघर्षाच्या...8 Nov 2021 / No Comment /

७,९६५ कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीस मंजुरी

७,९६५ कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीस मंजुरी१२ हलक्या हेलिकॉप्टर्सचा समावेश, संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, नवी दिल्ली, २ नोव्हेंबर – संरक्षण मंत्रालयाने आज मंगळवारी ७,९६५ कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र आणि लष्करी उपकरणांच्या खरेदीला मंजुरी दिली. यात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून मिळणार्‍या १२ हलक्या हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. संरक्षण खरेदी समितीच्या (डीएसी) बैठकीत या खरेदीला मान्यता देण्यात आली, अशी माहिती अधिकृत निवेदनात देण्यात आली. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून १२ हलकी हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याव्यतिरिक्त डीएसीने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून लिनक्स यू-२ नेव्हल गनफायर नियंत्रण...2 Nov 2021 / No Comment /

दुसर्‍या सागरी चाचणीसाठी ‘विक्रांत’ रवाना

दुसर्‍या सागरी चाचणीसाठी ‘विक्रांत’ रवानाकोची, २४ ऑक्टोबर – पहिल्या चाचणीनंतर स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका दुसर्‍या चाचणीसाठी आज रविवारी येथून रवाना झाली आहे. विमानवाहू विक्रांतची पहिली सागरी चाचणी ऑगस्टमध्ये झाली होती. या पहिल्या चाचणीदरम्यान विक्रांतच्या सांगाड्याच्या टिकाऊ क्षमतेची, मुख्य प्रणोदन यंत्रणेची, ऊर्जा निर्मिती आणि वितरण आणि इतर उपकरणांची चाचणी घेण्यात आली होती. सदर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाइस ऍडमिरल ए. के. चावला यांनी या चाचणीचा आढावा घेतला होता. विमानवाहू...25 Oct 2021 / No Comment /

ईशान्य सीमेवर भारताची चीनविरोधात युद्धसज्जता

ईशान्य सीमेवर भारताची चीनविरोधात युद्धसज्जतापिनाक, स्मर्च रॉकेट लॉन्चर तैनात, नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर – पूर्व लडाखनंतर आता भारतीय लष्कराने ईशान्येकडील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. या सीमेवर कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने चिना सीमेजवळ पिनाक आणि स्मर्च मल्टीपल रॉकेट लॉन्चर तैनात केले आहेत. अलिकडेच लष्कराने अरुणाचल प्रदेशात सीमेच्या बाजूने तैनाती वाढवली होती. चीनची विस्तारवादी भूमिका संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. अरुणाचल,...23 Oct 2021 / No Comment /

सैन्यातील ३९ महिलांना मिळाले कायमस्वरूपी कमिशन

सैन्यातील ३९ महिलांना मिळाले कायमस्वरूपी कमिशनन्यायालयीन लढाईचे मोठे यश, नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर – भारतीय सैन्य दलातील महिला अधिकार्‍यांच्या न्यायालयीन लढाईला मोठे यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३९ महिला अधिकार्‍यांना कायम सेवेत समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. यानंतर या ३९ महिला अधिकार्‍यांना भारतीय सैन्यात समाविष्ट करण्यात आले आहे. न्यायालयाने सात दिवसांत त्यांना कायम सेवेचा दर्जा देण्यास सांगितले होते. त्यांना आता कायम सेवेत समाविष्ट करून तो दर्जा देण्यात आला. भारतीय सैन्यात महिलांना सध्या अल्प काळासाठीच सेवेत...23 Oct 2021 / No Comment /

तोयबाच्या कमांडरसह तीन अतिरेक्यांचा खात्मा

तोयबाच्या कमांडरसह तीन अतिरेक्यांचा खात्मासुरक्षा जवानांची मोठी कामगिरी, श्रीनगर, १६ ऑक्टोबर – सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज शनिवारी लष्कर-ए-तोयबाच्या वरिष्ठ कमांडरसह तीन अतिरेर्‍यांचा चकमकीत खात्मा केला. याच वर्षीच्या सुरुवातीला दोन पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात या अतिरेक्यांचा सहभाग होता. उमर मुश्ताक खांडे असे या कमांडरचे नाव असून, काश्मीर खोर्‍यातील अनेक हल्ल्यांच्या कटातही तो सहभागी होता. उमर आपल्या काही साथीदारांसह पांपोरा येथील द्रंगबाल येथे आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन परिसराला वेढा...17 Oct 2021 / No Comment /

पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू

पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करूअमित शाह यांचा पाकिस्तानला दम, पणजी, १४ ऑक्टोबर – जम्मू-काश्मिरातील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना मदत करणे न थांबवल्यास सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा गृहमंत्री अमित शाह यांनी आज गुरुवारी पाकिस्तानला दिला. कोणीही आमच्यावर केलेले हल्ले आम्ही कदापि खपवून घेत नाही, हे यापूर्वी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने सिद्ध केले आहे. त्यामुळे तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले किंवा काश्मीरमधील आमच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईक करू, असे अमित शाह म्हणाले....15 Oct 2021 / No Comment /