|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.99° से.

कमाल तापमान : 24.74° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 57 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

आकाशातून मृत्यूचा पाऊस, २ तासात ६२३५० वेळा वीज कोसळली

आकाशातून मृत्यूचा पाऊस, २ तासात ६२३५० वेळा वीज कोसळली-अनेकांना गमवला जीव, भुवनेश्वर, (०४ सप्टेंबर) – ओडिशा सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दिवसात राज्यात वीज पडून मृतांची संख्या १२ झाली आहे. याशिवाय, सरकारने प्रत्येक पीडितेच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. विशेष मदत आयुक्त कार्यालयानुसार, सर्व जिल्ह्यांमध्ये वीज पडून मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे: खुर्दामध्ये चार, बोलंगीरमध्ये दोन आणि अंगुल, बौद्ध, गजपती, जगतसिंगपूर, ढेंकनाल आणि पुरी येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. एका अहवालानुसार, शनिवारी सुमारे दोन...4 Sep 2023 / No Comment / Read More »

ओडिशा रेल्वे अपघातातील बळीसंख्या आकडा २७८

ओडिशा रेल्वे अपघातातील बळीसंख्या आकडा २७८भुवनेश्वर, (६ जून) – तीन जखमी प्रवाशांच्या मृत्यूसह ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघातातील बळीसंख्या आकडा २७८ झाला असल्याची माहिती रेल्वेने दिली. राज्य सरकारची सुधारित आकडेवारी २७५ वर कायम आहे. २ जून रोजी झालेल्या या अपघातात २७८ जणांच्या मृत्युशिवाय ११०० लोक जखमी झाले असल्याची माहिती खुर्दा रेल्वे विभागाचे व्यवस्थापक रिंकेश राय यांनी दिली. यापूर्वी अपघातातील बळीसंख्या २८८ दाखवण्यात आली होती. काही मृतदेहांची दोन वेळा मोजणी करण्यात आल्याचे कारण देत राज्य सरकारने मृतांचा...6 Jun 2023 / No Comment / Read More »

प्रशासकीय यंत्रणेआधीच घटनास्थळी दाखल झाले संघ स्वयंसेवक

प्रशासकीय यंत्रणेआधीच घटनास्थळी दाखल झाले संघ स्वयंसेवक– बचाव व मदत कार्यात दिले झोकून, – जखमी प्रवाशांसाठी केले रक्तदान, – ओडिशा रेल्वे अपघात, भुवनेश्वर, (३ जून) – बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर नेहमीप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रथम घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचण्याआधीच म्हणजेच सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास स्वयंसेवक अपघातस्थळी पोहोचले होते. दुर्घटना स्थळाजवळील गावात संघ शाखा असल्याने सुरुवातीला अत्यल्प संख्येने स्वयंसेवक पोहोचले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत सुमारे अडीचशे स्वयंसेवकांनी अपघातस्थळी पोहोचून...3 Jun 2023 / No Comment / Read More »

बचावकार्य पूर्ण, अपघाताची सखोल चौकशी सुरू

बचावकार्य पूर्ण, अपघाताची सखोल चौकशी सुरू– रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, बालासोर, (३ जून) – ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातानंतरचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. आम्ही या घटनेची सखोल चौकशी करू आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ओडिशातील भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २३३ झाली असून, ९०० जण जखमी आहेत. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाले आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकार्याने शनिवारी दिली....3 Jun 2023 / No Comment / Read More »

अपघातातील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल : मोदी

अपघातातील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल : मोदी– पंतप्रधानांनी घेतला अपघातस्थळाचा आढावा, जखमींची भेट, बालासोर, (३ जून) – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे उघड झाले आहे. पंतप्रधानांनी रेल्वे अपघातस्थळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रेल्वेचे सर्व उच्चपदस्थ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. यांनतर पीएम मोदी कटक येथे अपघातात जखमी...3 Jun 2023 / No Comment / Read More »

चक्रीवादळापासून बचावासाठी ओडिशाची पूर्वतयारी

चक्रीवादळापासून बचावासाठी ओडिशाची पूर्वतयारी– नियंत्रण कक्ष उघडण्याचा निर्णय, भुवनेश्वर, (२७ एप्रिल) – हवामान खात्याने या पंधरवड्यात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची कोणतीही शक्यता वर्तवली नसली तरी मागील तीन वर्षांपासून उन्हाळी चक्रीवादळाचा सामना करणार्‍या ओडिशा राज्याने या हंगामात कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी तयारी सुरू केली आहे. चक्रीवादळाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने १ मे पासून सर्व जिल्ह्यांमध्ये चोवीस तास नियंत्रण कक्ष उघडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी ओडिशा राज्याचे मुख्य सचिव पी. के....27 Apr 2023 / No Comment / Read More »

बोलंगीरमध्ये सर्वात मोठ्या ’कफ सिरप रॅकेट’चा पर्दाफाश

बोलंगीरमध्ये सर्वात मोठ्या ’कफ सिरप रॅकेट’चा पर्दाफाश३५ जणांना अटक, बोलंगीर, (१४ मार्च) – ओडिशाच्या बोलंगीर पोलिसांनी त्यांच्या ’मिशन कफ सिरप’ मोहिमेअंतर्गत सर्वात मोठ्या ’कफ सिरप रॅकेट’चा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधील ३५ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून ३५ लाख रुपयांच्या ’अस्कुफ’ कफ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सना नेगी आणि प्रशांत खेती हे रॅकेटचे दोन प्रमुख आरोपी आहेत. बोलंगीर पोलिसांनी सांगितले की, ’मिशन कफ सिरप’ अंतर्गत त्यांनी...14 Mar 2023 / No Comment / Read More »

ओडिशाच्या किनाऱ्याजवळ पकडले गुप्तचर कबूतर!

ओडिशाच्या किनाऱ्याजवळ पकडले गुप्तचर कबूतर!भुवनेश्वर, (९ मार्च) – ओडिशाच्या पारादीप किनाऱ्याजवळ एक हेर कबूतर पकडण्यात आले आहे. कबुतराच्या पायात एक मायक्रोचिप आणि कॅमेरा बसवलेला आहे. कबुतरांच्या माध्यमातून हेरगिरी केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप किनार्‍यावर मच्छिमारांच्या बोटीतून हे कबूतर पकडण्यात आले. या कबुतराला काही दिवसांपूर्वी मच्छिमारांनी पकडून पारादीप येथील सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. जगतसिंगपूरचे एसपी राहुल पीआर यांनी सांगितले की, कबुतराची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि कबूतर कुठून आले हे...9 Mar 2023 / No Comment / Read More »

ओडिशात होणार ओबीसी सर्वेक्षण!

ओडिशात होणार ओबीसी सर्वेक्षण!भुवनेश्वर, (२ मार्च) – ओडिशा सरकारने राज्यातील ओबीसींचा सामाजिक आणि आर्थिक विकास तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ जुलैपर्यंत सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल. मागासवर्गीय लोकांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीची माहिती गोळा करणारे ओडिशा हे बिहारनंतरचे दुसरे राज्य ठरणार आहे. २०२४ च्या लोकसभा आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांपूर्वी, राज्याच्या लोकसंख्येच्या सुमारे ५४ टक्के असलेल्या मागासवर्गीय मतदारांना आकर्षित करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न म्हणून या हालचालीकडे पाहिले जात आहे. राज्य सरकार म्हणते की या सर्वेक्षणामुळे...2 Mar 2023 / No Comment / Read More »

जेएनयूच्या प्राध्यापकाच्या भाषणावरून तणाव

जेएनयूच्या प्राध्यापकाच्या भाषणावरून तणावभुवनेश्वर, (१३ फेब्रुवारी ) – भुवनेश्वर येथील उत्कल विद्यापीठात रविवारी आयोजित चर्चासत्रात झालेल्या भाषणाला विरोध करणारे आयोजक आणि श्रोते यांच्यात तणाव निर्माण झाला. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. घटनेनंतर लगेचच दोन्ही पक्षांनी शहीद नगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रारी केल्या. तक्रारींना दुजोरा देताना एका स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) प्राध्यापक सुरजित मजुमदार यांचे भाषण राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी नाकारल्याने ही...13 Feb 2023 / No Comment / Read More »

गिरधर गमांग यांचा भाजपात प्रवेश

गिरधर गमांग यांचा भाजपात प्रवेशनवी दिल्ली, [१२ जून] – ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरधर गमांग यांनी आज शुक्रवारी येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली आणि भाजपात प्रवेश करण्याची घोषणा केली. भाजपाध्यक्षांनीही गमांग यांच्या पक्ष प्रवेशाला मंजुरी दिली आहे. तथापि, पक्षप्रवेशाची औपचारिकता लवकरच भुवनेश्‍वर येथे पार पाडण्यात येणार आहे. गेमांग यांनी गेल्या ३० मे रोजी कॉंगे्रसचा राजीनामा दिला होता. भाजपाची धोरणे देशहिताची असल्यानेच आपण या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती गमांग...13 Jun 2015 / No Comment / Read More »