Posted by वृत्तभारती
Friday, March 6th, 2015
नवी दिल्ली, [५ मार्च] – देशाची राजधानी नवी दिल्लीत प्रचंड जनादेशासह सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीतील अंतर्गत कलहाला गुरुवारी वेगळेच वळण लागले असून, पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशानुसारच योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या संस्थापक सदस्यांची पक्षाच्या राजकीय व्यवहारविषयक समितीतून (पीएसी) हकालपट्टी करण्यात आल्याचा गौप्यस्फोट पक्षाचे वरिष्ठ नेते मयांक गांधी यांनी केला आहे. मयांक गांधी यांच्या या गौप्यस्फोटामुळे आपमधील या अंतर्गत कलहाला नवे वळण मिळण्याची शक्यता...
6 Mar 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, March 5th, 2015
=केजरीवालांचा राजीनामा नामंजूर= नवी दिल्ली, [४ मार्च] – आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हुकूमशाहसारखे वागतात, असा जाहीर आरोप पक्षाचे वरिष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केल्यानंतर या दोघांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) हकालपट्टी करण्यात आली आहे. योगेंद्र यादव यांचे प्रवक्तेपदही काढून घेण्यात आले. यामुळे या पक्षातील अंतर्गत कलह आता आणखीच पेटण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यादव आणि प्रशांत...
5 Mar 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 3rd, 2015
=प्रशांत भूषण, योगेंद्र यादव राजकीय समितीतून बाहेर?, बुधवारी निर्णय= नवी दिल्ली, [२ मार्च] – ऐतिहासिक विजयासह दिल्लीत सत्तेवर येऊन एक महिनाही पूर्ण न झालेल्या आम आदमी पार्टीत दोन गट पडले आहेत. पक्षाचे देणगीदार कोण, याबाबतची माहिती पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर टाकण्यात यावी, या मुद्यावरून पक्षात घमासान सुरू झाले असून, या मुद्यावरून बंडाचा झेंडा हाती घेणारे प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय झाला...
3 Mar 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 18th, 2015
=दिल्लीतील सर्वेक्षणाचा निष्कर्ष= नवी दिल्ली, [१७ फेब्रुवारी] – दिल्लीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मतदारांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा आणि सरकारी धोरणांमध्ये बरीच तफावत असल्याचे आढळून आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) आणि दक्ष यांनी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणाचे निष्कर्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठविण्यात आले आहेत. दिल्लीतील जनतेच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ब्लूप्रिंट तयार करण्यात यावी आणि उपस्थित करण्यात आलेले मुद्दे सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे....
18 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 17th, 2015
=पत्रकारांचा बहिष्कार= नवी दिल्ली, [१६ फेब्रुवारी] – दिल्लीचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या येथे सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत जोरदार गोंधळ उडाल्याचे सांगण्यात आले. या मागच्या कारणाचा शोध घेतला असता सचिवालयात प्रवेशबंदी केल्याने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या पत्रपरिषदेवर बहिष्कार घातल्याचे सांगण्यात आले. सोमवारी केजरीवाल सरकारची पहिली कॅबिनेट बैठक झाली. त्याबाबत माहिती देण्यासाठी सिसोदिया यांनी ही पत्रपरिषद आयोजित केली होती. तिला हजर राहण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी तेथे जाताच त्यांना सचिवालयात प्रसार माध्यमांना प्रवेशबंदी असल्याचे...
17 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 13th, 2015
=वकिलाने केला विधानसभा निवडणुकीत पराभव= नवी दिल्ली, [१२ फेब्रुवारी] – कृष्णानगर मतदारसंघात आपचे उमेदवार ऍड. एस. के. बग्गा यांनी किरण बेदी यांचा पराभव केला आणि दिल्लीतील वकिलांचा २७ वर्षापासून सुरू असलेला संघर्ष संपला. भाजपाने किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार जाहीर करताच दिल्लीतील वकिलांनी त्यांच्या नावाला प्रखर विरोध केला होता. लाठीहल्ल्याच्या त्या घटनेसाठी किरण बेदी यांनी माफी मागावी, अशी वकिलांच्या संघटनेची मागणी होती. आमचा विरोध भाजपाला नाही तर किरण बेदी यांना...
13 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 13th, 2015
=मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री होणार= नवी दिल्ली, [१२ फेब्रुवारी] – आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून शनिवार १४ फेब्रुवारीला रामलीला मैदानावर शपथ घेणार असून, आपल्या मंत्रिमंडळाची यादी गुरुवारी नायब राज्यपालांना सादर केली. याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी आपचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असा अंदाज आहे. मंत्रिमंडळात सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावे, असा केजरीवाल यांचा प्रयत्न आहे. दिल्ली विधानसभेच्या नियमानुसार मंत्रिमंडळात...
13 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 12th, 2015
=दिल्लीला मागितला राज्याचा दर्जा, केजरीवाल आज पंतप्रधानांना भेटणार= नवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणारे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि केंद्रीय नगर विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. राजनाथसिंह आणि नायडू यांच्या भेटीत केजरीवाल यांनी राजधानीतील अनधिकृत कॉलन्यांसोबतच दिल्लीला राज्याचा दर्जा मिळविण्याच्या मुद्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत आप नेते मनीष सिसोदिया हेदेखील उपस्थित...
12 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 10th, 2015
=दिल्लीत भाजपा आणि कॉंग्रेसला दणका, १४ ला केजरीवालांचा रामलीलावर शपथविधी= नवी दिल्ली, [१० फेब्रुवारी] – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाने यावेळी इतिहास घडवला असून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला अभूतपूर्व असे बहुमत मिळाले आहे. विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागा आम आदमी पार्टीने जिंकल्या आहेत. देशातील कोणत्याही निवडणुकीत याआधी एवढे एकतर्फी यश खचितच कोणा राजकीय पक्षाला मिळाले असावे. भाजपाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले असून,...
10 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 8th, 2015
=भाजपा दुसर्या स्थानावर, कॉंगे्रसचा पार सफाया= नवी दिल्ली, [७ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडताच सर्वच वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर केले. राजधानी दिल्लीतील सत्ता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीकडे जात असल्याचे यात दिसून आले आहे. अरविंद केजरीवाल यांचा पक्ष दिल्लीत स्पष्ट बहुमतासह सत्तेवर येणार असल्याचे भाकीत सर्वच एक्झिट पोल्सनी केले असून, त्या खालोखाल भाजपाला २८ ते ३२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला...
8 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 8th, 2015
नवी दिल्ली, [७ फेब्रुवारी] – राजधानीच्या सर्वांगीण विकासाकरीता दिल्लीतील जनता भाजपालाच मतदान करेल, असा विश्वास भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी व्यक्त केला आहे. मी स्वत: आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा दोन नेत्यांना एकाचवेळी निवडून देण्याची संधी दिल्लीकरांना प्राप्त झाली असून, त्यांनी याचा फायदा घ्यावा, असे किरण बेदी यांनी स्वत: मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. माझा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे, असे त्या म्हणाल्या. मला...
8 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 7th, 2015
=यंत्रणा सज्ज, चोख पोलिस बंदोबस्त= नवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या शनिवार ७ फेब्रुवारीला मतदान होत असून ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान सुरळीत आणि शांततेत व्हावे म्हणून निवडणूक आयोगाने संपूर्ण तयारी केली आहे. मंगळवारी १० फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाची वेळ एकतासाने कमी झाली आहे. मागील निवडणुकीत सकाळी ७...
7 Feb 2015 / No Comment / Read More »