|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:37 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.47° से.

कमाल तापमान : 27.44° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 46 %

वायू वेग : 2.07 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.47° से.

हवामानाचा अंदाज

24.33°से. - 28.53°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.54°से. - 27.92°से.

रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.65°से. - 28.47°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.82°से. - 29.11°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.08°से. - 28.83°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.33°से. - 28.71°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल

केजरीवाल, देवही तुम्हाला माफ करणार नाही

केजरीवाल, देवही तुम्हाला माफ करणार नाही=प्रशांत भूषण यांचा हल्ला= नवी दिल्ली, [४ एप्रिल] – आम आदमी पार्टीच्या सर्वच महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आलेले प्रशांत भूषण यांनी पुन्हा एकदा आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रखर शाब्दिक वार केले. पक्षाला ज्या स्थितीत तुम्ही आणले आहे आणि आपण सध्या जे काही करीत आहात, त्यासाठी कदाचित देवही तुम्हाला माफ करणार नाही, असे भूषण यांनी केजरीवालांना पत्र लिहून म्हटले आहे. ‘तुम्हाला पक्षाची संपूर्ण सूत्रे आपल्या हातात हवी...6 Apr 2015 / No Comment / Read More »

कुमार विश्‍वासना पत्नीने रंगेहात पकडले होते

कुमार विश्‍वासना पत्नीने रंगेहात पकडले होते=खळबळजनक खुलाशामुळे आपच्या अडचणी वाढल्या= नवी दिल्ली, [३० मार्च] – आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्या नाराजीनाट्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आपमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. त्यातच, पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते कुमार विश्‍वास यांच्यासंदर्भातील एका खळबळजनक खुलाशाने आपच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान, अमेठी मतदारसंघात एका महिला कार्यकर्तीसोबत विश्‍वास यांना त्यांच्या पत्नीने आक्षेपार्ह स्थितीत पकडले होते, असा खुलासा त्यांच्याच एका ई-मेलच्या...31 Mar 2015 / No Comment / Read More »

केजरीवालांची भूषण, यादवांना शिवीगाळ

केजरीवालांची भूषण, यादवांना शिवीगाळ=नवा व्हिडीओ जारी= नवी दिल्ली, [२९ मार्च] – स्टिंगच्या माध्यमातून इतर राजकीय पक्षांची शिकार करणार्‍या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल स्वत:च स्वकियांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चांगलेच अडकले आहेत. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना केजरीवाल शिवीगाळ करीत असल्याचा नवा स्टिंग व्हिडीओ आता बाहेर आला आहे. आपल्याच लोकांनी आपल्याला धोका दिला, अशा लोकांना बाहेरचाच रस्ता दाखवायला हवा, असे ते या व्हिडीओत सांगत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ आज रविवारचाच...30 Mar 2015 / No Comment / Read More »

यादव, भूषण, आनंदकुमार यांची हकालपट्टी

यादव, भूषण, आनंदकुमार यांची हकालपट्टी= ‘आप’कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी व आरोप प्रत्यारोप= नवी दिल्ली, [२८ मार्च] – अन्य राजकीय पक्षांपेक्षा वेगळे राजकारण करण्याचा दावा करून अभूतपूर्व जनादेशासह राजधानी दिल्लीत सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आज शनिवारी झालेल्या वादळी बैठकीत पक्षाचे संस्थापक सदस्य योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यासह चौघांची राष्ट्रीय परिषदेतून हकालपट्टी करण्यात आली. बैठकीत आम्हाला बोलू देण्यात आले नाही, समर्थकांना मारहाण करण्यात आली, ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप योगेंद्र यादव आणि प्रशांत...29 Mar 2015 / No Comment / Read More »

आपचे राजकारण अपरिपक्व

आपचे राजकारण अपरिपक्व=संधीचे सोने करून दाखवा : अरुण जेटली यांचा सल्ला= वाराणसी, [२८ मार्च] – आम आदमी पार्टीत सध्या जो अंतर्गत कलह सुरू आहे, तो त्यांच्या अपरिपक्व राजकारणाचेच प्रतीक आहे, असा चिमटा काढतानाच, अशाप्रकारे लाथाळ्या करण्यापेक्षा या पक्षाने दिल्लीकरांनी दिलेल्या संधीचे सोने करून दाखवायला हवे, असा सल्ला भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे. दिल्लीकरांनी मोठ्या अपेक्षेने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला भरघोस मतदान केले. इतर राजकीय...29 Mar 2015 / No Comment / Read More »

राजेश गर्ग आपमधून निलंबित

राजेश गर्ग आपमधून निलंबितनवी दिल्ली, [१६ मार्च] – आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गेल्या वर्षी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी कॉंगे्रसच्या सहा आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करणारे आपचे माजी आमदार राजेश गर्ग यांना आज सोमवारी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. राजेश गर्ग यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी नेहमीच पक्षाच्या विरोधात काम केले असल्यानेच ही कारवाई करणे भाग पडले, असे आपमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. काही...17 Mar 2015 / No Comment / Read More »

‘आप नेपोलियन नाही’

‘आप नेपोलियन नाही’=पक्षांतर्गत कलहांवर प्रथमच केजरीवाल बोलले= बंगळुरू, [१४ मार्च] – आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतर्गत कलहावर प्रथमच मौन तोडले असून, दिल्लीतील विजयानंतर इतर राज्यांच्या निवडणुकीत सहभागी होऊन विजययात्रा सुरू करायला ‘आप’ म्हणजे नेपोलियन नाही, या शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विविध मुद्यांवर पक्षांतर्गत मतभेद आणि स्टिंग ऑपरेशनमुळे आपमध्ये वाद सुरू असताना, केजरीवाल मात्र बंगळुरूमध्ये निसर्गोपचार घेत आहेत. जिंदल निसर्गोपचार...15 Mar 2015 / No Comment / Read More »

केजरीवालांनंतर आता संजय सिंह यांचे स्टिंग

केजरीवालांनंतर आता संजय सिंह यांचे स्टिंग=‘आप’मध्ये घमासान सुरूच, आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देण्याची तयारी= नवी दिल्ली, [१२ मार्च] – इतर पक्षातील लोकांना अडकविण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करण्यात हातखंडा असलेल्या आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेतेच आता या जाळ्यात अडकत चालले असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह यांचे एक स्टिंग समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, यामुळे आपच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी संजय सिंह यांनी आपल्याला मंत्रिपदाचे आमिष दाखविले होते,...13 Mar 2015 / No Comment / Read More »

आपच्या पराभवासाठी यादव, भूषण यांनी केले प्रयत्न

आपच्या पराभवासाठी यादव, भूषण यांनी केले प्रयत्न=चार वरिष्ठ नेत्यांचा आरोप, राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी होणार= नवी दिल्ली, [१० मार्च] – योगेंद्र यादव, शांतिभूषण आणि प्रशांतभूषण यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात आम आदमी पार्टीच्या पराभवासाठी आणि अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा डागाळण्यासाठी नेटाने प्रयत्न केले होते, असा आरोप पक्षातील चार वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. दरम्यान, यादव आणि भूषण यांची आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी होणार असल्याचे चिन्ह आहे. या दोघांचीही पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आपमधील वाद...11 Mar 2015 / No Comment / Read More »

दिल्ली झाली ‘रेप कॅपिटल’

दिल्ली झाली ‘रेप कॅपिटल’=दोन महिन्यात ३०० बलात्कार, विनयभंगाची ५०० प्रकरणे= नवी दिल्ली, [८ मार्च] – महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आणि उपाय करण्यात आल्यानंतरही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढच होत असल्याचेच दिसून येत आहे. २०१५ च्या पहिल्या दोन महिन्यातच राजधानी दिल्लीत बलात्काराच्या ३०० आणि विनयभंगाच्या ५०० च्या वर घटना उजेडात आल्या आहेत. आज महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेली आकडेवारी पाहून राजधानीतील परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे दिसून येते. शहराचे इतके भीषण वास्तव समोर आले असतानाही,...9 Mar 2015 / No Comment / Read More »

‘आप’ सोडण्यासाठी माझ्यावर दबाव

‘आप’ सोडण्यासाठी माझ्यावर दबाव=मयंक गांधी यांचा आरोप= नवी दिल्ली, [७ मार्च] – प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याची टीका आपण केल्यानंतर आम आदमी पार्टीतील एक शक्तिशाली गट मी पक्षातून बाहेर पडावे, यासाठी दबाव आणत आहे, असा स्पष्ट आरोप पक्षाचे वरिष्ठ नेते मयंक गांधी यांनी केला आहे. भूषण आणि यादव यांची अलीकडेच पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला. या कारवाईचा आपण निषेध केला...8 Mar 2015 / No Comment / Read More »

‘आप’मधील कलहामुळे लोकांचा भ्रमनिरास

‘आप’मधील कलहामुळे लोकांचा भ्रमनिरास=कासमी यांचे मत= बिजनौर, [७ मार्च] – आम आदमी पार्टीतील अंतर्गत कलहामुळे स्वच्छ आणि पारदर्शी राजकारणाची अपेक्षा असलेल्या सर्वसामान्य लोकांचा भ्रमनिरास झाला आहे, असे मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील सहकारी मुफ्ती शामुम कासमी यांनी म्हटले आहेे. आपला जनतेने सरकार स्थापन करण्यासाठी ऐतिहासिक असाच जनादेश दिला. जनतेला त्यांच्याकडून स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची अपेक्षा होती. पण, पक्षातील कलहाने जनता निराश झाली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची...8 Mar 2015 / No Comment / Read More »