Posted by वृत्तभारती
Sunday, June 28th, 2015
=१५ दिवसात मागितले उत्तर= लखनौ, [२७ जून] – दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पार्टीच्या बोधचिन्हाचे (लोगो) प्रारूप तयार करणारे सुनील लाल यांनी आज शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस जारी करून, १५ दिवसांत उत्तर मागितले आहे. मोठ्या विश्वासाने मी केजरीवाल यांच्या पक्षाकरिता बोधचिन्ह तयार केले. पण, हा पक्ष आपल्या मूळ विचारधारेपासून बराच दूर गेला आहे. पक्षात सामान्य कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या पक्षासोबत मी आपले संबंध संपुष्टात...
28 Jun 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, June 16th, 2015
=वाद अधिकारांचा, राजनाथसिंहांचा केजरीवाल, सिसोदियांना सल्ला= नवी दिल्ली, [१५ जून] – दिल्लीत प्रशासन चालविताना अधिकारांच्या न्यायालयीन लढाईत झटका बसल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली आणि सरकारशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा केली. वारंवार संघर्षाची भूमिका घेऊ नका, असा सल्ला राजनाथसिंह यांनी या भेटीत केजरीवालांना दिला. दिल्लीचा राज्यकारभार चालविण्याबाबत केंद्र सरकारने जी नियमावली जारी केली आहे, ती राज्यघटनेनुसार आणि केंद्रशासित प्रदेश...
16 Jun 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, June 16th, 2015
=सहा टक्क्यांची दरवाढ= नवी दिल्ली, [१५ जून] – कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आश्वासनही फोल ठरले आहे. दिल्ली वीज नियामक मंडळाने (डीईआरसी) आज सोमवारपासून विजेच्या दरात सहा टक्क्यांनी वाढ केली आहे. सोबतच, बीएसईएस यमुना आणि बीएसईएस राजधानी या कंपन्यांनीही सहा टक्के आणि टाटा पॉवरने चार टक्के इतकी दरवाढ जाहीर केली. वीज आणि पाणी स्वस्त करण्याच्या केजरीवालांच्या आश्वासनावर विश्वास ठेवूनच दिल्लीकरांनी त्यांच्या आम आम आदमी पार्टीला...
16 Jun 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, June 10th, 2015
=केजरीवाल सरकारला जोरदार झटका, बोगस पदवीचे प्रकरण भोवले= नवी दिल्ली, [९ जून] – दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला आज मंगळवारी जबरदस्त झटका बसला. विधि विषयाची बोगस पदवी सादर करणारे केजरीवाल सरकारमधील कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना पोलिसांनी आज त्यांच्या घरातच बेड्या ठोकल्या आणि पुढील चौकशीसाठी हौज खासा पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याविरोधात भादंविच्या विविध कलमांखाली एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई म्हणजे सीएनजी फिटनेस घोटाळ्याची चौकशी करण्यापासून रोखण्यासाठी केंद्राच्या दबावतंत्राचा...
10 Jun 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, June 10th, 2015
=भाजपाची जळजळीत टीका, केजरीवालांच्या राजीनाम्याची कॉंगे्रसची मागणी= नवी दिल्ली, [९ जून] – अरविंद केजरीवाल सरकारमधील विधिमंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना बोगस पदवी प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी आम आदमी पार्टीच्या सरकारवर सडकून टीका केली आहे. दिल्लीच्या राजकारणासाठी आज सर्वाधिक काळा दिवस ठरला आहे, अशी खरमरीत प्रतिक्रिया भाजपाने दिली. तर, कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या निवासाबाहेर आंदोलन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तोमर यांनी बोगस पदवी सादर केली असल्याची...
10 Jun 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, June 7th, 2015
=योगेंद्र यादव यांनी डागली तोफ= वाराणसी, [६ जून] – राजधानी दिल्लीत नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात सध्या सुरू असलेला संघर्ष म्हणजे केवळ अहंकाराचा वाद असून, केजरीवाल यांचे एकूणच वागणे बालिशपणाचे आहे, अशा शब्दात आम आदमी पार्टीचे बडतर्फ नेते योगेंद्र यादव यांनी आज शनिवारी केजरीवालांवर तोफ डागली. आपमधून बाहेर पडल्यानंतर यादव यांनी स्वराज अभियान नावाची राजकीय चळवळ स्थापन केली आहे. आमची चळवळ राजकारणाशी संबंधित असली, तरी आम्ही...
7 Jun 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, May 25th, 2015
नवी दिल्ली, [२४ मे] – अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीला दिल्लीत सत्तेवर येऊन आज रविवारी शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. पण, शंभर दिवसांचा हा कार्यकाळ केजरीवाल ऍण्ड कंपनीचा सत्तेसाठीचा संघर्ष आणि नौटंकी यातच वाया गेला असल्याची सर्वसाधारण भावना दिल्लीकरांकडून व्यक्त केली जात आहे. केजरीवाल यांनी वीजदरात ५० टक्के सवलत आणि महिन्याला २० हजार लिटर मोफत पाणी यासह अनेक मोठमोठी वचने दिल्लीकरांना दिली होती. पण, या शंभर दिवसात सरकारने...
25 May 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, May 17th, 2015
=केजरीवाल-जंग यांच्यात संघर्षाचा भडका= नवी दिल्ली, [१६ मे] – दिल्ली सरकारचा विरोध झुगारून शकुंतला गॅमलीन यांनी आज शनिवारी हंगामी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात संघर्षाचा भडका उडाला असून, केजरीवाल यांनी हे प्रकरण थेट राष्ट्रपतींच्या दरबारी नेण्याचे ठरविले आहे. नायब राज्यपालांनी गॅमलीन यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले होते. तथापि, केजरीवाल यांनी त्यास विरोध दर्शविला होता. सरकारमधील वरिष्ठ अधिकार्याने गॅमलीन यांना पत्र पाठवून,...
17 May 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 5th, 2015
=महिला आयोगाने बजावली नोटीस= नवी दिल्ली, [४ मे] – स्वच्छ राजकारणाचे धडे देण्याच्या गप्पा करून देशाच्या राजकारणात उतरलल्या आम आदमी पार्टीवरील संकटांची मालिका कमी होण्याऐवजी सातत्याने वाढतच आहे. स्टिंग ऑपरेशन, बंडखोरी, शेतकर्याने पक्षाच्या रॅलीत केलेली आत्महत्या आणि बोगस पदवी यासारख्या प्रकरणांतून अजूनही बाहेर न आलेल्या आम आदमी पार्टीचे सर्वात विश्वसनीय नेते कुमार विश्वास आता नव्या वादात अडकले आहेत. एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप विश्वास यांच्यावर करण्यात येत असून, यामुळे...
5 May 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, April 29th, 2015
=विधिमंत्र्याची शैक्षणिक पदवीच निघाली बोगस, हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश= नवी दिल्ली, [२८ एप्रिल] – स्वच्छ राजकारण, प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहार अशा मोठमोठ्या गप्पा मारून दिल्लीच्या राजगादीवर विराजमान झालेल्या अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आणि त्यांचे सरकार आता नव्या वादात अडकले आहे. केजरीवाल सरकारमधील विधिमंत्री जितेंद्रसिंह तोमर यांची कायद्याची पदवीच बोगस निघाल्याने दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तोमर यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना आपण विधि विषयातील पदवीधर असल्याचे...
29 Apr 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, April 23rd, 2015
=केजरीवालांची कोलांटउडी= नवी दिल्ली, [२२ एप्रिल] – दिल्लीकरांना मोठमोठी वचने देऊन आणि आपण इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे आहोत, असे चित्र रेखाटून घवघवीत मताधिक्याने दिल्लीच्या सत्तेवर आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी युटर्न घेत, निवडणूक काळात दिलेल्या सर्वच वचनांची पूर्तता करणे शक्य होणार नसून, ४० ते ५० टक्के आश्वासनांची पूर्तता करण्यावर आपला भर राहील, अशी भूमिका घेतली आहे. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला सत्तेचा कौल दिला असून, संपूर्ण पाच वर्षे आम्ही सत्तेवर राहणार आहोत....
23 Apr 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, April 9th, 2015
=सुनील लाल यांची मागणी= नवी दिल्ली, [८ एप्रिल] – आम आदमी पार्टीतील अंतर्गत कलह आता चांगलाच शिगेला पोहोचला आहे. एका व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांना आपली वॅगन आर कार परत मागितली असतानाच, पक्षाचे बोधचिन्ह (लोगो) तयार करणारे सुनील लाल यांनी चक्क आपने आपले संकेतस्थळ, पत्रके, झेंडे आणि पोस्टर्सवर आपण तयार केलेले बोधचिन्ह वापरू नये, असे स्पष्ट करून त्यावर आपला मालकी हक्कच सांगितला आहे. आपने माझे बोधचिन्ह परत करावे, अशी मागणीही त्यांनी...
9 Apr 2015 / No Comment / Read More »