Posted by वृत्तभारती
Saturday, February 7th, 2015
नवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत सुशासन विरुद्ध अराजक असा प्रमुख मुद्दा असून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि भाजपाचेच सरकार बनेल, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज व्यक्त केला. ११, अशोका रोड या भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जेटली म्हणाले की, दिल्ली हा देशाचा चेहरा असल्यामुळे येथील निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. दिल्लीत भाजपाच्या किरण बेदी आणि आम आदमी पार्टीचे अरविंद...
7 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 7th, 2015
नवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] – जातीयवादी शक्तींपासून मुस्लिमांना मोठा धोका निर्माण झाला आहे, असे सांगत, जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी दिल्लीतील मुस्लिमांनी केवळ आम आदमी पार्टीलाच मतदान करावे, असा फतवा जारी केला आहे. तथापि, आपने बुखारींचा पाठिंबा घेण्यास नकार दिला. दिल्लीत प्रामाणिक आणि धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेवर यावे आणि त्यासाठी मुस्लिमांना मोठी भूमिका पार पाडायची आहे. समाजाचे विभाजन करणार्या शक्तींनाच भाजपाने आपला पाठिंबा दिला असल्याने दिल्लीतील मुस्लिमांनी या...
7 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 6th, 2015
दिल्ली विधानसभा निवडणूक ४५ जागा मिळण्याचा अंदाज आपला २५ जागा आरडीआयचा सर्व्हे नवी दिल्ली, [५ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे ४८ तास शिल्लक राहिले असताना राजकीय पारडे आपल्या बाजूने झुकविण्यात भाजपाला अंतिम टप्प्यात यश आल्याचे दिसत आहे. रीसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (आरडीआय) या संस्थेच्या सर्वेक्षणात भाजपाने मुसंडी मारली असून, भाजपाला ४१ ते ४५ च्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर आम आदमी पार्टीला २५ जागा मिळण्याचा अंदाज...
6 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 6th, 2015
नवी दिल्ली, [५ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आज गुरुवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी हजारो मतदारांशी संपर्क केला असून, आपण या निवडणुकीत पराभूत होण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी उतरल्याचा दावा केला आहे. किरण बेदी गुरुवारी सकाळी प्रचारासाठी बाहेर पडल्या. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने पाच वाजण्यापूर्वी जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क करण्याचा सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रयत्न सुरू होता. वर्षभरात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ येऊ नये यासाठी दिल्लीच्या...
6 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 4th, 2015
=अरुण जेटली यांचा आरोप= नवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला चार दिवसच उरले असताना, आम आदमी पार्टीला मिळणार्या निधीवरून राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. आम आदमी पार्टी देणग्यांच्या माध्यमातून आपला काळा पैसा पांढरा करीत असल्याचा आरोप आवाम या स्वयंसेवी संस्थेने केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या पक्षावर थेट हल्ला करताना, ‘आप’चा निधी हवालामार्गे आला असल्याची तोफ डागली आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाला मिळणार्या निधीचा...
4 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 4th, 2015
=भाजपाचे व्हिजन डाक्युमेंट प्रकाशित= नवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] – राजधानी दिल्ली वर्ल्ड क्लास करण्याची आणि दिल्लीच्या जनतेला सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही भाजपाच्या व्हिजन डाक्युमेंटमधून देण्यात आली आहे. संपूर्ण राजधानीचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या भाजपाच्या व्हिजन डाक्युमेंटचे आज दिल्ली प्रदेश भाजपा कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. यावेळी केंद्रीय खत आणि रसायन मंत्री अनंतकुमार, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन, भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, दिल्ली प्रदेश...
4 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 3rd, 2015
=हायकोर्टाची नोटीस= नवी दिल्ली, [२ फेब्रुवारी] – स्वत:ला नवी दिल्लीचे रहिवासी असल्याचे बेकायदेशीरपणे जाहीर केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी विनंती करणार्या कॉंगे्रसच्या किरण वालिया यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज सोमवारी केजरीवाल यांना नोटीस जारी केली आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेले केजरीवाल यांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी आपण दिल्लीचे नागरिक असल्याचे नमूद केले आहे. या प्रकाराची...
3 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 3rd, 2015
=११ जण जखमी= नवी दिल्ली, [२ फेब्रुवारी] – येथील भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या कृष्णानगरस्थित कार्यालयावर सोमवार, २ रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हल्लेखोर बेदी यांच्या विरोधात घोषणा देत होते. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या मारहाणीत ११ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे किरण बेदी या कृष्णानगर मतदारसंघातूनच निवडणूक लढवित आहेत आणि तिथेच त्यांचे कार्यालयही आहे. स्वत: किरण बेदी...
3 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 3rd, 2015
नवी दिल्ली, [२ फेब्रुवारी] – राजधानी दिल्लीचा विकास फक्त भाजपाच करू शकते, त्यामुळे दिल्लीत भाजपाला विजयी करा, असे आवाहन करताना स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त दिल्लीसाठी भाजपा कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली. दिल्ली प्रदेश भाजपा कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत गडकरी म्हणाले की, केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार आल्यानंतर दिल्लीच्या विकासाचे अनेक निर्णय घेण्यात आले. दिल्लीशी संबंधित अनेक समस्या सोडविण्यात आल्या. केंद्रात नरेंद्र मोदी...
3 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 31st, 2015
नवी दिल्ली, [३० जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने किरण बेदी यांना आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केले असले आणि कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडे असले तरी या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या १० टक्केदेखील नाही. ७० जागांसाठी होणार्या निवडणुकीत ६७३ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी महिला उमेदवारांची संख्या फक्त ६३ आहे. महिलांना राजकारणात ३३ टक्के प्रतिनिधित्व देण्याच्या गोष्टी होत असताना ही संख्या अतिशय नगण्य आहे. भाजपाने सर्वाधिक म्हणजे आठ महिला...
31 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 30th, 2015
=तेव्हा कुठे होती केजरीवालांची नैतिकता= नवी दिल्ली, [२९ जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर रोज पाच प्रश्नांची सरबत्ती करण्याचा निर्णय भाजपाने गुरुवारी घेतला असून, त्याप्रमाणे पत्रपरिषदेत भाजपा प्रवक्ते आणि केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रुडी आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन हे पाच प्रश्न विचातील, केजरीवाल यांनी उत्तरे द्यावी, अशी मागणी केली आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेताना केजरीवाल यांच्या खोट्या...
30 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 28th, 2015
नवी दिल्ली, [२७ जानेवारी] – प्रजासत्ताक दिनाचा शानदार समारंभ आटोपताच राजधानी दिल्लीला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आम आदमी पार्टीचे समन्वयक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आपच्या पोस्टरबाजीमुळे संतापलेल्या बेदी यांनी, या पोस्टर्सवर परवानगी न घेता आपला फोटो लावण्यात आल्याचा आक्षेप घेतला आहे. ‘हा फोटो तत्काळ हटवण्यात यावा अन्यथा मला कायदेशीर कारवाई करावी लागेल,’ असा इशारा बेदी यांनी नोटीसद्वारे...
28 Jan 2015 / No Comment / Read More »