Posted by वृत्तभारती
Saturday, December 19th, 2020
मिदनापूर, १९ डिसेंबर – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आजचा बंगाल दौरा भाजपासाठी राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा ठरला. तृणमूल कॉंगे्रसचे दिग्गज नेते आणि आमदार सुवेंदू अधिकारी यांच्यासह एकूण नऊ आमदार आणि एका खासदाराने आज शनिवारी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तृणमूलचे खासदार सुनील मंडल यांनीही भाजपाचे कमळ हातात घेतले. मागील काही दिवसांपासून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली होती. आज भाजपात प्रवेश करणार्यांमध्ये तृणमूलचे पाच, माकप, भाकप...
19 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 19th, 2020
सुवेंदू अधिकारी यांचे बंगालवासीयांना खुले पत्र, कोलकाता, १९ डिसेंबर – तृणमूल कॉंगे्रसचा राजीनामा देऊन भाजपात सहभागी झालेले सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी बंगालवासीयांना खुले पत्र लिहिले आहे. पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या सर्वांसमोर पर्याय खुला आहे. तृणमूलच्या अत्याचारातून बंगालला मुक्त करण्यासाठी फक्त भाजपाचीच निवड करा, असे आवाहन त्यांनी या पत्रातून केले आहे. ममता बॅनर्जी आज तृणमूल कॉंगे्रसला आपल्या घरची संपत्ती समजत आहेत. मी म्हणजेच तृणमूल असे त्या मानत आहेत. कोणताही...
19 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 18th, 2020
कोलकाता, १८ डिसेंबर – सुवेंदू अधिकारी यांच्या पाठोपाठच तृणमूल कॉंगे्रसचे आमदार शीलभद्र दत्त आणि पक्षाच्या अल्पसंख्यक विभागाचे महासचिव कबिरूल इस्लाम यांनीही आज शुक्रवारी राजीनामा दिला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी दोन मोठे धक्के बसले असून, भाजपा माझ्या पक्षाच्या नेत्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले दत्ता यांनी पत्रपरिषदेत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. मी आपला राजीनामा ममता बॅनर्जीना ई-मेल केला आहे....
18 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 17th, 2020
ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का, कोलकाता, १६ डिसेंबर – पश्चिम बंगालमध्ये विशेष प्रस्थ असलेले तृणमूल कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला. अलीकडेच त्यांनी मंत्रिपदही सोडले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. अधिकारी आता लवकरच तृणमूल कॉंगे्रसचाही राजीनामा देण्याची शक्यता असून, असे झाल्यास पश्चिम मिदनापूर आणि लगतच्या आदिवासी भागांमधील किमान ४० जागांवर परिणाम होणार आहे. अर्थात या सर्व जागा तृणमूलला मुकाव्या...
17 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 11th, 2020
संविधानाचे पालन झाले नाही भूमिका घ्यावी लागेल, केंद्र सरकारला पाठविला अहवाल, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचे संकेत, कोलकाता, ११ डिसेंबर – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर बुधवारी रात्री झालेली दगडफेकीची घटना केंद्र सरकार आणि राज्यपाल जगदीप धनकड यांनी गंभीरपणे घेतली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मुख्यमंत्री या नात्याने संविधानाचे पालन करण्याची जबाबदारी ममता बॅनर्जी यांची असून, त्याचे पालन झाले नाही, तर माझी भूमिका सुरू होईल, असा...
11 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 11th, 2020
तृणमूलच्या समर्थकांचे कृत्य, कोलकाता, १० डिसेंबर – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर बुधवारी रात्री तृणमूल कॉंगे्रसच्या गुंडांनी हल्ला केला. नड्डा सध्या पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आहेत. अयोध्या नगरजवळ हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नड्डा सुखरूप बचावले. मात्र, गुंडांनी भाजपाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या गाडीची तोडफोड केली. नड्डा यांच्या सुरक्षेत राहिलेल्या उणिवांबाबत केंद्र सरकारने ममता बॅनर्जी सरकारकडे अहवाल मागितला आहे. खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेल्या...
11 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 11th, 2020
ममतांच्या बोलण्यात अराजकता दिसते : नड्डा, कोलकाता, १० डिसेंबर – बुलेटप्रूफ कारमध्ये असल्याने मी सुदैवाने वाचलो, पण कैलास विजयवर्गीय यांच्या हाताला दगडाचा गंभीर मार बसला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांच्या गुंडांनी दहशत निर्माण केली आहे. आमच्यावर असे कितीही हल्ले झाले, तरी भाजपा थांबणार नाही. आता आपल्याला ममतांचा नव्हे, तर रवींद्रनाथ टागोर यांच्या स्वप्नातील बंगाल घडवायचा आहे, आम्ही चालत राहणार, लोक आमच्याशी आपोआपच जुळले जाणार आहेत, पुढील सरकार भाजपाचे असेल,...
11 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 9th, 2020
कोलकाता, ९ डिसेंबर – ममता बॅनर्जी आणि असहिष्णुता या दोन्ही गोष्टी आता समानार्थी झाल्या आहेत, असा घणाघाती हल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज बुधवारी येथे चढविला. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा दोनशेपेक्षा जास्त जिंकून सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नड्डा दोन दिवसांच्या बंगाल दौर्यावर आले आहेत. कॉंगे्रस, तृणमूल कॉंगे्रससह काही राजकीय पक्ष घराणेशाहीच्या राजकारणालाच महत्त्व देत असतात. या पक्षांमध्ये मालकशाही आहे आणि त्यांच्याच आदेशानुसार...
9 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 27th, 2020
विधानसभेच्या किमान ४५ जागांवर होणार परिणाम, कोलकाता, २७ नोव्हेंबर – तृणमूल कॉंगे्रसचे वजनदार नेते आणि वाहतूक मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आज शुक्रवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते अद्याप पक्षात कायम असले, तरी लवकरच ते पक्षाचाही त्याग करण्याची शक्यता आहे. पश्चिम मिदनापूर आणि जंगलमहल या आदिवासीबहुल प्रांतात त्यांचे प्रचंड वर्चस्व असून, त्यांनी पक्षत्याग केल्यास, तेथील किमान ४५ जागांवर परिणाम होणार आहे. नंदिग्राम आंदोलनात अधिकारी यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यांच्यामुळेच २०११ मध्ये...
27 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 7th, 2020
कोलकाता, ६ नोव्हेंबर – पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपा सरकार स्थापन करणार आहे, असा विश्वास भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शुक्रवारी येथे व्यक्त केला. ममता बॅनर्जी सरकारच्या हुकूमशाही कारभाराला राज्यातील जनता वैतागली आहे. त्यांना बदल हवा असून, यासाठी ते भाजपाकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तन झालेले असेल. मी दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांचा दौरा केला...
7 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 2nd, 2020
सर्वेतून समोर आली माहिती, कोलकाता, २ नोव्हेंबर – पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा प्रभाव प्रचंड वाढला असून, एक चांगला आणि प्रामाणिक पक्ष म्हणून भाजपाची जनसामान्यांमध्ये ओळख तयार झाली आहे. तृणमूल कॉंग्रेसला ठोस पर्याय म्हणूनही लोक भाजपाकडे पाहात आहेत, असे एका ताज्या पाहणीतून आढळून आले आहे. भाजपाची ताकद वाढली असली, तरी काही भागांमध्ये भाजपाला अजूनही संघटनात्मक मुद्यांवर आणखी काम करण्याची गरज आहे, असेही यात दिसून आले आहे....
2 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, May 5th, 2016
कोलकाता, [५ मे] – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज गुरूवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. पूर्व मिदनापुर आणि उत्तर बंगालच्या कूच बिहार जिल्ह्यातील २५ मतदारसंघात हे मतदान पार पडणार आहे. १७० उमेदवारांच भविष्य मतदानपेटीत बंद होणार असून यात १८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. ५८ लाख मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ६७७४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहे. विशेषतः कुचबिहार जिल्हयातील सीमेवरील भागातील रहिवाशी स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच मतदानाचा...
5 May 2016 / No Comment / Read More »