|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

प्रत्येक बहिणीला लाडली बहनाच्या माध्यमातून लक्षाधीश बनविणार

प्रत्येक बहिणीला लाडली बहनाच्या माध्यमातून लक्षाधीश बनविणार– भाऊबिजेनिमित्त शिवराजसिंह चौहान यांनी केली घोषणा, भोपाळ, (१६ नोव्हेंबर) – मध्यप्रदेशातील प्रत्येक बहिणीला लाडली बहना, महिला बचत गटांच्या माध्यमातून लक्षाधीश बनविणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. चौहान यांच्या निवासस्थानी बुधवारी भाऊबीज कार्यक्रम आयोजित केला होता. महिलांनी मुख्यमंत्र्यांना औक्षण केले तसेच त्यांच्या विजयाची कामना व्यक्त केली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला. शिवराजसिंह चौहान म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक बहिणीला लक्षाधीश बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. घरातील...16 Nov 2023 / No Comment / Read More »

मध्यप्रदेश-छत्तीसगडमध्ये शुक्रवारी मतदान; प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मध्यप्रदेश-छत्तीसगडमध्ये शुक्रवारी मतदान; प्रचाराच्या तोफा थंडावल्यानवी दिल्ली, (१५ नोव्हेंबर) – छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात बुधवारी सायंकाळी ६ वाजता निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. छत्तीसगडमध्ये दुसर्या टप्प्यातील आणि मध्यप्रदेशात एकमेव टप्प्यातील मतदान शुक्रवारी होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यप्रदेशात जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशात भाजपाच्या प्रचाराचे सूत्र सांभाळले होते. भाजपाच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतर मोदी यांनी झारखंडमध्येही जोरदार प्रचार...15 Nov 2023 / No Comment / Read More »

छत्तीसगडमधील काँग्रेसच्या भ्रष्टाचार, धर्मांतरणावर राजनाथसिंह यांची टीका

छत्तीसगडमधील काँग्रेसच्या भ्रष्टाचार, धर्मांतरणावर राजनाथसिंह यांची टीका– महादेव अ‍ॅपवरून धरले धारेवर, रायपूर, (११ नोव्हेंबर) – भारताने कधीच कोणाच्या भूमीवर हल्ला करून ताबा घेण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु कोणी आपल्या देशावर हल्ला केला, तर त्यांना सोडणार नाही, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिला. याचवेळी त्यांनी छत्तीसगडमधील काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आणि येथे होणार्या धर्मांतरणावर जोरदार टीका केली. छत्तीसगडमधील सीतापूर, भरतपूर-सोनहाट आणि पाटण विधानसभा मतदारसंघांतील सभांना संबोधित करताना राजनाथसिंह यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर प्रहार करताना विकासात शून्य असल्याची टीका केली....12 Nov 2023 / No Comment / Read More »

काँग्रेस सत्तेत आल्यास नक्षलवाद वाढेल: पंतप्रधान मोदी

काँग्रेस सत्तेत आल्यास नक्षलवाद वाढेल: पंतप्रधान मोदीरायपूर, (०७ नोव्हेंबर) – काँग्रेस जेव्हा-जेव्हा सत्तेत येते, त्यावेळी अतिरेकी आणि नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढते, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. ते छत्तीसगडमधील सूरजपुरातील बिश्रामपूर येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करीत होते. नक्षलवादाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस जेव्हाही सत्तेत येते त्यावेळी देशातील अतिरेकी आणि नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढते. काँग्रेस सरकार नक्षलवादी हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. अलिकडच्या काळात भाजपाचे कित्येक कार्यकर्ते आपल्यापासून हिरावून घेण्यात...7 Nov 2023 / No Comment / Read More »

सत्तेत आल्यास ‘लव्ह जिहाद’, गो-तस्करी विरोधात कारवाई

सत्तेत आल्यास ‘लव्ह जिहाद’, गो-तस्करी विरोधात कारवाई– योगी आदित्यनाथ यांची छत्तीसगडमध्ये गर्जना, कावर्धा, (०५ नोव्हेंबर) – भाजपा छत्तीसगडमध्ये सत्तारूढ झाल्यास ‘लव्ह जिहाद’ आणि गो-तस्करीच्या नावाने अराजकता पसरवणार्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी गर्जना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. शनिवारी छत्तीसगडमधील कावर्धा विधानसभा मतदारसंघातील सभेला संबोधित करताना आदित्यनाथ यांनी काँग्रेस देश, समाज आणि जनतेसाठी समस्या असल्याचे म्हटले. छत्तीसगडमधील २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय ही चूक झाल्याचा उल्लेख करीत आदित्यनाथ म्हणाले की, रामनवमीच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली होती,...6 Nov 2023 / No Comment / Read More »

काँग्रेसने आदिवासींच्या हितासाठी काहीही केले नाही: नरेंद्र मोदी

काँग्रेसने आदिवासींच्या हितासाठी काहीही केले नाही: नरेंद्र मोदीसिवनी, (०५ नोव्हेंबर) – काँग्रेसने आदिवासींच्या हितासाठी कधीच काम केले नाही. दुसरीकडे काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते आपल्या मुलांना राजकारणात स्थापित करण्यासाठी आणि राज्यातील पक्ष संघटनेवर ताबा मिळविण्यासाठी एकमेकांशी लढत आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आले असता, त्यांनी सिवनी जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले, आम्ही प्रभू श्रीरामाला पुरुषोत्तम राम बनवणार्या आदिवासींचे शिष्य आणि उपासक आहोत. काँग्रेसवर निशाणा साधताना ते...6 Nov 2023 / No Comment / Read More »

राजकीय पक्ष जातीयवादाचे विष पसरवत आहेत!

राजकीय पक्ष जातीयवादाचे विष पसरवत आहेत!– मोदींनी साधला छत्तीसगडमध्ये काँग्रेसवर निशाणा,  रायपूर, (०४ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगडमधील दुर्ग येथे जाहीर सभेला संबोधित केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीत त्यांनी छत्तीसगडच्या भूपेश बघेल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजकीय पक्ष गरिबांमध्ये फूट पाडण्यासाठी नवनवीन कट रचत आहेत आणि जातीवादाचे विष पसरवत आहेत. कथित महादेव बेटिंग अ‍ॅप घोटाळ्यावरून त्यांनी छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आणि ते...4 Nov 2023 / No Comment / Read More »

काँग्रेस हा लूटमार आणि लबाडी करणारा पक्षः ज्योतिरादित्य सिंधिया

काँग्रेस हा लूटमार आणि लबाडी करणारा पक्षः ज्योतिरादित्य सिंधियाभोपाळ, (०४ नोव्हेंबर) – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी काँग्रेसला लूटमार आणि लबाडीचा पक्ष ठरवले आणि म्हणाले की जेव्हा विकासाचा विचार केला जातो तेव्हा ते नेहमी रिकाम्या तिजोरीबद्दल रडतात. १७ नोव्हेंबर रोजी होणार्‍या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंगवली मतदारसंघात प्रचार करताना भाजप नेते सिंधिया यांनी दावा केला की २००३ नंतर राज्यातील रस्ते मखमली झाले आहेत, तर काँग्रेस हा लबाड आणि लुटमारीचा पक्ष आहे. ते म्हणाले की, २००३ पूर्वी मध्य...4 Nov 2023 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदींनी आकांक्षाला दिलेले वचन केले पूर्ण

पंतप्रधान मोदींनी आकांक्षाला दिलेले वचन केले पूर्णरायपूर, (०४ नोव्हेंबर) – छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपले स्केच घेऊन आलेल्या मुलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे. मुलीला दिलेले वचन त्याने पाळले आणि आकांक्षाचे आभार मानले. पीएम मोदींनी आकांक्षाला लिहिलेल्या पत्रात स्केच मिळाल्याचे म्हटले आहे. पत्रात पंतप्रधानांनी छत्तीसगडच्या जनतेकडून मिळालेल्या प्रेमाचाही उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, छत्तीसगडमधील जनतेचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. गेल्या गुरुवारी पंतप्रधान मोदी छत्तीसगडमधील कांकेरमध्ये रॅली घेत होते. रॅलीदरम्यान एक मुलगी बराच...4 Nov 2023 / No Comment / Read More »

कमलनाथ यांचा देशपातळीतील, राज्यातील विविध घोटाळ्यांमध्ये हात : अमित शाह

कमलनाथ यांचा देशपातळीतील, राज्यातील विविध घोटाळ्यांमध्ये हात : अमित शाह– नातेवाईकांचे हित साधल्याचाही आरोप, शिवपुरी, (०४ नोव्हेंबर) – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंंत्री तसेच काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचा हात देशपातळीवरील आणि खुद्द त्यांच्या राज्यातील विविध घोटाळ्यांमध्ये आहे. त्यांनी मध्यप्रदेशाला आजारी केले, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी केला आहे. शिवपुरी जिल्ह्यातील करैरा येथे आयोजित प्रचारसभेत अमित शाह यांनी कमलनाथ आणि राहुल गांधी या दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली. सभेत नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. कमलनाथ यांनी...4 Nov 2023 / No Comment / Read More »

भाजपाने देशातील आदिवासींसोबत दुर्व्यवहार केला : राहुल गांधी

भाजपाने देशातील आदिवासींसोबत दुर्व्यवहार केला : राहुल गांधीजगदलपूर, (०४ नोव्हेंबर) – भाजपाने देशातील समस्त आदिवासींसोबत दुर्व्यवहार केला असून, त्यांना जंगल, जल आणि जमीन परत करावीच लागेल, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला. छत्तीसगडमध्ये येत्या मंगळवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून, राज्यात प्रचाराने जोर धरला आहे. भाजपा आणि काँग्रेसने मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील सभांना सर्वांत जास्त प्राधान्य दिल्याचे दिसून येते. राहुल गांधी यांनी शनिवारी जगदलपुरातील लालबाग मैदानात प्रचारसभेला संबोधित केले. भाजपाने आदिवासी बांधवांसाठी वनवासी हा शब्द तयार...4 Nov 2023 / No Comment / Read More »

छत्तीसगड विधानसभेचा पहिल्या टप्प्यातील प्रचार रविवारी संपणार

छत्तीसगड विधानसभेचा पहिल्या टप्प्यातील प्रचार रविवारी संपणार– २० विधानसभा मतदारसंघात ७ नोव्हेंबरला निवडणूक, नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला २० मतदारसंघात निवडणूक होणार आहे. येथील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावतील. माजी मुख्यमंत्री भाजपाचे डॉ. रमणसिंह तसेच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दीपक बैज यांच्यासह अनेकांचे भाग्य इव्हीएममध्ये बंद होणार आहे. पहिल्या टप्प्यात बस्तर विभागाच्या १२, तर दुर्ग विभागाच्या आठ मतदारसंघांचा समावेश आहे. हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. २०१८ मध्ये बस्तर विभागाच्या बारापैकी...4 Nov 2023 / No Comment / Read More »