Posted by वृत्तभारती
Tuesday, September 21st, 2021
नवी दिल्ली, २१ सप्टेंबर – कॉंग्रेसने पंजाबमध्ये नेतृत्वबदल केल्यानंतर आता राजस्थानमध्येही नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली, तर असंतुष्ट नेते सचिन पायलट यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला बळ मिळाले आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाने पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना राजीनामा देण्याचा आदेश देत, नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजितसिंग चन्नी यांची निवड केली. पंजाबमधील या घटनाक्रमानंतर राजस्थानमध्ये...
21 Sep 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, August 9th, 2021
राजस्थानच्या भाजपा प्रमुखांचे संकेत, जयपूर, ९ ऑगस्ट – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री सचिन पायलच भविष्यात भाजपात दाखल होऊ शकतात, असे संकेत राजस्थान भाजपाचे प्रमुख अब्दुल्लाकुट्टी यांनी दिले आहेत. त्यामुळे सचिन पायलट कॉंग्रेस पक्ष सोडतील, अशी शक्यता पुन्हा एकदा वर्तवली जात आहे. सचिन पायलट हे चांगले नेते आणि ते भविष्यात भाजपात येतील, असे मला वाटत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. मागील वर्षी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या विरोधात राजेश पायलट आणि त्यांच्या निष्ठावंत आमदारांनी...
9 Aug 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, June 15th, 2021
हरिद्वार, १५ जून – अशोक गहलोत सरकारविरोधात मनात ठासून भरलेला संताप पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचविण्यासाठी दिल्लीत आलेले कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांना चार दिवसांच्या मुक्कामात पक्षश्रेष्ठींनी भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पायलटांनी आज मंगळवारी दिल्ली सोडली आणि उत्तराखंडमध्ये दाखल झाले. ते आता हरिद्वारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिन पायलट दिल्लीहून जयपूरला दाखल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्यांनी अचानकच उत्तराखंड गाठले. तिथे त्यांनी आपल्या काही समर्थकांशी...
15 Jun 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, June 13th, 2021
आमदार वेदप्रकाश सोलंकी यांचा आरोप, जयपूर, १३ जून – राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. काही आमदारांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार वेदप्रकाश सोलंकी यांनी केला आहे. सोलंकी सचिन पायलट गटातील आमदार आहेत. कोणत्या आमदारांचे फोन टॅप केले जात आहेत, याची माहिती सोळंकी यांनी दिलेली नाही. मात्र, काही आमदारांनी फोन टॅप होत असल्याची माहिती दिल्याचा दावा त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राकडे केला आहे. काही आमदारांनी...
13 Jun 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, June 9th, 2021
मंत्रिमंडळ विस्तार करा, अन्यथा वेगळा मार्ग, जयपूर, ९ जून – राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार पुन्हा एकदा संकटात येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी उपमुख्यमंत्री सचिन पायलट गट आक्रमक झाला असून, जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करा अन्यथा स्वतंत्र मार्ग पत्करण्यासाठी आम्ही तयार असल्याचा इशारा पायलट गटाचे दिला आहे. गेहलोत गटाचे काही आमदारही पायलट गटाच्या संपर्कात असल्याने, मुख्यमंत्री गेहलोत गंभीर संकटात सापडण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या ११ जून रोजी सचिन पायलट यांचे...
9 Jun 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, April 9th, 2021
जयपूर, ९ एप्रिल – सचिन पायलट समर्थकांच्या बंडखोरीतून वाचल्यानंतर राजस्थानातील अशोक गहलोत सरकारवर पुन्हा एकदा अस्थिरतेचे ढग निर्माण झाले आहे. कॉंगे्रसच्या आठ आमदारांनी गहलोत सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करून बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. माजी मंत्री आणि आमदार भरतसिंह यांनी आपल्याच सरकारमधील खाण मंत्री प्रमोद जैन भाया यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. भरतसिंह यांनी कोटाच्या पोलिस महानिरीक्षकांना पत्र लिहिले असून, कॉंग्रेस कार्यकर्ते नरेश मीणा यांच्याविरुद्धची जुनी गुन्हेगारी प्रकरणे उकरून काढली...
9 Apr 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 23rd, 2021
आजवरची सर्वांत मोठी आयकर कारवाई, जयपूर, २३ जानेवारी – आयकर विभागाने सराफा आणि दोन स्थावर मालमत्ता व्यावसायिकांवर छापेमारी करून १४०० कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार उघडकीस आणला आहे. आयकर विभागाची ही आजवरची सर्वांत मोठी कारवाई आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आज शनिवारी दिली. या दोन्ही व्यावसायिकांच्या ३१ पैकी २१ ठिकाणांवर आयकर विभागाने गुरुवारी छापेमारी केली. एका स्थावर मालमत्ता व्यावसायिकाने मागील सहा ते सात वर्षांपासून केलेल्या बेनामी व्यवहारांचे तपशील...
23 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 10th, 2020
विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी अडचणी वाढण्याचे संकेत, जयपूर, १० डिसेंबर – राजस्थानात सत्तेत असूनही कॉंग्रेस पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माघारला असून, आगामी निवडणुकांसह मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासाठी आव्हाने वाढू शकतात, असा अंदाज राजकीय सूत्रांनी वर्तविला आहे. दरम्यान, या निवडणुकीतील विजयाने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सहाडा विधानसभा समिती अंतर्गत सहाडा पंचायत समितीच्या १५ प्रभागांपैकी १० प्रभाग भाजपा, तर ५ प्रभाग कॉंग्रेसने जिंकले आहेत. भिलवाडा जिल्ह्यात सहाडा जिल्हा परिषद...
10 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 7th, 2015
=आठ जिपंवर कॉंग्रेस विजयी= जयपूर, [६ फेब्रुवारी] – राजस्थानातील चुरशीच्या पंचायत निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपाने १७ जिल्हा परिषदांवर झेंडा फडकविला असून, ८ जिल्हा परिषदांवर कॉंग्रेस विजयी झाली आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीचे काम अजुनही सुरू आहे. राज्यात एकूण ३३ जिल्हा परिषदांपैकी २५ जिल्हा परिषदांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. यात १७ ठिकाणी भाजपा तर ८ ठिकाणी कॉंग्रेसने विजय मिळविला असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने दिली. ८ जिल्हा परिषदांचे निकाल अद्याप घोषित...
7 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 5th, 2015
रॉबर्ट वढेरांना झटका राजस्थान सरकारची कणखर भूमिका बिकानेर, [४ जानेवारी] – एका पैशाचीही गुंतवणूक न करता जमीन खरेदी करणारे आणि नंतर त्याच जमिनीच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमविणारे कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा चांगलेच अडचणीत आले आहेत. वढेरा यांच्या कंपनीसोबत झालेले सर्वच व्यवहार रद्द करून जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश राजस्थानमधील भाजपा सरकारने दिले आहेत. बिकानेरच्या कोलायत विभागातील ३६० हेक्टर जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातील...
5 Jan 2015 / No Comment / Read More »