किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– सोशल मीडियाला केंद्र सरकारचा इशारा,
– कायदा करण्याचा विचार : राजीव चंद्रशेखर,
नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – खोटी माहिती तसेच डीपफेक यांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवा कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज सांगितले. यासंदर्भात विचार करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी सोशल मीडियाच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या अधिकार्यांसोबत दोन बैठकी बोलावण्यात आल्या आहे. गुरुवारी होणार्या बैठकीत फोटो आणि व्हिडीओमध्ये केल्या जाणार्या फेरफारीबद्दल तर, शुक्रवारी होणार्या बैठकीत माहिती तंत्रज्ञान नियमांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीला मेटा, गुगल, फेसबुक आणि यूट्युबच्या अधिकार्यांना बोलावण्यात आले आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डीपफेकबाबतचे व्हिडीओ २४ तासांत हटवले नाही तर, कारवाईचा इशाराही चंद्रशेखर यांनी दिला आहे.
खोट्या माहितीला आळा घालण्यासाठी आम्ही आधीपासूनच कामाला लागलो आहे, एप्रिलमध्ये याबाबत काही नियमही तयार करण्यात आले. येथेच आम्ही थांबणार नाही, आवश्यक पडले तर, या प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही नवीन कायदाही करू, असे ते म्हणाले. इंटरनेट आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स हे समाजाच्या सशक्तीकरणासाठी आहे, पण आज दुर्देवाने त्याचा दुरुपयोग केला जात आहे. समाजात तणाव निर्माण करण्यासाठी, हिंसाचार पसरवण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान निर्माण करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. डीपफेकने तर नवे आव्हान उभे केले आहे, असे ते म्हणाले.
डीपफेकच्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक बोलवणार असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी सांगितले होते. भाजपातर्फे पत्रकारांसाठी आयोजित दिवाळीमिलन कार्यक्रमातही पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी डीपफेकबाबत चिंता व्यक्त केली होती.