Posted by वृत्तभारती
Tuesday, July 15th, 2014
=भारतीय अभियंत्याची कमाल= बंगळुरू, [१४ जुलै] – सध्या वाहनांसाठी आवश्यक असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. याशिवाय या नैसर्गिक इंधनाचा साठा संपल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. एका भारतीय अभियंत्यांने या प्रश्नाचे उत्तर शोधले असून, विजेवर आणि सौरऊर्जेवर चालणारी तीनचाकी रिक्षा तयार केली आहे. नवीन राबेल्ली असे या भारतीय अभियंत्याचे नाव असून, गेली दोन वर्षे त्यांनी एका जुन्या रिक्षाला वीज आणि...
15 Jul 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, July 15th, 2014
इंदूर, [१४ जुलै] – डायनॉसोरचे दुर्मिळ अवशेष मध्य प्रदेशातील नर्मदेच्या खोर्यात आढळून आले आहेत. या ठिकाणी साधारण सहा कोटी वर्षांपूर्वी हे अजस्त्र प्राणी वास्तव्य करीत असावेत, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. या अवशेषांमध्ये या महाकाय आणि नामशेष प्राण्याच्या विष्ठेचे अंश जीवाश्म स्वरूपात आढळून आले आहेत. या अवशेषांच्या सविस्तर अभ्यासातून डायनॉसोरच्या खाण्याच्या सवयींविषयीची आणि पर्यायाने त्यांच्या नामशेष होण्यामागच्या नेमक्या कारणांचा तपास करता येणार आहे. धार जिल्ह्यातील जगविख्यात मंडू या पर्यटन...
15 Jul 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, June 25th, 2014
मुंबई, [२४ जून] – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लोकप्रियता मिळविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशात सोशल नेटवर्किंग साईट्सचेही योगदान आहे. देशभरात उसळलेल्या ‘मोदी लाटे’चे रूपांतर त्सुनामीत झाल्याचे सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पाहायला मिळाले. मात्र, आता ही लाट सॉफ्टवेअर जगतातही आली असून संगणकातील ‘व्हायरस’ दूर करणारा ‘नमो’हा एक अँटी व्हायरस बाजारात दाखल झाला आहे. ‘इनोवेझिऑन’ नावाच्या कंपनीने या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्पित करण्यात आलेले...
25 Jun 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, June 20th, 2014
=भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचे संशोधन= लंडन, [२० जून] – रोज टोमॅटोची एक गोळी घेतल्याने रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारून हृदयविकार टाळता येतो असा दावा भारतीय वंशाचे वैज्ञानिक डॉ. जोसेफ चेरियन यांनी केला आहे. हृदयविकारासंबंधी संशोधन करणार्या वैज्ञानिकांच्या गटाचे डॉ. चेरियन प्रमुख असून त्यांनी शोधून काढलेली ‘टोमॅटोची गोळी’ भविष्यात वैद्यकीय विश्वात मोठीच क्रांती घडवून आणू शकते. विशेष म्हणजे ब्रिटिश संशोधकांनी टोमॅटोच्या या गोळीची चाचणी घेतली आहे. संशोधनातील हे निष्कर्ष पीएलओएस वन नियतकालिकात प्रसिद्ध झाले...
20 Jun 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, June 16th, 2014
=आता उरले केवळ शंभर दिवस, ७० टक्के प्रवास पूर्ण= बंगलोर, [१६ जून] – आजपासून बरोबर शंभर दिवसांनंतर भारत नवा इतिहास रचणार आहे. तपकिरी रंगाच्या मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी भारताने पाठविलेल्या मंगळयानाने ७० टक्के प्रवास पूर्ण केला असून, आजपासून शंभराव्या दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत दाखल होणार आहे. आतापर्यंत केवळ चार देशांनीच मंगळावर आपले यान पाठविले आहे. यात आता भारताचेही नाव सन्मानाने घेतले जाणार आहे. एकूणच,...
16 Jun 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, April 11th, 2014
पुणे, (१० एप्रिल) – माहिती तंत्रज्ञानाचे युग सुुरू झाल्यापासून भारतात आणि जगातही प्रत्येक महिना हा त्याच्या वापराबाबत नवा विक्रम करणारा ठरला आहे. अमेरिकेनंतर भारतात फेसबूक या सोशल साईटच्या युजर्सची संख्या सर्वाधिक असून त्यांचे १० कोटी ऍक्टिव्ह युजर्स असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दर महिन्याला भारतात १० कोटी युजर्स फेसबूक वापरतात आणि विशेष म्हणजे त्यापैकी ८ कोटी ४० लाख युजर्स मोबाईलवर फेसबूक ऍक्सेस करतात, असे फेसबूकच्या भारत विस्तार मोबाईल भागीदार विभागाचे...
11 Apr 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, April 6th, 2014
मुंबई, (५ एप्रिल) – सर्वाधिक वापरली जाणारी ई-मेल सेवा म्हणून लौकिक मिळवलेल्या जीमेलच्या दशकपूर्तीनंतर जीमेल अधिक ऍडव्हॉन्स होणार असून, त्यात नवे टॅब्स आणि नवीन फिचर्स सामील होणार आहेत. जीमेल वापरकर्त्यांचा अनुभव सुधारावा यासाठी जीमेलने प्रचंड मोठ्या स्पेससोबत आपल्या फिचर्समध्ये सातत्याने बदल केले आहेत. आता यात नवे टॅब्स, पिन, स्नूज अशा आणखी नव्या फिचर्सची भर पडणार आहे. सध्या जीमेलवर प्रायमरी, सोशल, प्रमोशन्स, फोरम्स आणि अपडेट्स असे पाच टॅप उपलब्ध आहेत. आता...
6 Apr 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 22nd, 2014
=ठाण्याच्या विद्यार्थ्यांचा अनोखा शोध= ठाणे, (२१ मार्च) – आजकाल घराला कुलूप लावून बाहेर जाताना अनेकांना घरावर दरोडा पडण्याची किंवा चोरी होण्याची भीती असते. परंतु, ठाण्याच्या सहा अल्पवयीन विद्यार्थ्यांनी एका नव्या उपकरणाचा शोध लावला असून, या उपकरणामुळे घरफोड्यांपासून घरांना वाचविणे शक्य होणार आहे. ‘रोबो नंदी’ असे ठाण्याच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नव्या उपकरणाचे नाव असून, कोणीही घरात प्रवेश करण्याचा किंवा चोरीचा प्रयत्न केल्यास लगेच हे उपकरण ऍक्टिव्हेट होते आणि त्यामध्ये नोंदविण्यात मोबाईल...
22 Mar 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, March 13th, 2014
=बंगळुरूमधील अभियंत्यांची अफाट कल्पना= बंगळुरू, (१२ मार्च) – आयटी क्षेत्रातील भारतीय अभियंत्यांनी आपल्या अफाट प्रतिभेेने संपूर्ण जगात उत्तम कामगिरी बजावली आहे, हे सर्वच जाणतात. विशेेषत: आपल्या अभियंत्यांनी दूरसंचार, इंटरनेट आणि दळणवळणाच्या अन्य साधनांमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. आता तर बंगळुरूमधील चार तरुण अभियंत्यांनी एकत्र येऊन ‘फ्री कॉल’ हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून त्यात त्यांना यश मिळाल्यास एक नवीन पैसाही खर्च न करता ग्राहकांना तासन्तास फोनवर फुकट बोलता येणार...
13 Mar 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 1st, 2014
नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – दर दिवशी शेकडो लोक फेसबुकवरील आपले प्रोफाईल डिलीट करण्याचा निर्णय घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या युझर्सना पुन्हा फेसबुककडे वळविण्यासाठी घेण्यासाठी फेसबुकने एक नवी सुविधा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या ऍपमुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये ऑनलाईन वृत्तपत्रे आणि मासिके देखील वाचता येणार आहेत. ऍपच्या प्रभावी वापराकरीता कंपनीने ‘द न्यूयॉर्क टाईम्स’, ‘द हफिंग्टन पोस्ट’, ‘युएस टुडे’ आणि ‘टाईम’ या आघाडीच्या प्रकाशनांसोबत करार केला आहे. या ऍपची विशेषता अशी...
1 Feb 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, January 26th, 2014
= नासाच्या ‘अपॉच्युर्निटी’ शोध= वॉशिंग्टन, (२५ जानेवारी) – मंगळावर जीवसृष्टी होती काय, तिथे जीवन जगण्यासाठी उपयुक्त पाणी होते काय,यासह विविध मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेने पाठविलेल्या ‘अपॉच्युर्निटी’नावाच्या रोव्हरने अतिशय महत्त्वाचा शोध लावला आहे. तब्बल चार अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर मानवी जीवनाकरिता उपयुक्त असे पाणी उपलब्ध होते,असे या अभ्यासात दिसून आले आहे. या रोव्हरने मंगळवारील काही खडकांचे नमुने नासाकडे पाठविले आहेत. नासाच्या वैज्ञानिकांनी या खडकाच्या नमुन्यांचे परीक्षण केेले असता, मंगळावरही चार अब्ज वर्षांपूर्वी...
26 Jan 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, January 12th, 2014
=१७० देशांमध्ये बघता येणार= लंडन, (११ जानेवारी) – ब्रिटनची चॅनेल-४ ही वाहिनी लवकरच अंतराळातून अनोखा असा पहिलावहिला ‘लाईव्ह शो’ प्रसारित करणार असून, यादरम्यान इंटरनॅशनल स्पेस सेंटरला (आयएसएस) पृथ्वीच्याभोवती चक्कर मारताना दाखविले जाणार आहे. ‘लाईव्ह फ्रॉम स्पेस’ असे शीर्षक असलेला हा कार्यक्रम नॅशनल जियोग्राफिक चॅनलवरून १७० देशांमध्ये प्रसारित केला जाणार आहे. या शोचे सूत्रसंचालन ‘द एक्स फॅक्टर’ या प्रसिद्ध टॅलेंट हंट शोचे सूत्रसंचालक डरमॉट ओ लेरी हे करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान...
12 Jan 2014 / No Comment / Read More »