Posted by वृत्तभारती
Thursday, November 5th, 2020
अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने, वॉशिंग्टन, ५ नोव्हेंबर – संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल अद्यापही समोर आले नाहीत. मात्र, राजकीय अस्थिरतेच्या पृष्ठभूमीवर ट्रम्प समर्थक आणि विरोधकांची अमेरिकेत ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी आघाडी घेतली असली तरी दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. अमेरिकेत काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या असून पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तर विविध शहरातून ५०...
5 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 5th, 2020
भारत-नेपाळ लष्करी सहकार्य वाढविणार, काठमांडू, ५ नोव्हेंबर – भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांच्या हस्ते गुरुवारी एका खास समारंभात नेपाळचे मानद लष्करप्रमुख म्हणून सन्मानित करण्यात आले. काठमांडू येथील ‘शीतलनिवास’ या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानावर झालेल्या कार्यक्रमात जनरल नरवणे यांना तलवार आणि पुस्तक भेट देण्यात आले. पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली, भारतीय राजदूत विनय एम क्वात्रा आणि दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी या समारंभास उपस्थित होते. १९५० मध्ये सुरू झालेली...
5 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 4th, 2020
मतगणनेत घोटाळ्याचा ट्रम्प यांचा आरोप, वॉशिंग्टन, ४ नोव्हेंबर – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आता वेगळ्याच टप्प्यावर गेली आहे. रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिकचे उमेदवार जो बिडेन यांनी एकमेकांवर मतमोजणीत घोटाळ्याचे आरोप करीत, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. या गोंधळामुळे मतमोजणी थांबविण्यात आली असून, आता अंतिम निकालांसाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. पेन्सिल्वेनियासह काही प्रांतांमध्ये मतमोजणी थांबविण्यात आली आहे. उद्या गुरुवारी येथील मतमोजणी होऊ शकते. ट्रम्प...
4 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 4th, 2020
वॉशिंग्टन, ३ नोव्हेंबर – अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना डेमॉक्रॅटचे उमेदवार जो बिडेन यांनी कडवे आव्हान दिले आहे. मतदानानंतर लगेच निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार नसल्याने, ट्रम्प सत्ता कायम राखतात की बिडेन अमेरिकेची सूत्रे हाती घेतात, याचे उत्तर थोड्या विलंबानेच मिळणार आहे. आज सकाळी पहिल्या काही तासांमध्येच सुमारे दहा कोटी मतदारांनी मताधिकार बजावला. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर लांबचलांब रांगा होत्या....
4 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 4th, 2020
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आवाहन, वॉशिंग्टन, ३ नोव्हेंबर – कोरोना महामारीमुळे तरलतेच्या सापळ्यात अडकलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणखी प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्री गीता गोपीनाथ यांनी धोरणकर्त्यांना केले आहे. जागतिक पातळीवरील ९७ टक्के प्रगत अर्थव्यवस्थांसह ६० टक्के अर्थव्यवस्थांच्या केंद्रीय बँकांनी धोरणात्मक व्याजदर १ टक्क्यापेक्षा कमी ठेवले आहे. जगातील एकपंचमांश अर्थव्यवस्थांचा दर उणे झाला आहे, असे गोपीनाथ यांनी फायनान्शियल टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. आणखी एक धक्का बसल्यास केंद्रीय बँकांकडे व्याजदर...
4 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 4th, 2020
अल्-कायदाला मोठा दणका, ५ अतिरेक्यांना जिवंत पकडले, बामाको (माली), ३ नोव्हेंबर – माली देशाच्या मध्यवर्ती भागात फ्रेंच वायुदलाने केलेल्या हवाईहल्ल्यात अल्-कायदाचे ५० अतिरेकी ठार झाल्याची माहिती फ्रान्स सरकारने आज सोमवारी दिली. मुस्लिम दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू असलेल्या माली देशात, बुर्किना फासो आणि नायजेरिया या तीन देशांच्या सीमा एकत्र येतात त्या भागाजवळ शुक्रवारी हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांनी दिली. या कारवाईत चार...
4 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 3rd, 2020
एका महिन्यातील तिसरी घटना, इस्लामाबाद, २ नोव्हेंबर – पाकिस्तानात अल्पसंख्यक हिंदूंचा छळ करण्याच्या घटना वाढत असतानाच, कराची येथे आज सोमवारी प्राचीन हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. या मंदिरातील देवतेचा पुतळा आणि प्रतिमेचीही विटंबना करण्यात आली. आज सकाळी काही भाविक दर्शनासाठी मंदिरात गेले असता, त्यांना हा प्रकार दिसून आला. या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच, शेकडो लोक रस्त्यावर उतरले आणि निषेध करू लागले. यापूर्वी १० आणि २४ ऑक्टोबर रोजी सिंध प्रांतात अशाच...
3 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 3rd, 2020
कोरोना महामारीचे सावट, वॉशिंग्टन, २ नोव्हेंबर – कोरोना महामारीच्या सावटात जगातील जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत उद्या मंगळवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यंदाची निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसर्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांचे आव्हान आहे. बिडेन हे बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना उपराष्ट्राध्यक्ष होते. निवडणूक प्रचारात कोरोनाचा संसर्ग, वर्णद्वेष, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आदी मुद्दे ठळकपणे समोर आले होते. अमेरिकेच्या...
3 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 1st, 2020
इस्लामाबाद, १ नोव्हेंबर – खासदार अयाझ सादिक यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेमागील सत्य सांगून पाकिस्तान सरकारला उघडे पाडले आहे. सरकारपुढील अडचणी वाढण्याच्या शक्यतांमुळे सादिक यांना देशद्रोही घोषित करण्याचा निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अयाझ सादिक यांनी देशविरोधी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असे माहिती आणि प्रसारण मंत्री शिबली फराज यांनी सांगितले. शनिवारी गृहमंत्री इजाज शाह यांनीही सादिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा...
1 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, October 31st, 2020
२४ ठार, ८०० जखमी, अंकारा, ३१ ऑक्टोबर – तुर्कीमधील ईझमिर शहरात शुक्रवारी आलेल्या मोठ्या तीव्रतेच्या भूकंपामुळे अनेक इमारती पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या असून, ढिगार्यात शेकडो लोक दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला, तर ८०० हून अधिक जखमी झाले आहेत. भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय ग्रीसमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुर्कीचे आरोग्य मंत्री फर्हेटीन कोका यांच्यानुसार, भूकंपात जखमी झालेल्या ४३५ जणांवर...
31 Oct 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, June 29th, 2020
चीनने केला दक्षिण चीन सागरावर दावा, मनिला, २८ जून – दक्षिण चीन सागरावर चीनने केलेला दावा आग्नेय आशियातील देशांनी फेटाळला आहे. दक्षिण चीन सागरी प्रदेशात १९८२ चा संयुक्त राष्ट्रांचा महासागरी करार सार्वभौम हक्क व इतर मालकी हक्कांबाबत आधारभूत मानावा, असे आग्नेय आशियातील नेत्यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी १९८२ मध्ये केलेला यूएनसीएलओएस करार सार्वभौम हक्क, कार्यक्षेत्र व कायदेशीर हक्क यास प्रमाणभूत मानावा, असे आशियाई देशांच्या वतीने व्हिएतनामने जारी केलेल्या एका निवेदनात...
29 Jun 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, June 28th, 2020
ऑकलंड, २८ जून – फेसबुकवरील द्वेषयुक्त भाषणे व समाजामध्ये फूट पाडण्यार्या पोस्ट वाढत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी फेसबुकवर बहिष्कार टाकला आहे. या कंपन्यांच्या बहिष्कारामुळे फेसबुकच्या शेअरची किंमत आठ टक्क्यांनी घसरली असून, कंपनीचे बाजारमूल्य तब्बल ५० अब्ज डॉलर्सनी घसरले आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांच्या पोस्टवर इशारा देणारे झेंड्याचे चिन्ह लावणार असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टवरून या वादाला सुरुवात झाली होती. अध्यक्षपदाच्या मेल-इन मतदानातून घोटाळा होईल, असे भाकीत...
28 Jun 2020 / No Comment / Read More »