|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.99° से.

कमाल तापमान : 28.01° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 61 %

वायू वेग : 3.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.95°से. - 30.83°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

27.32°से. - 30.64°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.51°से. - 29.25°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.09°से. - 29.82°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.89°से. - 29.89°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.01°से. - 29.34°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल
Home »

संदेशखालीचा सूत्रधार शाहजहान शेख याला सीबीआयकडे सोपवण्याची वेळ संपली

संदेशखालीचा सूत्रधार शाहजहान शेख याला सीबीआयकडे सोपवण्याची वेळ संपली– शाहजहान शेखवरून बंगालमध्ये गोंधळ, कोलकाता, (०६ मार्च) – बुधवारी दुसर्‍यांदा कोलकाता उच्च न्यायालयाने संदेशखाली घोटाळ्याचा सूत्रधार शाहजहान शेख याला सीबीआयकडे सोपवण्याची वेळ निश्चित केली होती. असे असतानाही कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेल्या वेळेत सीआयडीने शेख शाहजहानला सीबीआयकडे सोपवलेले नाही. हायकोर्टाने दुपारी ४.१५ ही वेळ निश्चित केली होती, मात्र अद्यापपर्यंत सीआयडीने शाहजहान शेखला सीबीआयकडे सोपवलेले नाही. संदेशखाली हिंसाचार प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. शेख शाहजहानला आज दुपारी ४:१५...6 Mar 2024 / No Comment / Read More »

संदेशखळी प्रकरणी ममता सरकारने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

संदेशखळी प्रकरणी ममता सरकारने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव– कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिले आव्हान, कलकत्ता, (०५ मार्च) – संदेशखली प्रकरणी पश्चिम बंगालच्या ममता सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेथे त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. ज्यामध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ममता सरकारच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाने ममता सरकारला आज संध्याकाळपर्यंत आरोपी शाहजहान शेखला सीबीआय कोठडीत सोपवण्याचे आदेश दिले. संदेशखली प्रकरणी...6 Mar 2024 / No Comment / Read More »

कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी दिला राजीनामा

कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी दिला राजीनामाकोलकाता, (०५ मार्च) – कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी म्हणजेच आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला आहे. याशिवाय राजीनाम्याच्या प्रती मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टीएस शिवग्ननम यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यासह अनेक प्रकरणात न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी एकापाठोपाठ एक महत्त्वाचे निर्णय दिले. विशेष म्हणजे गंगोपाध्याय या वर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होणार होते, मात्र...6 Mar 2024 / No Comment / Read More »

ते म्हणतात आधी कुटुंब, मी म्हणतो आधी देश!

ते म्हणतात आधी कुटुंब, मी म्हणतो आधी देश!– ’माझा देश हे माझे कुटुंब’ असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला पुनरुच्चार, हैदराबाद, (०५ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील संगारेड्डी येथे जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आणि ’माझा देश हे माझे कुटुंब’ असल्याचा पुनरुच्चार केला. विरोधकांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी कुटुंब प्रथम आहे, तर माझ्यासाठी देश प्रथम आहे. त्यांच्यासाठी त्यांचे कुटुंबही...6 Mar 2024 / No Comment / Read More »

पेपर लीक प्रकरणी योगी सरकारची मोठी कारवाई

पेपर लीक प्रकरणी योगी सरकारची मोठी कारवाईलखनऊ, (०५ मार्च) – यूपी पोलीस भरती परीक्षा लीक प्रकरणी योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. यूपी पोलीस भरती बोर्डाच्या अध्यक्षांना हटवण्यात आले आहे. रिक्रूटमेंट बोर्डाच्या अध्यक्षा रेणुका मिश्रा यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता राजवी कृष्णा यांच्याकडे भरती मंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरकारने पोलीस भरती मंडळाच्या अध्यक्षा रेणुका मिश्रा यांना हटवून त्यांना प्रतीक्षा यादीत टाकले आहे. १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी राजीव कृष्णा यांना आता भरती मंडळाची...6 Mar 2024 / No Comment / Read More »

पंतप्रधानांनी घेतली वैजयंतीमाला यांची भेट

पंतप्रधानांनी घेतली वैजयंतीमाला यांची भेटचेन्नई, (०५ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री वैजयंतीमाला यांची भेट घेतली. अभिनेत्रीसोबत झालेल्या भेटीची माहिती खुद्द पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये वैजयंतीमाला यांच्या कामगिरीचेही कौतुक केले. शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान वैजयंतीमाला यांच्याशी बोलताना दिसत आहेत. अभिनेत्रीसोबतचे फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनी लिहिले, चेन्नईमध्ये वैजयंतीमाला यांना भेटून आनंद झाला. अलीकडेच त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल...6 Mar 2024 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकीयादगिरी, (०५ मार्च) – कर्नाटकमध्ये एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात राहणार्‍या एका व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आरोपीने धमकी दिली आहे की, केंद्रात काँग्रेसचे सरकार आले तर तो पंतप्रधान मोदींना मारून टाकेल. व्हिडिओमध्ये...6 Mar 2024 / No Comment / Read More »

मध्यप्रदेशातील सर्व जागा भाजपा जिंकेल

मध्यप्रदेशातील सर्व जागा भाजपा जिंकेल– शिवराजसिंह चौहान यांचा विश्वास, भोपाळ, (०४ मार्च) – भाजपा आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मध्यप्रदेशातील सर्व २९ जागा जिंकेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला. चौहान यांना विदिशा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेशातील लोकांच्या हृदयात आहेत. भाजपा सर्व २९ जागा जिंकेल. आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणूक लढवू, असे चौहान यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांना सांगितले. फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार ४०० पारचा...4 Mar 2024 / No Comment / Read More »

ओवेसींच्या विरुद्ध भाजपाने उतरवलेल्या माधवी लता कोण आहेत

ओवेसींच्या विरुद्ध भाजपाने उतरवलेल्या माधवी लता कोण आहेतहैदराबाद, (०३ मार्च) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काल भाजपाने आपल्या एकूण १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यावेळी भाजपाने तेलंगणातील प्रसिद्ध हैदराबाद मतदारसंघावर कोम्पेला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या जागेवर एआईएमआईएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत. हैदराबादची जागा १८८४ पासून ओवेसी कुटुंबाच्या ताब्यात आहे. तो ओवेसींचा बालेकिल्ला मानला जातो. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाउद्दीन ओवेसी १९८४ मध्ये पहिल्यांदा या जागेवरून खासदार...3 Mar 2024 / No Comment / Read More »

बंगळुरू स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात; हुबळी-धारवाड येथे कारवाई

बंगळुरू स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात; हुबळी-धारवाड येथे कारवाईबंगळुरू, (०२ मार्च) – बंगळुरूच्या एका कॅफेमध्ये शुक्रवारी कमी तीव्रतेच्या झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी शनिवारी दिली. या प्रकरणाचा तपास करणार्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने धारवाड, हुबळी आणि बंगळुरू येथून चार जणांना उचलले. आयईडीमुळे रामेश्वरम् कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या स्फोटात दहा जण जखमी झाले. या प्रकरणाची चौकशी वेगात केली जात आहे, असे बंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितले....3 Mar 2024 / No Comment / Read More »

सत्येंद्र जैन यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश

सत्येंद्र जैन यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश– दिल्ली एलजीने केली कारवाई, नवी दिल्ली, (०२ मार्च) – दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले सत्येंद्र जैन यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. तिहार तुरुंगात बंदिस्त गुंड मुकेश चंद्रशेखर याच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी तत्कालीन तुरुंगमंत्री जैन यांच्याविरुद्ध तपास करण्याचे आदेश उपराज्यपालांनी दिले आहेत. सुकेश चंद्रशेखर यांनी आरोप केला होता की, तिहार तुरुंगाचे तत्कालीन महासंचालक आणि गृह विभाग हाताळणारे सत्येंद्र जैन यांनी संरक्षण मनी म्हणून त्यांच्याकडून...3 Mar 2024 / No Comment / Read More »

हम अब इधर-उधर नहीं होंगे : नितीश कुमार

हम अब इधर-उधर नहीं होंगे : नितीश कुमारऔरंगाबाद, (०२ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौर्‍यावर आहेत. या दरम्यान सर्व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबादला पोहोचले, जिथे त्यांनी मंचावरून २१ हजार कोटींहून अधिक रकमेच्या विकास योजनांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, बिहारमध्ये विकास योजनांचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान मोदींकडे बोट दाखवत नितीश कुमार म्हणाले की, तुम्ही खूप दिवसांनी आला आहात,...3 Mar 2024 / No Comment / Read More »