|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.99° से.

कमाल तापमान : 24.74° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 57 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

आज होणार मोदींची स्वप्नपूर्ती…

आज होणार मोदींची स्वप्नपूर्ती…श्री काशी विश्‍वनाथ धामचा लोकार्पण सोहळा, वाराणसी, १२ डिसेंबर – देशाचे पंतप्रधान आणि वाराणसीचे खासदार झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी श्री काशी विश्‍वनाथ धाम जुन्याच पारंपरिक वैभवाने थाटात पुन्हा उभे राहावे, हे स्वप्न पाहिले. आता श्री काशी विश्‍वनाथ धामचा कायाकल्प झाला असून, उद्या सोमवारी होणार्‍या लोकार्पण सोहळ्‌यासाठी श्रीकाशी विश्‍वेश्‍वर नगरी सज्ज झाली आहे. स्वत: पंतप्रधान मोदी या भव्य-दिव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांचे हे स्वप्न साकार होताना पाहण्यासाठी आणि हा अनुभव...13 Dec 2021 / No Comment / Read More »

वसीम रिझवींनी स्वीकारला हिंदू धर्म

वसीम रिझवींनी स्वीकारला हिंदू धर्मडासना देवी मंदिरात घेतली दीक्षा, गाझियाबाद, ६ डिसेंबर – उत्तरप्रदेशच्या शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आज सोमवारी हिंदू धर्म स्वीकारला. हे धर्मांतर नव्हे. मला इस्लाममधून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे पुढे कोणता धर्म स्वीकारायचा, ही माझी मर्जी आहे. सनातन धर्म हा जगातील सर्वांत पहिला धर्म असून, त्यात मानवतेशी निगडित असंख्य चांगल्या गोष्टी आहेत, असे रिझवी यांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्यावर सांगितले. उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील डासना देवी मंदिराचे...6 Dec 2021 / No Comment / Read More »

जीवनशैलीतच दडलेय् हृदयाचे आरोग्य

जीवनशैलीतच दडलेय् हृदयाचे आरोग्यआज जागतिक हृदय दिन, नागपूर, २८ सप्टेंबर – हृदयाची धडधड म्हणजे माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण मानले जाते. ही धडधड बंद झाली की, माणूसही संपतो. म्हणून सर्व विकारांमध्ये सर्वाधिक काळजी घेतली जाते ती हृदयविकाराची. जगातील सर्वाधिक मृत्यू हृदयविकारानेच होत असल्याची बाब यापूर्वीच सिद्ध झाली आहे. सोबतच हृदयविकारासाठी वयाचीही मर्यादा राहिलेली नाही. त्यामुळे यापासून बचाव करायचा तर आपली जीवनशैली अधिकाधिक हृदयानुकूल ठेवली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ मंडळी देतात. हृदयविकारासंबंधित जनजागृती करण्याचा दिवस म्हणून...28 Sep 2021 / No Comment / Read More »

मॅराडोनामुळे जगाला पडली फुटबॉलची भुरळ!

मॅराडोनामुळे जगाला पडली फुटबॉलची भुरळ!२० व्या शतकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू, ब्युनर्स आयस, २६ नोव्हेंबर – जागतिक फुटबॉल जगतातील ‘मॅराडोना’ नावाचा झंझावात बुधवारी शांत झाला. आपल्या उत्स्फूर्त आणि जोमदार आक्रमक खेळाच्या बळावर मॅराडोना जगातील फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला. त्याच्यामुळे जगाला फुटबॉलची भुरळ पडली. मॅराडोनाचा जन्म अर्जेंटिनातील लॅनस येथे ३० ऑक्टोबर १९६० रोजी झाला होता. अर्जेंटिनाचा हा स्टार फुटबॉलपटू १९८० च्या दशकातील सर्वोत्तम फुटबॉलपटू व जगातला सदासर्वकाळातील सर्वोत्तम फुटबॉलपटूपैकी एक होता. जागतिक फुटबॉल महासंघाने आभासी माध्यमातून मतदान...26 Nov 2020 / No Comment / Read More »

प्राचीन उपचार पद्धती कोट्यवधींचा जीवनाधार

प्राचीन उपचार पद्धती कोट्यवधींचा जीवनाधारनागपूर, १२ नोव्हेंबर – दिवाळीतील धनत्रयोदशी दिवस दरवर्षी राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला. त्यानुसार २८ ऑक्टोबर २०१६ रोजी पहिला आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. यंदा शुक्रवार, १३ नोव्हेंबर धनत्रयोदशीनिमित्त राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात येणार आहे. आयुर्वेद केवळ औषधोपचार पद्धती नसून स्वस्थ आणि दीर्घायुष्यासाठीचे शास्त्र आहे. आज या प्राचीन भारतीय उपचार पद्धतीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार व विकास व्हावा या दृष्टिकोनातूनच...12 Nov 2020 / No Comment / Read More »

कोरोना लक्षणांत आयुर्वेद प्रभावी

कोरोना लक्षणांत आयुर्वेद प्रभावीआयुर्वेद संस्थान पथकाचा अनुभव, नवी दिल्ली,१ नोव्हेंबर – ‘आयुष कवठ’ आणि ‘फिफाट्रोल’ ही आयुर्वेदिक औषधे कोरोनाच्या सौम्य ते मध्यम लक्षणांच्या पूर्ण प्रतिरोधासह अगदी अल्प कालावधीतही प्रभावी ठरू शकतात, असे आयुष मंत्रालयांतर्गत दिल्लीस्थत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या (एआयआयए) डॉक्टरांच्या पथकाला आढळून आले आहे. ‘आयुष कवठ’, ‘फिफाट्रोल गोळ्या’, ‘संशमनी वटी’ आणि ‘लक्ष्मीविलास रस’ या चार आयुर्वेदिक औषधांच्या साह्याने कोरोना रुग्णांची प्रकृती तर सुधारलीच, शिवाय उपचारानंतर सहा दिवसांच्या आतच त्यांची जलद प्रतिजन चाचणीही (रॅपिड...1 Nov 2020 / No Comment / Read More »

नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची

नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची=अभ्यासाचा निष्कर्ष= शिकागो, [२२ फेब्रुवारी] – चांगली नोकरी मिळविण्यासाठी युवावर्गाची सतत धडपड सुरू असते. त्यासाठी अनेक क्लृप्त्याही लढविल्या जातात. दर्जेदार स्वपरिचय अर्थात बायो डेटा तयार करण्यासाठी काही संस्थांमधून मार्गदर्शनही केले जाते. पण, एका नव्या संशोधनानुसार, छापील किंवा लिखित स्वपरिचयाऐवजी ध्वनिमुद्रित स्वपरिचय देणार्‍या उमेदवाराची निवड करण्यास व्यवस्थापन किंवा निवड मंडळ प्राधान्य देते. शिकागो विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्राध्यापक निकोलस एप्ले यांनी आपल्या अभ्यासक चमूच्या मदतीने केलेल्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढला आहे....23 Feb 2015 / No Comment / Read More »

खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक

खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक=भारतीय शास्त्रज्ञांची कमाल, ऍव्हरेज २२.५ किमी= कोची, [८ फेब्रुवारी] – पेट्रोल आणि डिझेल सध्या स्वस्त होत असले, तरी हे इंधन किती काळ टिकेल याची शाश्‍वती नसल्याने भविष्याची गरज लक्षात घेऊन भारतीय शास्त्रज्ञांनी चक्क खोबरेल तेलावर मिनी ट्रक चालविण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. विशेष म्हणजे, एक लिटर खोबरेल तेलावर या मिनी ट्रकने २२.५ किमी अंतर सहजपणे कापले. तिथेच, एक लिटर डिझेलमध्ये ट्रक केवळ १६ किमी अंतर पार करू शकला. केरळच्या वैज्ञानिकांनी...10 Feb 2015 / No Comment / Read More »

लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो

लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो=अनिवासी भारतीय संशोधकाचा दावा= वॉशिंग्टन, [७ फेब्रुवारी] – लाल द्राक्षे आणि शेंगदाणे यासारख्या सर्वसामान्य खाद्यपदार्थांमध्ये आढळून येणार्‍या घटकांमुळे वृद्धापकाळात स्मृतिभ्रंश होण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करणे शक्य होऊ शकते, असा अभ्यासावर आधारित दावा अनिवासी भारतीय असलेल्या एका संशोधकाने केला आहे. टेक्सासच्या ए ऍण्ड एम हेल्थ सायन्स सेंटर कॉलेज ऑफ मेडिसिन येथे प्राध्यापक असलेले अशोक शेट्टी सध्या लाल द्राक्ष्यांच्या सालपटात तसेच रेड वाईनमध्ये जे ऍण्टीऑक्सिडंट आढळून येतात, त्यापासून वृद्धापकाळात मानवाला काय...8 Feb 2015 / No Comment / Read More »

गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर

गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टरसॅनफ्रॅन्सिस्को, [२९ ऑक्टोबर] – कर्करोग आणि हृदयविकार यासारख्या घातक रोगांचा आधीच इशारा देणारी काही यंत्रणा मानवी शरीरात आहे किंवा नाही याचा शोध घेणारे डिटेक्टर तयार करण्याचा प्रयत्न इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गूगलकडून केला जात आहे. जीवन विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे एक पथक गूगल एक्स लॅब या विशेष योजनेवर सध्या काम करत आहे. या पथकातील तज्ज्ञ रक्तपेशींच्या माध्यमातून यासंबंधीचे काही संदेश मिळतात का, हे जाणून घेण्यासाठी नॅनोपार्टिकल्सची मदत घेत आहेत आणि तसे...30 Oct 2014 / No Comment / Read More »

यंदा ९३ टक्केच पाऊस!

यंदा ९३ टक्केच पाऊस!हवामान खात्याने दिली माहिती कोरड्या दुष्काळाची भीती केरळ व्यापला, गोव्याला उशिर नवी दिल्ली, [९ जून] – मान्सूनने अवघ्या दोन दिवसांत संपूर्ण केरळला आपल्या कक्षेत घेतल्याची आनंदाची बातमी असतानाच, हवामान खात्याने एक वाईट बातमीही दिली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस ९३ टक्क्यांपेक्षाही कमी पडणार असल्याचा अंदाज आहे. केरळ व्यापल्यानंतर मान्सूनच्या गोव्याच्या दिशेने सुरू झालेल्या प्रवासात व्यत्यय आला आहे. त्यामुळे मान्सूनचे गोव्यातील आगमन उशिराने होणार आहे. कृषीप्रधान देश असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून हा...10 Jun 2014 / No Comment / Read More »

मजुरांनीच उभारले अद्ययावत रुग्णालय

मजुरांनीच उभारले अद्ययावत रुग्णालयरायपूर, (५ जानेवारी) – देशाला स्वातंत्र्य मिळून सहा दशकांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी आरोग्य सेवांच्या बाबतीत अजूनही आपला देश खूपच माघारलेला आहे. त्यातच सरकारी रुग्णालय म्हटले की आधीच अंगावर काटा येतो. सगळीकडेच अशी परिस्थिती असतानाच छत्तीसगडमध्ये खाणकाम करणार्‍या मजुरांनी एक अद्ययावत रुग्णालय बांधले ते अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. आता या भागातील गोरगरिबांची पहिली पसंत म्हणून हे रुग्णालय नावारूपाला आले आहे. छत्तीसगडमधील औद्योगिक शहर...7 Jan 2014 / No Comment / Read More »