|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.68° से.

कमाल तापमान : 24.89° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 55 %

वायू वेग : 6.12 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.89° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.65°से. - 27.79°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.72°से. - 28.15°से.

सोमवार, 27 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.04°से. - 26.71°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

*गेली १२ वर्ष वन्यजीवांची करताहेत् तृष्णातृप्ती

*गेली १२ वर्ष वन्यजीवांची करताहेत् तृष्णातृप्तीसुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वॉटर ईज लाईफ सोसायटीचा सत्कार, चंद्रपूर, (२३ फेब्रुवारी ) – गेल्या १२ वर्षापासून अविरतपणे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांची तृष्णातृप्ती करण्याचे काम महत्कार्य करणार्या वॉटर ईज लाईफ सोसायटीचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष सत्कार केला. दुष्काळात टँकर लावून जंगलातील पाणवठे भरण्यापासून, तर सौर उर्जेचा वापर करून स्वयंचलित यंत्रणेद्वारे पाणवठे दिवसरात्र भरून ठेवण्याचे काम या संस्थेने केले आणि त्याची विशेष दखल वनमंत्र्यांनी ताडोबाच्या वर्धापनदिन सोहळ्यात घेतली. या संस्थेचे...23 Feb 2023 / No Comment / Read More »

जी-२० परिषदेसाठी शहरात सौंदर्यीकरण

जी-२० परिषदेसाठी शहरात सौंदर्यीकरणनागपूर, (१६ फेब्रुवारी ) – पुढील महिन्यात आयोजित होणार्‍या जी-२० या जागतिक परिषदेसाठी नागपूर शहर सज्ज होत आहे. नागपूर महानगर पालिकेच्यावतीने महत्वाच्या शासकीय संस्थांच्या संरक्षक भिंती, चौकांमध्ये सिंथेटिक पॅच आदी सौंदर्यीकरणाची कामे सुरु आहेत. महत्वाचे शासकीय कार्यालये असणार्‍या सिव्हिल लाईन्स परिसरात सौदर्यीकरणाचे विविध कामे सुरु आहेत. येथील राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या संरक्षक भींतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. याच रस्त्याने पुढे जीपीओ चौकात सुंदर व सुबक सिंथेटिक पॅच (२५द६फुट आकाराचे तीन...16 Feb 2023 / No Comment / Read More »

महिलांविषयक भारतीय चिंतनाची पुनर्स्थापना गरजेची

महिलांविषयक भारतीय चिंतनाची पुनर्स्थापना गरजेची– सीता गायत्री अन्नदानम यांचे प्रतिपादन, – रा.से. समितीचा मकर संक्रमणोत्सव, नागपूर, (२९ जानेवारी) – महिलांविषयक भारतीय चिंतन व विचारांची समाजात पुनर्स्थापना करण्याचे कार्य राष्ट्र सेविका समिती करीत असल्याचे प्रतिपादन समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री अन्नदानम यांनी आज केले. राष्ट्र सेविका समितीचा मकर संक्रमणोत्सव जरीपटक्यातील दयानंद पार्कमध्ये आयोजित करण्यात आला. बी.जी. श्रॉफ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चित्रा दौलतानी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत कार्यवाहिका रोहिणी आठवले, नागपूर विभाग कार्यवाहिका...30 Jan 2023 / No Comment / Read More »

पुन्हा एकदा गारपीट, जनजीवन विस्कळीत

पुन्हा एकदा गारपीट, जनजीवन विस्कळीतपावसामुळे पिकांना फटका, नागपूर शहर भर दुपारी अंधारले, नागपूर, ११ जानेवारी – हवामान खात्याचा अंदाज पुन्हा एकदा खरा झाला आणि मुसळधार पावसासह नागपूर शहर व विदर्भातील अनेक शहरांना आणि गावांना गारपिटीचा फटका सहन करावा लागला. या पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील पीकपाण्याला जबर फटका बसला. मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूर शहर ढगांच्या गर्दीमुळे इतके अंधारले होते की, रात्र झाल्यासारखे वाटत होते. मागील तीन दिवसांपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या...11 Jan 2022 / No Comment / Read More »

शेगाव रेल्वेस्थानकाचे संत गजानन महाराज रेल्वेस्थानक नामकरण व्हावे

शेगाव रेल्वेस्थानकाचे संत गजानन महाराज रेल्वेस्थानक नामकरण व्हावेखासदार प्रताप जाधव यांची मागणी, बुलडाणा, १३ डिसेंबर – विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या संतनगरी शेगाव येथे दर्शनासह पर्यटनासाठी लाखो भाविकांची ये-जा असते. संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे आणि समाधी मंदिरामुळे देश विदेशातील भाविकांसाठी शेगाव हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे शेगाव येथील रेल्वेस्थानकाचे श्री संत गजानन महाराज रेल्वेस्थानक शेगाव असे नामकरण व्हावे, अशी मागणी खासदार प्रताप जाधव यांनी देशाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. सेवा आणि समर्पण...14 Dec 2021 / No Comment / Read More »

शिवशंकरभाऊ पाटील हरिचरणी विलीन

शिवशंकरभाऊ पाटील हरिचरणी विलीनश्री गजानन महाराज संस्थान, संतनगरी झाली पोरकी, सेवेकरी व भक्तमंडळी शोकसागरात बुडाले.., शेगाव, ४ ऑगस्ट – शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त आणि आपल्या सेवाभावी स्वभाव व वर्तणुकीमुळे समाजात आदर्श निर्माण करणारे शिवशंकरभाऊ सुकदेव पाटील यांचे बुधवार, ४ ऑगस्ट रोजी देहावसान झाले. त्यांच्या निधनामुळे गजानन महाराज संस्थान व संतनगरी पोरकी झाली असून निधनाचे वृत्त ऐकताच संस्थानचे सेवेकरी व गजानन महाराजांची भक्तमंडळी शोकसागरात बुडाली. कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन करीत मोजक्या...5 Aug 2021 / No Comment / Read More »

निःस्वार्थ समर्पण हेच स्वयंसेवकत्व : सरसंघचालक

निःस्वार्थ समर्पण हेच स्वयंसेवकत्व : सरसंघचालकअकोला, २ फेब्रुवारी – करीअर म्हणजे प्राप्ती नाही. मनुष्य विकसित झाल्यावर त्याला प्राप्त गोष्टींचे वितरण त्याने केले पाहिजे. समर्पित होणे हे जीवन आहे. असे निःस्वार्थ समर्पण हेच स्वयंसेवकत्व आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे व्यक्त केले. मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या हस्ते शंकरलाल उर्फ काकाजी खंडेलवाल यांच्या जन्मशताब्दी समारोहानिमित्त ‘संघसमर्पित काकाजी’ या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी हे विचार व्यक्त केले. यावेळी मोहनजी...2 Feb 2021 / No Comment / Read More »

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्यावरोरा, ३० नोव्हेंबर – ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शितल आमटे-करजगी यांनी सोमवार, 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास आनंदवनातील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्याने केल्याचे उघडकीस आले. डॉ. शितल यांच्या आत्महत्येने परिसरातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. शितल आमटे-करजगी या येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यामुळे त्या आनंदवनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या....1 Dec 2020 / No Comment / Read More »

आजपासून होणार संत गजाननाचे दर्शन

आजपासून होणार संत गजाननाचे दर्शनशेगाव, १५ नोव्हेंबर – कोरोनाच्या संकटामुळे गेल्या मार्च महिन्यापासून देशातील संपूर्ण देवस्थाने बंद होती. संत नगरी शेगावचे गजानन माउलीचे मंदिरही बंद होते. प्रदीर्घ कालावधीनंतर आता सोमवार, १६ नोव्हेंबरपासून पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेगावातील प्रख्यात श्रीगजानन महाराज मंदिरही भाविकांना दर्शनासाठी खुले होत आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून भाविकांना श्रीगजाननाचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकले नव्हते. अनेक भाविकांनी टाळेबंदीच्या या काळात आपल्या भक्तीत खंड पडू दिला नाही. टाळेबंदीच्याही काळात अनेकांनी संत गजानन महाराजांच्या बंद दरवाजाला व...15 Nov 2020 / No Comment / Read More »

विदर्भातील जलाशये तुडुंब भरली

विदर्भातील जलाशये तुडुंब भरलीयवतमाळमधील धरणांत ९६ टक्के जलसाठा विदर्भातील धरणांत ७५ टक्के जलसंचय अमरावती/नागपूर, [१९ सप्टेंबर] – विदर्भातील धरणांमध्ये भरपूर पाणी साठले असून अमरावती विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये १९ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत एकूण संचय पातळीच्या तुलनेत ७८.१५ टक्के पाण्याचा संचय झाला आहे. तर नागपूर विभागातही सर्व धरणे मिळून सुमारे ७५ टक्के जलसंचय झाल्यामुळे दुष्काळाची दाहकता आता बर्‍याच अंशी कमी झाली आहे. रब्बी पिकांसाठी हा पाऊस एकप्रकारे वरदानच ठरला आहे. अमरावती विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्वाधिक...20 Sep 2015 / No Comment / Read More »

सिंचन हाच ठोस उपाय : मुख्यमंत्री

सिंचन हाच ठोस उपाय : मुख्यमंत्री=संवेदनशीलतेने काम करण्याचे अधिकार्‍यांना आवाहन= यवतमाळ, [३ मार्च] – ‘मोठी धरणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून तातडीचा उपाय म्हणून जलयुक्त शिवार कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. विभागातील ६४ हजार विहिरींपैकी ३१ हजार विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित विहिरींची कामे तातडीने पूर्ण करावी. या विहिरींना विद्युत विभागाने त्वरित वीज जोडण्या द्याव्यात. त्यामुळे शेतकर्‍यांना शाश्‍वत शेती करता येईल. जोपर्यंत आपण शेतकर्‍यांना सिंचनाची हमी देणार नाही, शेतात ओलावा निर्माण करणार नाही, तोपर्यंत...4 Mar 2015 / No Comment / Read More »

मेक इन् विदर्भच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावा

मेक इन् विदर्भच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावा=मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचा वर्धापन दिन= नागपूर, [१ फेब्रुवारी] – येत्या काळात विदर्भात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या उद्योजकांनी सुद्धा या बदलासाठी पुढाकार घ्यावा व मेक इन् विदर्भच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंगणा एमआयडीसी असोसिएशनच्या वर्धापन दिन समारंभात उद्योजकांना केले. यावेळी व्यासपीठावर खासदार कृपाल तुमाने, असोसिएशनचे अध्यक्ष कॅप्टन सी. एम. रणधीर, उपाध्यक्ष जी. एल. निमा, सचिव चंद्रशेखर शेगावकर, कोषाध्यक्ष...2 Feb 2015 / No Comment / Read More »