|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.99° से.

कमाल तापमान : 24.42° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 46 %

वायू वेग : 3.09 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.99° से.

हवामानाचा अंदाज

23.29°से. - 28.55°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.28°से. - 28.56°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.22°से. - 28.61°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.05°से. - 26.8°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

22.52°से. - 27.89°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

22.33°से. - 26.62°से.

रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादल

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामानवी दिल्ली, (२८ फेब्रुवारी ) – प्रचंड भ्रष्टाचार झालेल्या दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क घोटाळ्यात अटक झालेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी मंत्रिपदाचे राजीनामे दिले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ते लगेच मंजूरही केले. यामुळे दिल्ली सरकारमध्ये आता फक्त चार मंत्री उरले असून, त्यांच्यापैकी कैलास गहलोत आणि राजकुमार आनंद यांच्याकडे अतिरिक्त खाती सोपवली जाणार आहे. सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी रात्री अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच...28 Feb 2023 / No Comment / Read More »

दिल्ली वक्फ बोर्डाच्या १२३ मालमत्ता होणार जप्त

दिल्ली वक्फ बोर्डाच्या १२३ मालमत्ता होणार जप्तनवी दिल्ली, (१९ फेब्रुवारी ) – केंद्र सरकारने दिल्ली वक्फ बोर्डाच्या १२३ मालमत्ता ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. दिल्ली वक्फ बोर्डाच्या या मालमत्तांमध्ये मशिदी, कब्रस्तान आणि दर्ग्यांचा समावेश आहे. केंद्राच्या या निर्णयावर वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्ला खान यांनी सरकारला या मालमत्तांचा ताबा घेऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. वक्फ बोर्डाच्या या मालमत्ता केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या ताब्यात राहतील. या प्रकरणी उप भूमी व विकास अधिकार्यांनी ८ फेब्रुवारी रोजी वक्फ...19 Feb 2023 / No Comment / Read More »

मनीष सिसोदिया यांची सीबीआय चौकशी होणार

मनीष सिसोदिया यांची सीबीआय चौकशी होणारनवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी ) – केजरीवाल सरकारच्या उत्पादन शुल्क घोटाळ्यात मुख्य आरोपी असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने समन्स बजावला असून, त्यानुसार त्यांना रविवारी दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहायचे आहे. सीबीआयने या प्रकरणात तीन महिन्यांपूर्वी आरोपपत्र दाखल केले होते. यात सिसोदिया यांना आरोपी क्रमांक एक असे संबोधले आहे. त्यानंतर सीबीआयने सिसोदिया यांना प्रथमच समन्स जारी केला. विशेष म्हणजे, उत्पादन शुल्क विभागाचा कारभार सिसोदिया यांच्याकडेच आहे. आरोपपत्र दाखल...18 Feb 2023 / No Comment / Read More »

लिव्ह इन पार्टनरची हत्या आणि लग्न!

लिव्ह इन पार्टनरची हत्या आणि लग्न!दिल्ली, (१५ फेब्रुवारी ) – व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दिल्लीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रद्धा हत्याकांडासारखी पुन्हा एक घटना राजधानी दिल्ली मधून समोर आली आहे. लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या प्रियसीची गळा दाबून हत्या केल्याची कबुली गुन्हेगाराने दिली आहे. दिल्लीच्या नजफगढच्या मित्राव गावात राहणार्‍या साहिलची हरियाणाच्या झज्जरमध्ये राहणार्‍या निक्की यादवसोबत मैत्री झाली. दोघेही उत्तम नगरमध्ये कोचिंग करायचे. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. सर्व काही...15 Feb 2023 / No Comment / Read More »

अल् कायदाच्या चार जणांना सात वर्षांची शिक्षा

अल् कायदाच्या चार जणांना सात वर्षांची शिक्षानवी दिल्ली, (१४ फेब्रुवारी ) – देशभरात दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचणे आणि तरणांची भरती केल्याबद्दल दिल्ली न्यायालयाने मंगळवारी भारतीय उपखंडातील अल-कायदाच्या (एक्यूआयएस) चार दहशतवाद्यांना सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश संजय खनागवाल यांनी मौलाना मोहम्मद अब्दुल रहमान कासमी, मोहम्मद आसिफ, जफर मसूद आणि अब्दुल सामी यांना सात वर्षे आणि पाच महिन्यांची शिक्षा सुनावली, असे त्यांचे वकील अक्रम खान यांनी सांगितले. वकिलाने सांगितले की, दोषींनी आधीच सात वर्षे आणि...14 Feb 2023 / No Comment / Read More »

केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजपचे आंदोलन

केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजपचे आंदोलननवी दिल्ली, (९ फेब्रुवारी ) – फीडबॅक युनिट संदर्भात गुरुवारी भाजप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने केली. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, दिल्ली सरकार राजकीय विरोधकांशी द्वेषपूर्ण वर्तन करते, त्यांना दडपण्यात विश्वास ठेवते. केजरीवाल सरकारने १ फेब्रुवारी २०१६ रोजी दडपशाहीच्या उद्देशाने फीडबॅक युनिटची स्थापना केली, जेणेकरुन केवळ राजकीय विरोधक, केंद्रीय मंत्री, खासदार, उपराज्यपाल कार्यालय, मीडिया हाऊसेस, प्रमुख उद्योगपतींवरच नव्हे तर न्यायाधीशांवरही नजर ठेवता येईल....9 Feb 2023 / No Comment / Read More »

१४ फेब्रुवारी पासून भारत रंग महोत्सव दिल्लीसह १० शहरांमध्ये सुरू!

१४ फेब्रुवारी पासून भारत रंग महोत्सव दिल्लीसह १० शहरांमध्ये सुरू!नवी दिल्ली, (७ फेब्रुवारी ) – २२ व भारत रंग महोत्सव दिल्लीसह नाशिक, जयपूर, राजमुंद्री, भोपाळ, जम्मू, श्रीनगर, गुवाहाटी, रांची आणि केवडिया शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. हा भारत रंग महोत्सवा २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. २२ व्या भारत रंग महोत्सवाबाबत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत एनएसडीचे संचालक डॉ.रमेशचंद्र गौर यांनी सांगितले की, ८० हून अधिक नाटकांचे सादरीकरण, सार्वजनिक कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, लिव्हिंग लिजंड, मास्टर...7 Feb 2023 / No Comment / Read More »

दिल्लीच्या दारू घोटाळ्याचा पैसा गोव्यात वापरला

दिल्लीच्या दारू घोटाळ्याचा पैसा गोव्यात वापरलानवी दिल्ली, (२ फेब्रुवारी ) – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सांगितले की, आम आदमी पक्षाने (आप) गोव्यातील प्रचारासाठी दारू घोटाळ्याचा पैसा वापरला. न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात ईडीने म्हटले आहे की, आप’ने निवडणूक प्रचारासाठी निधीचा काही भाग वापरल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या वर्षी गोव्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने २ जागा जिंकल्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे आरोपपत्र काल्पनिक असल्याचे म्हटले आहे आणि एजन्सीचा वापर केवळ...2 Feb 2023 / No Comment / Read More »

दिल्लीतील खाजगी कार्यालये बंद

दिल्लीतील खाजगी कार्यालये बंद‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश, नवी दिल्ली, ११ जानेवारी – दिल्लीत कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये बंद करण्यात आली आहेत. तथापि, दिल्लीत टाळेबंदी लावण्यात येणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत दिल्लीतील निर्बंध आणखी कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीतील खाजगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय आधी घेण्यात आला होता, हा निर्णय...11 Jan 2022 / No Comment / Read More »

लग्नाआधीचे आजार लपवणे ही फसवणूक

लग्नाआधीचे आजार लपवणे ही फसवणूकरद्द होऊ शकतो विवाह, दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, नवी दिल्ली, २ जानेवारी – भारतात विवाहसंस्थेचे महत्त्व अधिक आहे. लग्नानंतर आयुष्यभर एकमेकांच्या सुख- दु:खात सोबत राहण्याच्या शपथा घेतल्या जातात. त्यात विश्‍वासघात किंवा धोका दिला तर नात्याला ग्रहण लागतेच. अशातच आता दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. लग्नाआधी पती किंवा पत्नीने त्यांना असलेल्या आजारांबद्दल माहिती न देणे फसवणूक असून, अशा स्थितीत लग्न रद्द होऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने...3 Jan 2022 / No Comment / Read More »

लाल किल्ल्याचा ताबा मागणारी मुघल वंशजांची याचिका फेटाळली

लाल किल्ल्याचा ताबा मागणारी मुघल वंशजांची याचिका फेटाळलीनवी दिल्ली, २१ डिसेंबर – लाल किल्ला आमच्या पूर्वजांचा असून, तो माझ्या ताब्यात द्यावा, अशी मागणी करणारी मुघल वंशजाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिका दाखल करण्यात १५० वर्षं का लागली, असा प्रश्‍न विचारत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. सुल्ताना बेगम यांनी ही याचिका दाखल केली होती. शेवटचे मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांच्या त्या वंशज आहेत. बहादूर शाह जफर यांचे वंशज मिर्झा बख्त यांच्या त्या पत्नी आहेत. मिर्झा...21 Dec 2021 / No Comment / Read More »

जेएनयूमध्ये पुन्हा हाणामारी

जेएनयूमध्ये पुन्हा हाणामारीअभाविप-एआयएसएच्या सदस्यांमध्ये खडाजंगी, नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि डावी आघाडी ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन (एआयएसए) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) यांच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. यातील काही जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यांवर नवी दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची औपचारिक तक्रार दिल्ली पोलिसांकडे करण्यात आली आहे, असे विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी सांगितले. रविवारी रात्री दहाच्या...15 Nov 2021 / No Comment / Read More »