Posted by वृत्तभारती
Friday, February 3rd, 2023
ब्यूनस एअर्स, (३ फेब्रुवारी ) – वयोमानामुळे २०२६ सालच्या फिफा विश्वचषकात खेळणे कठीण होईल, परंतु मला फुटबॉल खेळायला आवडते. मी चांगल्या स्थितीत असल्यामुळे फुटबॉलचा आनंद घेत आहे व पुढेही घेत राहील. पुढील विश्वचषक स्पर्धेला अजून खूप वेळ आहे व या विश्वचषकात माझे खेळणे हे माझी पुढील कारकीर्द कशी चालते यावर अवलंबून आहे, असे विश्वचषक विजेत्या अर्जेंटिना संघाचा कर्णधार लियोनेल मेस्सी म्हणाला. गत वर्षी फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर मेस्सीने...
3 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 28th, 2023
सेंट जॉस, (२७ जानेवारी) – महान फलंदाज ब्रायन लाराने वेस्ट इंडिजच्या तिन्ही स्वरुपाच्या क्रिकेटमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षकांना मदत करण्यासाठी ‘परफॉर्मन्स मेंटॉर’ म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास सहमती दर्शविली आहे, असे क्रिकेट वेस्ट इंडिजने(सीडब्ल्यूआय)सांगितले. गत वर्षीच्या टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत वेस्ट इंडिजचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे संघाच्या पुनरावलोकनासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा सदस्य ५३ वर्षीय ब्रायन लारा आता खेळाडूंना रणनीतीचा सल्ला देण्यासाठी व त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी मुख्य प्रशिक्षकांना...
28 Jan 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, August 30th, 2021
नेमबाजीत अवनीला, भालाफेकमध्ये सुमितला सुवर्णपदक, टोकियो, ३० ऑगस्ट – भारताच्या अवनी लेखरा व सुमित अंतिलने आज सोमवारी सुवर्ण कामगिरी केली. अवनीने येथे महिलांच्या केआर-२ १० मीटर एअर रायफलच्या क्लास एसएच १ प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. अवनी लेखरा नेमबाजीत सुवर्णपदक प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे, तर भालाफेकच्या एफ-६४ प्रकारात सुमित अंतिलने विश्वविक्रम मोडत भालाफेकमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. जयपूर येथे राहणार्या १९ वर्षीय अवनीला २०१२ मध्ये कार...
30 Aug 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, August 9th, 2021
आता २०२४मध्ये भेटू पॅरिसला, टोकियो, ८ ऑगस्ट – कोरोनाच्या सावटाखाली आयोजित ३२ व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा टोकियोच्या नॅशनल ऑलिम्पिक स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत पार पडला. चला पुढे जाऊ या आणि पुढील २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भेटू या, असा संदेश या सोहळ्याने दिला. १७ दिवस चाललेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा मागोवा घेणार्या एका व्हिडिओच्या सादरीकरणाने सांगता सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी डोळे दीपवणारी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. आंतरराष्ट ?ीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष...
9 Aug 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, August 8th, 2021
शंभर वर्षांत ऑलिम्पिकमध्ये ऍथ्लेटिक्सचे पहिले सुवर्ण, अभिनव बिंद्रानंतर भारताला आणखी एक वैयक्तिक सुवर्ण, मिल्खा सिंगचे स्मरण, सुवर्ण समर्पित, टोकियो, ७ ऑगस्ट – भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक अंतिम फेरीत ८७.५८ मीटरची फेक करीत शंभर वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच भारताला ऍथ्लेटिक्स क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकून देण्याचा इतिहास रचला आहे. नेमबाज अभिनव बिंद्रानंतर तब्बल १३ वर्षांनी तो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. भारताची टोकियो ऑलिम्पिकमधील पदक...
8 Aug 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, August 8th, 2021
टोकियो, ७ ऑगस्ट – भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया ऑलिम्पिक पदार्पणात सुवर्णपदक जिंकेल, अशी अपेक्षा होती, परंतु शनिवारी बजरंगने कझाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोव्हला सरळ ८-० ने एकतर्फी धूळ चारून देशासाठी कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिक पदार्पण करणारा बजरंग आता कांस्यपदकासह मायदेशी परतणार आहे. बजरंगला उपांत्य सामन्यात हाजी अलिव्हकडून पराभव पत्करावा लागला होता, मात्र कांस्यपदकाच्या सामन्यात बजरंगने प्रारंभापासून कझाकिस्तानच्या नियाबेकोव्हविरुद्ध आक्रमक खेळाला सुरुवात केली. रवी दहियापाठोपाठ आता २७ वर्षीय बजरंगने ऑलिम्पिक पदक जिंकून भारतीय कुस्ती...
8 Aug 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, August 7th, 2021
ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकीची मोठी झेप : पंतप्रधानांनी केले कौतुक, खिलाडूवृत्ती सोडली नाही, ग्रेट ब्रिटनला तिसरे स्थान, टोकियो, ६ ऑगस्ट – इतिहास रचणार्या भारतीय महिला हॉकी संघाचे आपले पहिले ऑलिम्पिक पदक मिळविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. शुक्रवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासाठीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनविरुद्ध कडवी झुंज देऊनही भारतीय संघाला ४-३ अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला. कांस्य गमावले असले तरी या सामन्यासह संपूर्ण स्पर्धेत खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करीत महिला हॉकीपटूंनी सार्यांचे मने जिंकली. भारतीय महिलांनी...
7 Aug 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, August 7th, 2021
केंद्र सरकारने केले नवीन नामकरण, नवी दिल्ली, ६ ऑगस्ट – क्रीडा क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार यापुढे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ म्हणून ओळखला जाणार आहे. आतापर्यंत हा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ म्हणून ओळखला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. देशाला अभिमानास्पद ठरणार्या अनेक घटना घडत असताना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात यावे, असा आग्रह...
7 Aug 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, August 5th, 2021
टोकियो, ५ ऑगस्ट – टोकियो ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी पुरुषांच्या ५७ कि. ग्रॅ. वजनगटाच्या फ्री-स्टाईल कुस्तीच्या अंतिम सामन्यात भारताचा २३ वर्षीय रवीकुमार दहियाला रूपेरी यश मिळाले आहे. रशियाच्या दोन वेळच्या विजेता झव्हूर उगेव्हने त्याच्यावर ४-७ अशा गुणांनी विजय मिळवला. रवीकुमार ऑलिम्पिक रौप्य जिंकणारा सुशीलकुमारनंतरचा (२०१२ लंडन ऑलिम्पिक) दुसरा भारतीय कुस्तीपटू ठरला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे दुसरे रौप्य व एकूण पाचवे पदक आहे. रवी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा चौथा भारतीय पुरुष कुस्तीपटू आणि एकूण...
5 Aug 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, August 5th, 2021
४१ वर्षांनंतर आला ऐतिहासिक क्षण, जर्मनीचा ५-४ ने पराभव, टोकियो, ५ ऑगस्ट – टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने जर्मनीवर ५-४ विजय नोंदवून कांस्यपदक पटकावले. त्यांनी केवळ कांस्यपदकच पटकावले नाही, तर देशवासीयांचे मनही जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा हा ऐतिहासिक क्षण तब्बल ४१ वर्षांनंतर आला. कांस्यपदकासाठी झालेल्या या चुरशीच्या सामन्यात सिमरनजीतसिंग, हार्दिकसिंग, हरमनप्रीतसिंग व रूपिंदर पाल सिंगने शानदार गोल नोंदविले व ते भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या विजयाबरोबर भारतीयांमध्ये...
5 Aug 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, August 5th, 2021
लवलिना बोर्गोहेनला कांस्यपदक, टोकियो, ४ ऑगस्ट – टोकियो ऑलिम्पिकमध्ये बुधवारी भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करीत भारताच्या पदकाच्या आशा कायम राखल्या आहे. लवलिना बोर्गेहेनने मुष्टियुद्धात कांस्यपदक मिळविले, तर भारतीय महिला संघाचे ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंग झाले असले, तरी त्यांना कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. तसेच कुस्तीपटू रवी दहियाने अंतिम फेरी गाठून किमान रौप्यपदक निश्चित केले आहे, तर दीपक पुनियाला कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. ऍथ्लेटिक्समध्ये नीरज चोप्राने पात्रता...
5 Aug 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, August 3rd, 2021
बलाढ्य ऑस्ट्रेलियाला केले पराभूत, टोकियो, २ ऑगस्ट – विजयाचा दृढनिश्चय करून मैदानात उतरलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी येथे इतिहास रचला. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तीन वेळा विजेत्या आणि जगात दुसर्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला १-० ने पराभूत करण्यात भारताला अभूतपूर्व यश आले. पुरुषांचा हॉकी संघही ४९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उपांत्य फेरीत पोहोचला. त्यानंतर अवघ्या एक दिवसाच्या अंतराने महिला हॉकी संघानेही इतिहास...
3 Aug 2021 / No Comment / Read More »