Posted by वृत्तभारती
Wednesday, February 15th, 2023
नागपूर, (१५ फेब्रुवारी ) – राजे रघुजी भोसलेंसारखा समंजसपणा सदासर्वदा आपल्यात असता तर हा देश पारतंत्र्यात कधीच गेला नसता, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. श्रीमंत राजे रघुजी भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट यांच्या वतीने राजरत्न पुरस्कार वितरण महालमधील मोठ्या राजवाड्यात झाले. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला श्रीमंत राजे रघुजी भोसले (पंचम) व श्रीमंत राजे मुधोजी...
15 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 6th, 2023
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, मुंबई, (५ फेब्रुवारी ) – भारतात आज प्रचंड क्षमता आहे. प्रत्येक क्षेत्रात कुशल मनुष्यबळ देशाकडे उपलब्ध आहे. विश्वगुरू होण्यासाठी संपूर्ण अनुकूल परिस्थिती आहे. संत शिरोमणी रोहिदास यांच्या समरसतेच्या तत्त्वांचे आचरण प्रत्येकाने केल्यास भारताला विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे ठाम प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात रविवारी पार पडलेल्या संत शिरोमणी रोहिदास जयंती सोहळ्यात ते बोलत होते....
6 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 30th, 2023
– सीता गायत्री अन्नदानम यांचे प्रतिपादन, – रा.से. समितीचा मकर संक्रमणोत्सव, नागपूर, (२९ जानेवारी) – महिलांविषयक भारतीय चिंतन व विचारांची समाजात पुनर्स्थापना करण्याचे कार्य राष्ट्र सेविका समिती करीत असल्याचे प्रतिपादन समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री अन्नदानम यांनी आज केले. राष्ट्र सेविका समितीचा मकर संक्रमणोत्सव जरीपटक्यातील दयानंद पार्कमध्ये आयोजित करण्यात आला. बी.जी. श्रॉफ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चित्रा दौलतानी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत कार्यवाहिका रोहिणी आठवले, नागपूर विभाग कार्यवाहिका...
30 Jan 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 15th, 2021
चित्रकूट, १५ डिसेंबर – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी धर्मत्याग केलेल्या हिंदूंना स्वधर्मात परत येण्याचे, तसेच त्यांना परत आणण्याचे आवाहन आज बुधवारी येथे केले. मध्यप्रदेशातील चित्रकूट येथे आयोजित हिंदू एकता महाकुंभात सहभागी होताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू धर्म सोडून इतर धर्मात प्रवेश घेतलेल्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेण्यासंबंधीची शपथ उपस्थितांना दिली. यावेळी सरसंघचालक म्हणाले की, प्रभू श्रीराम यांनी स्वत:साठी राक्षसांशी युद्ध केले नाही. त्यांनी हे सर्व समाजासाठी केले. रामाकडून...
15 Dec 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, October 30th, 2021
धारवाड, ३० ऑक्टोबर – देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या निमित्ताने संघाचे स्वयंसेवक समाज व विभिन्न संस्थांसोबत एकत्रित रीत्या काम करतील, तसेच विविध उपक्रमांचे आयोजन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य चळवळीतील अनाम क्रांतिकारकांचे जीवन समाजासमोर आणण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येतील, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आज शनिवारी येथे दिली. धारवाड येथे आयोजित रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाच्या बैठकीचा...
30 Oct 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, October 30th, 2021
बांगलादेश संदर्भात सहसरकार्यवाह अरुण कुमार यांचे प्रतिपादन, धारवाड, २९ ऑक्टोबर – बांगलादेशात हिंदू समाजावर झालेले आक्रमण ही अचानक घडलेली घटना नाही. खोट्या बातमीच्या आधारावर सांप्रदायिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा हिंदू समाजाच्या निर्मूलनाचा योजनाबद्ध प्रयत्न होता, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अरुण कुमार यांनी कार्यकारी मंडळाच्या दुसर्या दिवशीच्या बैठकीनंतर पत्रपरिषदेत बोलताना दिली. यावेळी अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर हेही उपस्थित होते. ही बैठक कर्नाटकच्या धारवाड येथे...
30 Oct 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, July 4th, 2021
डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, ४ जुलै – देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. ऐक्याचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. कलह नव्हे तर परस्पर संवाद हाच हिंदू-मुस्लिम संघर्षावर एकमेव तोडगा होय, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज रविवारी केले. मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे ‘हिंदुस्थानी प्रथम, हिंदुस्थान प्रथम’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे तत्कालीन सल्लागार डॉ....
4 Jul 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, May 9th, 2021
सेवा भारतीतर्फे ४५० खाटांचे विलगीकरण केंद्र, विहिंपतर्फे भोजन व्यवस्था, नवी दिल्ली, ९ मे – सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले ध्येय महासागर में सरित रूप हम मिले लोकयोगक्षेम ही राष्ट्र अभय गान है सेवारत व्यक्ती व्यक्ती कार्य का ही प्राण है वरीलप्रमाणे सेवेचे, समर्पणाचे गीत गात, ‘शिवभावे जीवसेवा’ हा स्वामी विवेकानंदांचा संदेश डोळ्यापुढे ठेवून राष्ट्री०य स्वयंसेवक संघ व परिवारातील सेवा भारती, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय मजदूर संघ इत्यादी...
9 May 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 20th, 2021
बंगळुरू, २० मार्च – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सरकार्यवाह म्हणून दत्तात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची दोन दिवसीय बैठक काल बंगळुरू येथे पार पडली. या बैठकीत काल, शनिवारी होसबळे यांची ही निवड करण्यात आली. वाढत्या वयोमानामुळे आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी इच्छा भय्याजी जोशी यांनी व्यक्त केल्यामुळे त्यांच्या जागी दत्तात्रेय होसबळे यांची निवड प्रतिनिधी सभेने केली, अशी माहिती संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख...
20 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 20th, 2021
सुनील आंबेकर अ. भा. प्रचारप्रमुख, रा. स्व. संघाच्या नवीन केंद्रीय पदाधिकार्यांची घोषणा, नवी दिल्ली, २१ मार्च – बंगळुरू येथे झालेल्या रा. स्व. संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत संघाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकार्यांची घोषणा करण्यात आली. नवीन सरकार्यवाह म्हणून दत्तात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली. आतापर्यंत प्रचारप्रमुख म्हणून उत्तरदायित्व असलेल्या अरुण कुमार यांची सहसरकार्यवाह म्हणून निवड झाली. आतापर्यंत सहप्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी असलेल्या सुनील आंबेकर यांच्याकडे अ. भा. प्रचार प्रमुखपदाचे दायित्व...
20 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 2nd, 2021
अकोला, २ फेब्रुवारी – करीअर म्हणजे प्राप्ती नाही. मनुष्य विकसित झाल्यावर त्याला प्राप्त गोष्टींचे वितरण त्याने केले पाहिजे. समर्पित होणे हे जीवन आहे. असे निःस्वार्थ समर्पण हेच स्वयंसेवकत्व आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे व्यक्त केले. मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या हस्ते शंकरलाल उर्फ काकाजी खंडेलवाल यांच्या जन्मशताब्दी समारोहानिमित्त ‘संघसमर्पित काकाजी’ या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी हे विचार व्यक्त केले. यावेळी मोहनजी...
2 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 8th, 2014
=रा. स्व. संघाच्या प्रतिनिधी सभेला बंगळुरू येथे प्रारंभ= बंगलोर, (७ मार्च) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आजपासून येथे प्रारंभ झाला. देशात परिवर्तनाची लाट आहे. प्रत्येकांनाच परिवर्तन हवे असल्याने परिवर्तनाच्या या लाटेत प्रत्येकच नागरिकाने सहभागी व्हायला हवे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सक्षम नेते आहेत. गुजरातमध्ये त्यांनी जे परिवर्तन करून दाखविले, त्याचीच पुनरावृत्ती देशात करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे रा. स्व. संघाने आज स्पष्ट केले....
8 Mar 2014 / No Comment / Read More »