Posted by वृत्तभारती
Wednesday, November 5th, 2014
न्यूयॉर्क, [४ नोव्हेंबर] – जन्म आणि मृत्यू हे या भूतलावरील कुणाच्याही हातात नाही, हेच निर्विवाद सत्य आहे. जन्माला आल्यानंतर आपण नेमके किती वर्ष जगणार, हे सांगणे तसे अगदीच कठीण आहे. पण, सावधान… तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीमधून एक आगळावेगळाच ‘ऍप’ विकसित होत आहे. त्याचे नावच ‘डेडलाईन’ असे ठेवण्यात आले असून, हा ऍप आपल्या आयफोनच्या हेल्थकिट उपकरणांचे विश्लेषण करून ‘आपण नेमके किती दिवस जगणार आहोत,’ याची माहिती देणार आहे! या आयफोनच्या...
5 Nov 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, October 30th, 2014
सॅनफ्रॅन्सिस्को, [२९ ऑक्टोबर] – कर्करोग आणि हृदयविकार यासारख्या घातक रोगांचा आधीच इशारा देणारी काही यंत्रणा मानवी शरीरात आहे किंवा नाही याचा शोध घेणारे डिटेक्टर तयार करण्याचा प्रयत्न इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गूगलकडून केला जात आहे. जीवन विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे एक पथक गूगल एक्स लॅब या विशेष योजनेवर सध्या काम करत आहे. या पथकातील तज्ज्ञ रक्तपेशींच्या माध्यमातून यासंबंधीचे काही संदेश मिळतात का, हे जाणून घेण्यासाठी नॅनोपार्टिकल्सची मदत घेत आहेत आणि तसे...
30 Oct 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, October 30th, 2014
उत्कृष्ट संघ व्यवस्थापनाचा परिचय जर्मनीच्या शास्त्रज्ञांचे संशोधन बर्लिन, [२९ ऑक्टोबर] – डार्विनचा उत्क्रांतीवाद जगात प्रसिद्ध आहे. त्यानुसार माकडापासूनच हळूहळू उत्क्रांत होत मनुष्याची निर्मिती झाली म्हणतात. त्यातही ‘चिम्पांझी’ जातीच्या माकडाचे वैशिष्ट्य असे की त्याची व माणसाची गुणसूत्रे बर्याच प्रमाणात सारखी आहेत. त्यामुळेच कदाचित माणसाची काही वैशिष्ट्ये चिम्पांझीमध्येही पाहावयास मिळतात. आता हेच पाहा ना. दुसर्या दिवशीचा नाश्ता कोणता असावा, त्यात कोणते पदार्थ असावेत याचे नियोजन ‘माणसाची गृहिणी’ आधीच करून ठेवते. पण, आता...
30 Oct 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, October 5th, 2014
=पूर्व भागात जा; सूर्य, पृथ्वी, चंद्राची लपाछपी पाहा= इंदूर, [४ ऑक्टोबर] – या वर्षातील दुसरे आणि शेवटचे खग्रास चंद्रग्रहण येत्या ८ ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे. खगोल शास्त्रज्ञांच्या मते सूर्य, पृथ्वी आणि चंद्रातील लपाछपीचा मनमोहक खेळ जर बघायचा असेल, तर देशाच्या पूर्व भागाचा दौरा करायलाच हवा. भारतीय वेळेनुसार बुधवार ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ४४ मिनिटांनी या चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. तर, सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटे ७ सेकंदपर्यंत हे...
5 Oct 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 28th, 2014
=ट्रॅफिक सिग्नलचा वापर करताना टिपले छायाचित्र= न्यूयॉर्क, [२७ सप्टेंबर] – मंगळाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका आणि भारताचे यान एकामागोमागच या तपकिरी ग्रहावर पोहोचले. भारताच्या यानाने मंगळाच्या कक्षेत दाखल होताच भूपृष्ठाचे पहिले छायाचित्र पाठविल्यानंतर आता अमेरिकन नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरनेही मंगळावरील आगळेच छायाचित्र पाठविले आहे. या छायाचित्रात दोन एलियन्स चक्क ट्रॅफिक सिग्नल्सचा वापर करून रस्ता ओलांडताना दाखविले आहेत. मंगळावर प्रवेश करताच भूपृष्ठावरील वातावरणाचा शोध घेण्यात व्यस्त झालेल्या रोव्हरने या एलियन्सचे छायाचित्र आपल्या कॅमेरात...
28 Sep 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, September 16th, 2014
=पृथ्वीवर संदेश पाठविण्यास सुरुवात, आता उरले केवळ ९ दिवस= चेन्नई, [१५ सप्टेबर] – गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोडलेले मंगळयान मंगळ ग्रहावर उतरण्यास आता केवळ ९ दिवस शिल्लक राहिले आहेत. यानाला मंगळाच्या कक्षेत सुरळीतपणे प्रवेश करता यावा, यासाठी इस्रोने आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटाच्या अंतराळ केंद्रात आवश्यक ती प्रक्रिया सुरू केलेली आहे. पहिल्याच प्रयत्नात जर भारताचे मंगळयान मंगळ ग्रहावर दाखल झाले, तर असे करणारा भारत जगातील पहिलाच देश...
16 Sep 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, September 8th, 2014
लंडन, [७ सप्टेंबर] – एखाद्याने कळत न कळत उच्चारलेला एखादा शब्द कुणाला कायमचा जिव्हारी लागतो. काहींना एखाद्या घटनेमुळे मानसिक धक्का बसून मनात कटु स्मृती कायमच्या कोरल्या जातात. काही जण सकारात्मक व आनंदी मनोवृत्तीमुळे कुठलीही कडू आठवण किंवा एखाद्याचे वाईट शब्द विसरतात. पण काही जण मात्र मनावरील या जखमा कायम कुरवाळत बसतात. कितीही प्रयत्न केला, तरी त्यांच्या मेंदूतून त्या आठवणी काही पुसल्या जात नाहीत आणि याचा मानसिक त्रास त्यांना व त्यांच्या...
8 Sep 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, September 1st, 2014
वॉशिंग्टन, [३१ ऑगस्ट] – अतिजलद संपर्काचे माध्यम असलेल्या ई-मेल सुविधेला ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही ई-मेल सुविधा मुंबईत जन्मलेल्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाने जगाला दिलेली देणगी आहे. त्यांचे नाव व्ही. ए. शिवा अय्यादुराई असून त्यांनी जेव्हा १९७८ मध्ये ई-मेलचा शोध लावला होता त्यावेळी त्यांचे वय जेमतेम १४ वर्षांचे होते! त्यांनी ‘ई-मेल’ नावाच्या एका कॉम्प्युटर प्रोग्रॅमची निर्मिती केली. अमेरिकन सरकारने १९८२ मध्ये अय्यादुराई याला ई-मेलचा कॉपीराईट बहाल करून ई-मेलचा...
1 Sep 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, July 31st, 2014
=आठ लाख युझर्सना फटका= नवी दिल्ली, [३० जुलै] – तंत्रज्ञान जसजसे व्यापक होत जाते, सर्वदूर पोहोचते तसतसे त्याच्यात अडथळे येण्याचे किंवा आणण्याचे प्रकार घडतात. नवीन लोकप्रिय सोशल साईट्सबाबतही असेच घडत आहे. सोशल मीडियातील सर्वांत मोठी वेबसाईट असलेल्या फेसबुकला नव्या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत फेसबुकवरील सुमारे आठ लाख अकाऊंटसमध्ये हा व्हायरस शिरल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या व्हायरसमुळे फेसबुक वॉलवर आपल्याला मित्राने पाठविलेल्या बनावट व्हिडीओची लिंक दिसते. या व्हिडीओवर क्लिक केल्यानंतर...
31 Jul 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, July 28th, 2014
‘भानगडबाज’ जोडीदारावर आता वचक ठेवता येणार लंडनच्या एमस्पा कंपनीने बनविले स्पेशल ऍप लंडन, [२७ जुलै] – आता या प्रेमवीरांच्या हातात असे ऍप आले आहे की उदास गीत गाण्याची त्यांच्यावर वेळच येणार नाही. यापूर्वीच त्यांना आपल्या जोडीदाराचे वास्तव समजले असेल. आपण जिच्यावर जीवापाड प्रेम करतो ती आपली प्रेयसी दुसर्याच्या मागे गेली किंवा दुसर्याने तिला गटवली तर प्रियकराचा पार ‘देवदास’ होतो. हेच तत्त्व प्रेयसीलाही लागू पडते. ज्याच्यावर जीव ओेवाळला आणि सात जन्म...
28 Jul 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, July 27th, 2014
=मंगळावर राहण्याचा केला होता सराव= वॉशिंग्टन, [२६ जुलै] – मंगळावर भविष्यात मानववस्ती थाटता येईल काय, याविषयीचे गुढ अजूनही कायम असले तरी तिथे वस्ती शक्य झाल्यास कसे राहायचे, याबाबतचा सराव तब्बल चार महिने केल्यानंतर शास्त्रज्ञ आज अखेर आपल्या सामान्य जीवनात परतले आहेत. नासाने हवाईयन ज्वालामुखी बेट असलेल्या मौना लोआ भागात एक हजार चौरस फुटाच्या खोलीत मंगळासारख्याच वातावरणाची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या चार महिन्यांपासून सौर ऊर्जा असलेल्या या खोलीत स्वयंपाकघर आणि...
27 Jul 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, July 15th, 2014
=भारतीय अभियंत्याची कमाल= बंगळुरू, [१४ जुलै] – सध्या वाहनांसाठी आवश्यक असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. याशिवाय या नैसर्गिक इंधनाचा साठा संपल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. एका भारतीय अभियंत्यांने या प्रश्नाचे उत्तर शोधले असून, विजेवर आणि सौरऊर्जेवर चालणारी तीनचाकी रिक्षा तयार केली आहे. नवीन राबेल्ली असे या भारतीय अभियंत्याचे नाव असून, गेली दोन वर्षे त्यांनी एका जुन्या रिक्षाला वीज आणि...
15 Jul 2014 / No Comment / Read More »