Posted by वृत्तभारती
Tuesday, January 13th, 2015
=निवडणुकीचा शंखनाद, मतमोजणी १० फेब्रुवारीला= नवी दिल्ली, [१२ जानेवारी] – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेची निवडणूक ७ फेब्रुवारीला तर मतमोजणी १० फेब्रुवारीला होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत केली. निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना संक्रातीच्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला जारी केली जाणार आहे. २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज...
13 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 13th, 2015
बडोदा, [१२ जानेवारी] – येत्या प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे स्वागत करण्यासाठी भारत देश सज्ज झाला असतानाच, अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या मकरसंक्रातीनिमित्त आकाशात झेपावण्यासाठी मोदी आणि ओबामा पतंगही सज्ज झाले आहेत. प्रामुख्याने गुजरातच्या बडोदा, सूरत, भरूच, राजकोट, अहमदाबाद आणि राज्यातील अन्य शहरांमधील बाजारपेठा मोदी आणि ओबामांचे छायाचित्र असलेल्या पतंगांनीच सजल्या आहेत. या दोन्ही पतंगांना गुजरातमध्ये प्रचंड मागणी होत आहे, अशी माहिती बडोदा पतंग विक्री आणि मालकी...
13 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, January 11th, 2015
=२४ तास वीज, प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पक्क्या घराचे आश्वासन= नवी दिल्ली, [१० जानेवारी] – दिल्लीत २४ तास वीज आणि २०२२ पर्यंत प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पक्के घर देण्याची घोषणा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत स्थिर, सक्षम आणि बहुमताचे सरकार निवडून देण्याचे आवाहन दिल्लीवासीयांना केले. रामलीला मैदानावर आयोजित विराट सभेत पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. आपल्या भाषणात केजरीवाल यांच्यावर टीका करताना त्यांना धरणे, निदर्शनेच करू द्या, असा...
11 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 5th, 2015
रॉबर्ट वढेरांना झटका राजस्थान सरकारची कणखर भूमिका बिकानेर, [४ जानेवारी] – एका पैशाचीही गुंतवणूक न करता जमीन खरेदी करणारे आणि नंतर त्याच जमिनीच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमविणारे कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा चांगलेच अडचणीत आले आहेत. वढेरा यांच्या कंपनीसोबत झालेले सर्वच व्यवहार रद्द करून जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश राजस्थानमधील भाजपा सरकारने दिले आहेत. बिकानेरच्या कोलायत विभागातील ३६० हेक्टर जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातील...
5 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 5th, 2015
दिल्ली विधानसभा निवडणूक भाजपाच्या प्रचारात उतरणार सिनेकलावंत नवी दिल्ली, [४ जानेवारी] – निवडणूक आयोगाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप घोषित केल्या नसल्या तरी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आम आदमी पार्टीने आघाडी घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आपने आतापर्यंत सर्व म्हणजे ७० मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर केले असून, प्रचारालाही सुरुवात केली आहे. कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे तर, भाजपाने मात्र व्यूहरचनेचा भाग म्हणून आपल्या उमेदवारांची अद्याप घोषणा...
5 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 31st, 2014
=चर्चेला उधाण= नवी दिल्ली, [३० डिसेंबर] – दिल्लीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नावाचे ट्विट करून आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यास स्मृती इराणी यांना मुख्यमंत्री बनवण्यात येणार असल्याबाबत सुरू असलेली चर्चा खरी आहे काय, अशी विचारणा केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. स्थानिक एका प्रतिष्ठित हिंदी वृत्तपत्राच्या महिला वार्ताहराच्या ट्विटचा उल्लेख केजरीवाल...
31 Dec 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 29th, 2014
=रघुवर दास यांचे मत= रांची, [२८ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे ‘हिरो’ आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार झारखंडचा अतिशय झपाट्याने विकास करणार आहे, असे मत झारखंडचे नवे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी यांनी विकासासाठी जो पुढाकार घेतला आहे, त्याचेच अनुकरण आपण झारखंडच्या विकासाकरिता करणार आहे. मोदी हे माझ्यासाठी नायक आहेत, असे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर दास यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत रांचीचा ‘स्मार्ट...
29 Dec 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 26th, 2014
कोट्टायम, [२५ डिसेंबर] – विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने देशात सुरू असलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांतर्गत केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील दोन मंदिरांमध्ये ५८ ख्रिश्चनांनी हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केला. गुरूवारी पोनकुन्नाम येथील पुथियाकावू मंदिरात झालेल्या एका समारंभात २० ख्रिश्नच कुटुंबातील ४२ जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला तर, तिरुनाकारा येथील तिरुनाकारा श्रीकृष्ण स्वामी मंदिरात पार पडलेल्या समारंभात १६ जणांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला, असे विहिंपचे जिल्हाध्यक्ष बालचंद्रन पिल्लई यांनी सांगितले. यावेळी धर्मांतरण करणार्यांपैकी एक जण...
26 Dec 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 26th, 2014
=झारखंडमध्ये प्रचार केलेल्या आठपैकी सात ठिकाणी पराभव= रांची, [२५ डिसेंबर] – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक दशके देशावर राज्य करणार्या कॉंग्रेस पक्षाचे भवितव्य म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते ते पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पराभवाची मालिका अखंडपणे सुरूच असून, नुकत्याच पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी प्रचार केलेल्या आठपैकी सात मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. पाच टप्प्यात पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी प्रचार केलेल्या आठही...
26 Dec 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 23rd, 2014
=४३ ते ४७ जागा मिळण्याची शक्यता : जनमत चाचणीचा निष्कर्ष= नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] – झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत आणि जम्मू-काश्मिरात दुसरा मोठा पक्ष म्हणून भाजपाचा उदय होणार असल्याचे भाकीत सर्वच जनमत चाचण्यांनी केल्यानंतर, पुढील वर्षी राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाच ४३ ते ४७ जागा जिंकून स्वबळावर सत्तेवर येणार असल्याचा निष्कर्ष एका ताज्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. तथापि, मुख्यमंत्रिपदासाठी अजूनही आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनाच पसंती असल्याचे...
23 Dec 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 23rd, 2014
=केरळातही ‘घर वापसी’= अलपुझा, [२२ डिसेंबर] – विश्व हिंदू परिषदेच्या ‘घर वापसी’ अभियानांतर्गत रविवारी केरळातील अलपुझा जिल्ह्यात ३० ख्रिश्चन नागरिकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. चेप्पाडच्या कनिचनल्लोर येथील देवळात धर्मांतरणाचा हा सोहळा शांततेत पार पडला. आधी हे नागरिक हिंदूच होते. आमिष दाखवून आणि बळजबरी करून त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले होते. आज पुन्हा आपल्या धर्मात परत आल्याचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया या नागरिकांनी दिली. विशेष म्हणजे, ज्या कुटुंबातील...
23 Dec 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 14th, 2014
जनमत चाचणीतील निष्कर्ष ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता नवी दिल्ली, [१३ डिसेंबर] – पुढील वर्षी फेबु्रवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होत असलेल्या राजधानी दिल्लीत भाजपा स्पष्ट बहुमत प्राप्त करून सत्तेवर येणार असल्याचे एका ताज्या जनमत चाचणीत दिसून आले आहे. गेल्या निवडणुकीत २८ जागा जिंकणार्या आम आदमी पार्टीला यावेळी केवळ १७ जागांवर आणि कॉंगे्रसला ७ ते ८ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज-नील्सनने गेल्या आठवड्यात दिल्लीकरांच्या मनातला कौल जाणून...
14 Dec 2014 / No Comment / Read More »