|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.16° से.

कमाल तापमान : 26.71° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.71° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 27.99°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.52°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.44°से. - 26.98°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 25.88°से.

बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

24.11°से. - 25.32°से.

गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.75°से. - 26.28°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

महाराष्ट्रासह देशात १४ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवेची योजना

महाराष्ट्रासह देशात १४ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवेची योजनानवी दिल्ली, २ नोव्हेंबर – महाराष्ट्रासह देशभरात सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी आणखी १४ ठिकाणी जल विमानतळ बनवण्याची योजना सरकारने आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि अहमदाबादमधील साबरमती नदीकिनारी या सेवांची यशस्वी सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार, आसाम आणि उत्तराखंडात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. आरसीएस उडान योजनेंतर्गत आणखी १४ ठिकाणी जल विमानतळांचा विकास करण्याचे...2 Nov 2020 / No Comment / Read More »

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटींवर

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटींवरनवी दिल्ली, १ नोव्हेंबर – फेब्रुवारीपासून आणि मार्चमध्ये झालेल्या टाळेबंदीनंतर प्रथमच ऑक्टोबर महिन्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. ऑक्टोबर महिन्यात १,०५,१५५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. सप्टेंबरमध्ये ९५,४८० कोटी रुपये जीसएटी संकलन झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात १९,१९३ कोटी रुपयांचा केंद्रीय जीएसटी, तर २५,४११ कोटी रुपयांचा राज्य जीएसटी वसूल करण्यात आला. या कालावधीत ५२,५४० कोटी रुपयांचे एकीकृत जीएसटी संकलन...2 Nov 2020 / No Comment / Read More »

कोरोना लक्षणांत आयुर्वेद प्रभावी

कोरोना लक्षणांत आयुर्वेद प्रभावीआयुर्वेद संस्थान पथकाचा अनुभव, नवी दिल्ली,१ नोव्हेंबर – ‘आयुष कवठ’ आणि ‘फिफाट्रोल’ ही आयुर्वेदिक औषधे कोरोनाच्या सौम्य ते मध्यम लक्षणांच्या पूर्ण प्रतिरोधासह अगदी अल्प कालावधीतही प्रभावी ठरू शकतात, असे आयुष मंत्रालयांतर्गत दिल्लीस्थत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या (एआयआयए) डॉक्टरांच्या पथकाला आढळून आले आहे. ‘आयुष कवठ’, ‘फिफाट्रोल गोळ्या’, ‘संशमनी वटी’ आणि ‘लक्ष्मीविलास रस’ या चार आयुर्वेदिक औषधांच्या साह्याने कोरोना रुग्णांची प्रकृती तर सुधारलीच, शिवाय उपचारानंतर सहा दिवसांच्या आतच त्यांची जलद प्रतिजन चाचणीही (रॅपिड...1 Nov 2020 / No Comment / Read More »

पुलवामा हल्ल्याचे स्वार्थासाठी राजकारण

पुलवामा हल्ल्याचे स्वार्थासाठी राजकारणपंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला, केवडिया, ३१ ऑक्टोबर – पुलवामा हल्ला पाकिस्ताननेच केला होता, ही सत्यता त्यांच्याच एका वरिष्ठ मंत्र्याने संसदेत सांगितली. सीआरपीएफचे ४० जवान यात शहीद झाले होते. संपूर्ण देश दु:खात होता आणि काही लोक या घटनेवरही स्वार्थाचे राजकारण करीत होते. या लोकांनी शहीदांचा अपमान केला, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंगे्रसचे खासदार राहुल गांधींवर चढविला. प्रधानमंत्री मोदी यांनी गुजरात दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांना...31 Oct 2020 / No Comment / Read More »

मोफत लसीचे आश्‍वासन आचारसंहितेचा भंग नाही

मोफत लसीचे आश्‍वासन आचारसंहितेचा भंग नाहीनिवडणूक आयोगाचा साकेत गोखलेंना दणका, नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने दिलेल्या मोफत कोरोना लसीच्या आश्‍वासनामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असे निवडणूक आयोगाने आज शनिवारी स्पष्ट केले आहे. भाजपाच्या या आश्‍वासनामुळे आचारसंहितेतील कोणत्याही तरतुदीचा भंग झाल्याचे आढळले नाही, असे निवडणूक आयोगाने माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना स्पष्ट केले. आदर्श आचारसंहितेतील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन झालेले नाही, असे आयोगाने म्हटले आहे. हे आश्‍वासन...31 Oct 2020 / No Comment / Read More »

केवळ लग्न करण्यासाठी धर्मांतरण वैध नाही

केवळ लग्न करण्यासाठी धर्मांतरण वैध नाहीअलाहाबाद उच्च न्यायालयाचे निरीक्षण, अलाहाबाद, ३१ ऑक्टोबर – लग्न करण्यासाठी धर्मांतरण करणे वैध नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण अलाहबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. लग्नासाठी धर्मांतरण योग्य की अयोग्य, याबाबत देशात सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, त्या पृष्ठभूमीवर उच्च न्यायालयाचे हे निरीक्षण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका जोडप्याने आंतरधर्मीय विवाह केला आहे. या विवाहाला कुटुंबीयांचा विरोध आहे. त्यामुळे आमच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्यापासून कुटुंबीयांना रोखा, अशी मागणी करणारी याचिका या...31 Oct 2020 / No Comment / Read More »

यापुढे अन्नधान्यासाठी तागाचाच बारदाना वापरणार

यापुढे अन्नधान्यासाठी तागाचाच बारदाना वापरणारकेंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय, नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर – प्लास्टिक बॅगऐवजी १०० टक्के अन्नधान्य यापुढे ज्युटच्या (ताग) पोत्यातून विक्रीसाठी आणण्याचा तसेच साखरेपासून तयार होणार्‍या इथेनॉलच्या किंमतीत वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज राष्ट्रीय माध्यम केंद्रात आयोजित पत्रपरिषदेत दिली. तागउत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी यापुढे सर्व अन्नधान्य...30 Oct 2020 / No Comment / Read More »

देशाच्या स्वाभिमानाला धक्का लागू देणार नाही!

देशाच्या स्वाभिमानाला धक्का लागू देणार नाही!-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’मध्ये चीनवर हल्ला, नवी दिल्ली, २८ जून – भारताच्या भूभागावर डोळा ठेवणार्‍यांना लडाखमध्ये चोख प्रत्युत्तर देण्यात आले. देशाच्या स्वाभिमानाला धक्का लागू देणार नाही, हे आपल्या वीर सैनिकांनी दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर ‘मन की बात’मध्ये म्हटले आहे. या मुद्यावर कॉंग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर हल्ले करीत आहे, हे महत्त्वाचे. गलवान खोर्‍यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत झालेल्या संघर्षात हौतात्म्य पत्करणार्‍या...29 Jun 2020 / No Comment / Read More »

राहुल गांधी चीन, पाकिस्तानची भाषा बोलताहेत : अमित शाह

राहुल गांधी चीन, पाकिस्तानची भाषा बोलताहेत : अमित शाहनवी दिल्ली, २८ जून – सीमेवर आपले जवान लढत असतांना राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केला. चीनसीमेवरील तणावाबाबत राहुल गांधी कधीही संसदेत चर्चा करू शकत होते, मात्र सीमेवर आपले जवान प्राण धोक्यात टाकून लढत असतांना चीन आणि पाकिस्तानला आनंद होईल, असे बोलणे त्यांनी टाळायला हवे होते, असे शाह म्हणाले. आता संसदेचे अधिवेशन होणार आहे, तुम्हाला संसदेत चर्चा करायची आहे,...29 Jun 2020 / No Comment / Read More »

राजीव गांधी फाऊंडेशनने चीनकडून पैसे घेतले

राजीव गांधी फाऊंडेशनने चीनकडून पैसे घेतले– चिदम्बरम् यांची कबुली! कॉंग्रेस पुन्हा तोंडघशी, नवी दिल्ली, २७ जून – राजीव गांधी फाऊंडेशनने चीनकडून घेतलेली देणगी परत केली, तर चीनने लडाखमध्ये केलेली घुसखोरी संपून जाईल व परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल का, असा अजब प्रश्न कॉंग्रेससचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी आज उपस्थित करीत, फाऊंडेशनने चीनकडून देणगी घेतल्याची कबुलीच देऊन टाकली. राजीव गांधी फाऊंडेशनने चीनकडून मोठी देणगी घेतल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी गुरुवारी...28 Jun 2020 / No Comment / Read More »

भारतात ‘डेक्सामेथासोन’ औषध वापरायला परवानगी

भारतात ‘डेक्सामेथासोन’ औषध वापरायला परवानगीनवी दिल्ली, २७ जून – देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन औषधाने उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे. सर्वप्रथम यूकेमधील संशोधनात डेक्सामेथासोन औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले. डेक्सामेथासोन हे औषध...28 Jun 2020 / No Comment / Read More »

स्वार्थासाठी देशाशी कितीवेळा विश्वासघात केला : नड्डा

स्वार्थासाठी देशाशी कितीवेळा विश्वासघात केला : नड्डा– भाजपाध्यक्षांचा सोनिया गांधींना थेट सवाल, नवी दिल्ली, २७ जून – चीन आणि कॉंग्रेस यांच्यातील संशयास्पद संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने देणगी का दिली, असा प्रश्न आज पुन्हा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी उपस्थित केला. आपल्या स्वार्थासाठी देशाशी किती वेळा विश्वासघात केला, हे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वा आयोजित पत्रपरिषदेत गांधी घराण्यावर आज लागोपाठ तिसर्‌या दिवशी हल्ला चढवताना नड्डा म्हणाले...28 Jun 2020 / No Comment / Read More »