|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.9° से.

कमाल तापमान : 27.96° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 63 %

वायू वेग : 3.4 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.96° से.

हवामानाचा अंदाज

27.85°से. - 31.24°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

26.76°से. - 31°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.88°से. - 29.76°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.49°से. - 30.23°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.3°से. - 30.25°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.38°से. - 29.76°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल
Home »

दिल्ली कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळली

दिल्ली कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळली=शीला दीक्षित-अजय माकन यांच्यात जुंपली= नवी दिल्ली, [१४ जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच कॉंग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून, ज्येष्ठ नेत्या व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि कॉंग्रेस सरचिटणीस व विधानसभा निवडणुकीसाठी गठित प्रचार समितीचे प्रमुख अजय माकन यांनी एकमेकांवर जाहीरपणे आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.त्यामुळे गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिसर्‍या स्थानावर राहिलेल्या कॉंग्रेसचे या निवडणुकीतील भवितव्यही आणखी अंध:कारमय होण्याची शक्यता बळावली आहे. कधीकाळी सोनिया गांधी यांच्या निकटवर्ती...15 Jan 2015 / No Comment / Read More »

दिल्ली विधानसभा निवडणूक ७ फेब्रुवारीला

दिल्ली विधानसभा निवडणूक ७ फेब्रुवारीला=निवडणुकीचा शंखनाद, मतमोजणी १० फेब्रुवारीला= नवी दिल्ली, [१२ जानेवारी] – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेची निवडणूक ७ फेब्रुवारीला तर मतमोजणी १० फेब्रुवारीला होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत केली. निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना संक्रातीच्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला जारी केली जाणार आहे. २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज...13 Jan 2015 / No Comment / Read More »

संक्रातीला उडणार मोदी-ओबामा पतंग

संक्रातीला उडणार मोदी-ओबामा पतंगबडोदा, [१२ जानेवारी] – येत्या प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे स्वागत करण्यासाठी भारत देश सज्ज झाला असतानाच, अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या मकरसंक्रातीनिमित्त आकाशात झेपावण्यासाठी मोदी आणि ओबामा पतंगही सज्ज झाले आहेत. प्रामुख्याने गुजरातच्या बडोदा, सूरत, भरूच, राजकोट, अहमदाबाद आणि राज्यातील अन्य शहरांमधील बाजारपेठा मोदी आणि ओबामांचे छायाचित्र असलेल्या पतंगांनीच सजल्या आहेत. या दोन्ही पतंगांना गुजरातमध्ये प्रचंड मागणी होत आहे, अशी माहिती बडोदा पतंग विक्री आणि मालकी...13 Jan 2015 / No Comment / Read More »

‘त्यांना’ धरणे, निदर्शनेच करू द्या : मोदी

‘त्यांना’ धरणे, निदर्शनेच करू द्या : मोदी=२४ तास वीज, प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पक्क्या घराचे आश्‍वासन= नवी दिल्ली, [१० जानेवारी] – दिल्लीत २४ तास वीज आणि २०२२ पर्यंत प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पक्के घर देण्याची घोषणा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत स्थिर, सक्षम आणि बहुमताचे सरकार निवडून देण्याचे आवाहन दिल्लीवासीयांना केले. रामलीला मैदानावर आयोजित विराट सभेत पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. आपल्या भाषणात केजरीवाल यांच्यावर टीका करताना त्यांना धरणे, निदर्शनेच करू द्या, असा...11 Jan 2015 / No Comment / Read More »

वढेरांची जमीन ताब्यात घेण्याचे आदेश

वढेरांची जमीन ताब्यात घेण्याचे आदेशरॉबर्ट वढेरांना झटका राजस्थान सरकारची कणखर भूमिका बिकानेर, [४ जानेवारी] – एका पैशाचीही गुंतवणूक न करता जमीन खरेदी करणारे आणि नंतर त्याच जमिनीच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमविणारे कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा चांगलेच अडचणीत आले आहेत. वढेरा यांच्या कंपनीसोबत झालेले सर्वच व्यवहार रद्द करून जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश राजस्थानमधील भाजपा सरकारने दिले आहेत. बिकानेरच्या कोलायत विभागातील ३६० हेक्टर जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातील...5 Jan 2015 / No Comment / Read More »

भाजपा उमेदवारांची घोषणा लवकरच

भाजपा उमेदवारांची घोषणा लवकरचदिल्ली विधानसभा निवडणूक भाजपाच्या प्रचारात उतरणार सिनेकलावंत नवी दिल्ली, [४ जानेवारी] – निवडणूक आयोगाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप घोषित केल्या नसल्या तरी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आम आदमी पार्टीने आघाडी घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आपने आतापर्यंत सर्व म्हणजे ७० मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर केले असून, प्रचारालाही सुरुवात केली आहे. कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे तर, भाजपाने मात्र व्यूहरचनेचा भाग म्हणून आपल्या उमेदवारांची अद्याप घोषणा...5 Jan 2015 / No Comment / Read More »

केजरीवालने केले स्मृतींबाबत आश्‍चर्यजनक ट्विट

केजरीवालने केले स्मृतींबाबत आश्‍चर्यजनक ट्विट=चर्चेला उधाण= नवी दिल्ली, [३० डिसेंबर] – दिल्लीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नावाचे ट्विट करून आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना आर्श्‍चयाचा धक्का दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यास स्मृती इराणी यांना मुख्यमंत्री बनवण्यात येणार असल्याबाबत सुरू असलेली चर्चा खरी आहे काय, अशी विचारणा केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. स्थानिक एका प्रतिष्ठित हिंदी वृत्तपत्राच्या महिला वार्ताहराच्या ट्विटचा उल्लेख केजरीवाल...31 Dec 2014 / No Comment / Read More »

नरेंद्र मोदी आमचे ‘हिरो’

नरेंद्र मोदी आमचे ‘हिरो’=रघुवर दास यांचे मत= रांची, [२८ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे ‘हिरो’ आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार झारखंडचा अतिशय झपाट्याने विकास करणार आहे, असे मत झारखंडचे नवे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी यांनी विकासासाठी जो पुढाकार घेतला आहे, त्याचेच अनुकरण आपण झारखंडच्या विकासाकरिता करणार आहे. मोदी हे माझ्यासाठी नायक आहेत, असे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर दास यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत रांचीचा ‘स्मार्ट...29 Dec 2014 / No Comment / Read More »

५८ ख्रिश्‍चनांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश

५८ ख्रिश्‍चनांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेशकोट्टायम, [२५ डिसेंबर] – विश्‍व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने देशात सुरू असलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांतर्गत केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील दोन मंदिरांमध्ये ५८ ख्रिश्‍चनांनी हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केला. गुरूवारी पोनकुन्नाम येथील पुथियाकावू मंदिरात झालेल्या एका समारंभात २० ख्रिश्‍नच कुटुंबातील ४२ जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला तर, तिरुनाकारा येथील तिरुनाकारा श्रीकृष्ण स्वामी मंदिरात पार पडलेल्या समारंभात १६ जणांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला, असे विहिंपचे जिल्हाध्यक्ष बालचंद्रन पिल्लई यांनी सांगितले. यावेळी धर्मांतरण करणार्‍यांपैकी एक जण...26 Dec 2014 / No Comment / Read More »

राहुल गांधींच्या पदरी पुन्हा अपयश

राहुल गांधींच्या पदरी पुन्हा अपयश=झारखंडमध्ये प्रचार केलेल्या आठपैकी सात ठिकाणी पराभव= रांची, [२५ डिसेंबर] – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक दशके देशावर राज्य करणार्‍या कॉंग्रेस पक्षाचे भवितव्य म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते ते पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पराभवाची मालिका अखंडपणे सुरूच असून, नुकत्याच पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी प्रचार केलेल्या आठपैकी सात मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. पाच टप्प्यात पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी प्रचार केलेल्या आठही...26 Dec 2014 / No Comment / Read More »

दिल्लीत भाजपाची स्वबळावर सत्ता

दिल्लीत भाजपाची स्वबळावर सत्ता=४३ ते ४७ जागा मिळण्याची शक्यता : जनमत चाचणीचा निष्कर्ष= नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] – झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत आणि जम्मू-काश्मिरात दुसरा मोठा पक्ष म्हणून भाजपाचा उदय होणार असल्याचे भाकीत सर्वच जनमत चाचण्यांनी केल्यानंतर, पुढील वर्षी राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाच ४३ ते ४७ जागा जिंकून स्वबळावर सत्तेवर येणार असल्याचा निष्कर्ष एका ताज्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. तथापि, मुख्यमंत्रिपदासाठी अजूनही आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनाच पसंती असल्याचे...23 Dec 2014 / No Comment / Read More »

३० ख्रिश्‍चनांनी स्वीकारला हिंदू धर्म

३० ख्रिश्‍चनांनी स्वीकारला हिंदू धर्म=केरळातही ‘घर वापसी’= अलपुझा, [२२ डिसेंबर] – विश्‍व हिंदू परिषदेच्या ‘घर वापसी’ अभियानांतर्गत रविवारी केरळातील अलपुझा जिल्ह्यात ३० ख्रिश्‍चन नागरिकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. चेप्पाडच्या कनिचनल्लोर येथील देवळात धर्मांतरणाचा हा सोहळा शांततेत पार पडला. आधी हे नागरिक हिंदूच होते. आमिष दाखवून आणि बळजबरी करून त्यांना ख्रिश्‍चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले होते. आज पुन्हा आपल्या धर्मात परत आल्याचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया या नागरिकांनी दिली. विशेष म्हणजे, ज्या कुटुंबातील...23 Dec 2014 / No Comment / Read More »