Posted by वृत्तभारती
Thursday, January 29th, 2015
=रामविलास पासवान यांची माहिती= पाटणा, [२८ जानेवारी] – रालोआतील मुख्य घटक असलेला भाजपा हा आम्हाला मोठ्या भावासारखा आहे आणि बिहारमध्ये याचवर्षी होणारी विधानसभेची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत, अशी माहिती लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी येथे दिली. बिहार निवडणुकीत रालोआतील घटक पक्षांमध्ये जागावाटप हा फार मोठा मुद्दा राहणार नाही. लोजपाला किती जागा मिळतील, हादेखील आमच्यासाठी चिंतेचा विषय नाही. आपल्या पक्षाला इतक्याच...
29 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 28th, 2015
नवी दिल्ली, [२७ जानेवारी] – प्रजासत्ताक दिनाचा शानदार समारंभ आटोपताच राजधानी दिल्लीला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आम आदमी पार्टीचे समन्वयक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आपच्या पोस्टरबाजीमुळे संतापलेल्या बेदी यांनी, या पोस्टर्सवर परवानगी न घेता आपला फोटो लावण्यात आल्याचा आक्षेप घेतला आहे. ‘हा फोटो तत्काळ हटवण्यात यावा अन्यथा मला कायदेशीर कारवाई करावी लागेल,’ असा इशारा बेदी यांनी नोटीसद्वारे...
28 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 24th, 2015
=तीन ठार, १६ जखमी, दोन कैदी फरार= आरा, [२३ जानेवारी] – बिहारच्या आरा येथील दिवाणी न्यायालयाच्या संकुलात झालेल्या मानवी बॉम्ब स्फोटात एका पोलिसासह तिघांचा मृत्यू झाला असून, अन्य १६ जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर दोन कैदी पळाले असल्याची माहिती आहे. या न्यायालयात काही कुख्यात कैद्यांना हजर करण्यासाठी आणले असता, मानवी बॉम्ब बनलेल्या एका महिलेने सकाळी साडेअकराच्या सुमारास हा स्फोट घडवून आणला. तिने आपल्या बॅगमध्ये शक्तिशाली स्फोटके पेरून ठेवली होती....
24 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 24th, 2015
=पंतप्रधान होण्यासाठीच कॉंगे्रसशी हातमिळवणी : अमित शाहंचा नितीशकुमारांवर हल्ला= पाटणा, [२३ जानेवारी] – याचवर्षी विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या बिहारमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शुक्रवारी ‘मिशन १८५’ अर्थातच १८५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. भाजपाध्यक्षांनी यावेळी माजी मुख्यमंत्री आणि जदयु नेते नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला केला. पंतप्रधान होण्याची आपली व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नितीश कुमार यांनी कॉंगे्रससोबत हातमिळवणी केली. प्रख्यात समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांच्या तत्त्वांचा हा...
24 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 23rd, 2015
किरण बेदी मुख्यमंत्री झाल्यास आनंदच आपची वाटचाल तत्त्वानुसार नाही नवी दिल्ली, [२२ जानेवारी] – अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे संस्थापक व ज्येष्ठ विधिज्ञ शांतिभूषण यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे तोंड भरून कौतुक केले असून, हा भाजपाचा मास्टरस्ट्रोक असल्याचे वक्तव्य केल्यामुळे राजधानीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. हा आमच्या पक्षात अंतर्गत लोकशाही असल्याचा पुरावा असल्याचा दावा करून शांतिभूषण यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे...
23 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 21st, 2015
=हजारावर अर्ज दाखल= नवी दिल्ली, [२१ जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज बुधवारी शेवटच्या दिवशी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेस नेते अजय माकन यांच्यासह ५०० पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले. यामुळे ७० सदस्यीय दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार्यांची संख्या एक हजारावर गेली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शेवटच्या दिवशी अर्ज भरणार्या उमेदवारांमध्ये...
21 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 21st, 2015
=२० तरुण चेहर्यांना संधी= नवी दिल्ली, [२० जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला दोन दिवसांचा अवधी उरला असताना भाजपाने आपल्या ६२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपाने आपल्या यादीत २० तरुण चेहर्यांना संधी दिली आहे, तसेच २६ विद्यमान आमदारांवर पुन्हा विश्वास टाकला आहे. आम आदमी पार्टीने सर्वात आधी आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर कॉंग्रेसचे उमेदवार जाहीर झाले. भाजपाने आपल्या उमेदवारांची नावाची घोषणा सर्वांत शेवटी केली. आता फक्त भाजपाच्या...
21 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 21st, 2015
नवी दिल्ली, [२० जानेवारी] – भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी उद्या बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीकरिता पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज सादर करण्यापूर्वी किरण बेदी भव्य रोड शो आयोजित करणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. सकाळी बेदी यांचा रोड शो होईल. त्यानंतर त्या निवडणूक अधिकार्यांच्या कार्यालयात जाऊन आपला अर्ज भरतील, अशी माहिती सूत्राने दिली. दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल...
21 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 20th, 2015
=अमित शाह यांनी केली घोषणा= नवी दिल्ली, [१९ जानेवारी] – दिल्ली विधानसभेची निवडणूक भारतातील पहिल्या महिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या नेतृत्वात लढविण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने सोमवारी रात्री घेतला. भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी एका पत्रपरिषदेत ही घोषणा केली. किरण बेदी याच भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेदी यांच्या नेतृत्वात भाजपाला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वासही शाह...
20 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 17th, 2015
=किरण बेदींचे प्रदेश कार्यालयात जंगी स्वागत= नवी दिल्ली, [१६ जानेवारी] – माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या पाठोपाठ आम आदमी पार्टीच्या माजी नेत्या शाजिया इल्मी यांनीही आज शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. यामुळे आपमध्ये अस्वस्थता पसरली आहे तर, दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शाजिया इल्मी यांनी शुक्रवारी दुपारी प्रदेश भाजपा कार्यालयात भाजपाचे दिल्ली प्रभारी खा. प्रभात झा आणि प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
17 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 17th, 2015
=आपचे राजकारण नकारात्मक : किरण बेदी यांची भूमिका= नवी दिल्ली, [१६ जानेवारी] – पक्षाने आदेश दिला तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात लढण्यास आपण तयार आहोत, अशी भूमिका भाजपा नेत्या आणि भारतीय पोलिस सेवेतील पहिल्या महिला अधिकारी किरण बेदी यांनी आज शुक्रवारी स्पष्ट केली. केजरीवाल यांचे राजकारण नकारात्मक स्वरूपाचे आहे, असा आरोप त्यांनी केला. राजकारणात आपण कधीच जाणार नाही, अशी माझी भूमिका कधीच नव्हती. याबाबत...
17 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 16th, 2015
=दिल्ली विधानसभा निवडणूक= लखनौ, [१५ जानेवारी] – बहुजन समाज पक्ष आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व ७० जागा लढणार असल्याची घोषणा पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली असून, निवडणुकीच्या प्रचारालाही प्रारंभ केला आहे. बसपा या निवडणुकीत सर्व ७० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे आणि गुरुवारपासूनच पक्षाचा प्रचारही सुरू झाला आहे, असे मायावती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मायावती यांनी गुरुवारी आपला ५९ वा वाढदिवस जनकल्याण दिन म्हणून साजरा केला. लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे...
16 Jan 2015 / No Comment / Read More »