|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 25.97° से.

कमाल तापमान : 27.32° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 41 %

वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.32° से.

हवामानाचा अंदाज

23.58°से. - 27.99°से.

शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.33°से. - 26.99°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.57°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.47°से. - 27.72°से.

सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.64°से.

मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.05°से. - 27.04°से.

बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल

पाकिस्तानात जमावाकडून हिंदू मंदिराची तोडफोड

पाकिस्तानात जमावाकडून हिंदू मंदिराची तोडफोडपेशावर, १ जानेवारी – पाकिस्तानात खैबर पख्तुनख्वा प्रांतात बुधवारी मंदिराच्या विस्तार कार्याला विरोध करण्यासाठी आलेल्या जमावाने मंदिराच्या जुन्या ढाच्यासह नवे बांधकामदेखील जमीनदोस्त करण्यात आले. जिल्हा पोलिस प्रमुख इरफान मरवत यांनी याबाबत माहिती दिली. माहितीनुसार, संबंधित मंदिर करक जिल्ह्यात असून, देशभरातील हिंदू कुटुंब दर गुरुवारी याठिकाणी भेट देत असे. याच परिसरात एका धार्मिक हिंदू नेत्याची समाधी आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नसून मंदिरावरील हल्ला आणि तोडफोड दुर्दैवी असल्याचे खैबर पख्तुनख्वाचे...1 Jan 2021 / No Comment / Read More »

झोंग शानशन आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती!

झोंग शानशन आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती!मुकेश अंबानींंना मागे टाकले, मुंबई, ३१ डिसेंबर – रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आतापर्यंत आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांचे हे स्थान आता चीनच्या एका उद्योगपतीने घेतले आहे. पत्रकारिता, मशरूम शेती आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांत कारकीर्द घडविल्यानंतर बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात उतरलेले चीनमधील झोंग शानशन आता आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. झोंग शानशन हे चीनमधील बाटलीबंद पाण्याचा ब्रॅण्ड असलेल्या नांग्फू स्प्रिंग या कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी मुकेश...31 Dec 2020 / No Comment / Read More »

बलुच बंडखोरांचे लक्ष्य आता चिनी नागरिक

बलुच बंडखोरांचे लक्ष्य आता चिनी नागरिकपाकिस्तानची डोकेदुखी वाढणार, इस्लामाबाद, ३० डिसेंबर – पाकिस्तानी लष्कर आणि सरकारच्या दडपशाहीविरोधात लढणार्‍या बलुच बंडखोरांनी आता चिनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इम्रान खान सरकारची डोकेदुखी वाढली आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात मागील काही दिवसांत चिनी नागरिकांवर प्राणघातक हल्ले झाले. आतापर्यंत ग्वादर बंदरात सीपीईसी योजनेंंतर्गत तयार होत असलेल्या चिनी नाविक तळ आणि डीप सी पोर्टला विरोध करण्यासाठी बलुच बंडखोरांनी आता थेट चिनी नागरिकांनाच आपल्या हल्ल्याचे लक्ष्य...30 Dec 2020 / No Comment / Read More »

बांगलादेशकडून रोहिंग्यांची बेटांवर रवानगी

बांगलादेशकडून रोहिंग्यांची बेटांवर रवानगीढाका, ३० डिसेंबर – बांगलादेश नौदलाच्या पाच जहाजांमधून सुमारे १७०० रोहिंग्या मुस्लिमांचे एका बेटावर स्थलांतर करण्यात आले आहे. तीन तासांच्या समुद्री प्रवासानंतर रोहिंग्यांना बेटावर पोहोचविण्यात आले. तिथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. बांगलादेशात रोहिंग्यांसाठी असलेल्या छावण्यांमधून त्यांना बसने सोमवारी चितगाव येथे आणण्यात आले. कॉक्स बाझार येथूनही काही रोहिंग्या आले. मंगळवारी जहाजांमधून ते बेटाकडे रवाना झाले, असे सूत्रांनी सांगितले. स्थलांतरासाठी रोहिंग्यांवर कोणतीही जबरदस्ती करण्यात आलेली नाही. मानवी हक्क कार्यकर्त्यांनी रोहिंग्यांच्या...30 Dec 2020 / No Comment / Read More »

ओली सरकारने बोलाविले वरिष्ठ सभागृहाचे अधिवेशन

ओली सरकारने बोलाविले वरिष्ठ सभागृहाचे अधिवेशनकाठमांडू, २६ डिसेंबर – संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित केल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी वरिष्ठ सभागृहाचे हिवाळी अधिवेशन बोलावले आहे. तशी शिफारस त्यांनी राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांच्याकडे केली असून, १ जानेवारीपासून हे अधिवेशन बोलाविण्यात यावे, असे त्यांनी यात नमूद केले आहे. कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्यात आल्यानंतर नेपाळमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. ओली यांच्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षात फूट पडली असून, प्रचंड आणि ओली या दोघांनीही पक्षावर आपला...26 Dec 2020 / No Comment / Read More »

कंदहार विमान अपहरण: आरोपी अतिरेक्याची आज होणार सुटका

कंदहार विमान अपहरण: आरोपी अतिरेक्याची आज होणार सुटकाकराची, २५ डिसेंबर – इंडियन एअरलाईन्सच्या १९९९ मधील विमान अपहरणात सहभागी असलेला अल् कायदाचा अतिरेकी अहमद ओमर सईद शेख आणि त्याच्या तीन साथीदारांची तत्काळ सुटका करण्याचा आदेश सिंध उच्च न्यायालयाने दिला असून, त्यानुसार, या सर्वांची उद्या शनिवारी सुटका करण्यात येणार आहे. अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लच्या हत्येतही शेखचा सहभाग होता. अहमद उमर शेख, फहाद नसीम, सईद सलमान साकिब आणि शेख मोहम्मद आदिल अशी या अतिरेक्यांची नावे आहेत. पर्ल हत्याकांड प्रकरणाची सुनावणी...25 Dec 2020 / No Comment / Read More »

नेतान्याहू सरकार कोसळले

नेतान्याहू सरकार कोसळलेजेरूसलेम, २३ डिसेंबर – भ्रष्टाचारात अडकलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांचे सरकार मंगळवारी कोसळले. अर्थसंकल्प पारित करून घेण्याची नियोजित वेळ निघून गेल्याने नेतान्याहू सरकारला राजीनामा द्यावा लागला. देशात आता पुन्हा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. मागील दोन वर्षांत देशात चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणुका घेण्याची नामुष्की ओढवली असून, २३ मार्च रोजी देशात पुन्हा निवडणुका घेतल्या जाणार आहेत, असे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. नेतान्याहू यांच्या पक्षासोबत आघाडी करून सत्ता स्थापन करणारे ब्लू ऍण्ड...23 Dec 2020 / No Comment / Read More »

मोदींना भाऊ म्हणणार्‍या करिमा बलूचचा संशयास्पद मृत्यू

मोदींना भाऊ म्हणणार्‍या करिमा बलूचचा संशयास्पद मृत्यूइस्लामाबाद, २२ डिसेंबर – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील नागरिकांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात सातत्याने आवाज उठविणार्‍या महिला कार्यकर्त्या करिमा बलूच यांचा कॅनडात संशयास्पद मृत्यू झाला. रविवारपासून त्या बेपत्ता होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या भाऊ मानत होत्या. त्यांचा मृतदेह टोरंटोमध्ये आढळून आला. २०१६ मध्ये बलूच स्टुडंट ऑर्गानायझेशनच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी मोदी यांना भाऊ मानत एक भावूक चित्रफीत जारी केली होती. त्यांच्या हत्येमागे पाकिस्तानचा कट असल्याचा आरोप करण्यात येत आहे. करिमा बलूच...22 Dec 2020 / No Comment / Read More »

नेपाळमध्ये मध्यावधीची घोषणा; संसद विसर्जित

नेपाळमध्ये मध्यावधीची घोषणा; संसद विसर्जितसत्तेच्या पेचात विरोधकांना पंतप्रधान ओलींचा धक्का, काठमांडू, २० डिसेंबर – मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या पेचात पक्षांतर्गत विरोधाचा सामना करीत असलेले नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आज, रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत संसद विसर्जित करण्याचा आश्‍चर्यकारक निर्णय घेतला आणि काही वेळातच राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी त्यावर शिक्कामोर्तब करीत, देशात मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली. ओली यांनी आज सकाळी दहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि यात हा निर्णय घेत, विरोधकांना धक्का...20 Dec 2020 / No Comment / Read More »

इस्रायलमध्ये कोरोना लसीकरणास प्रारंभ

इस्रायलमध्ये कोरोना लसीकरणास प्रारंभतेल अविव, २० डिसेंबर – इस्रायलमध्ये शनिवारपासून कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली असून, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देशात पहिल्यांदा लस घेतली. यावेळी लसीकरण कार्यक्रमाचे थेट प्रसारणही करण्यात आले. अमेरिका, रशिया, ब्रिटनमध्ये यापूर्वीच लसीकरण सुरू झाले आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह आरोग्य मंत्री युली एडेलस्टीन यांना फायझर-बायो-एनटेकने विकसित केलेली लस टोचण्यात आली. देशवासियांमध्ये विश्‍वास निर्माण होण्यासाठी आपण स्वतःला पहिली लस टोचून घेतली. हा आनंदाचा क्षण असून, देशातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा...20 Dec 2020 / No Comment / Read More »

रशियाच्या मदतीने पाकिस्तानात होणार मोठा प्रकल्प

रशियाच्या मदतीने पाकिस्तानात होणार मोठा प्रकल्पइस्लामाबाद, १८ डिसेंबर – रशियाच्या सहकार्याने पाकिस्तान १,१०० किमी लांब गॅस पाईपलाईन निर्मिती प्रकल्प सुरू करणार असून, या संदर्भात नुकताच एक करार अस्तित्वात आला आहे. रशियन कंपनी कराचीमधील कासिम बंदरापासून पंजाबच्या कसूरपर्यंत नैसर्गिक वायूसाठी पाईपलाईन तयार करणार आहे. यावर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित प्रकल्पात पाकिस्तानचे ७४ टक्क्यांपर्यंत भागभांडवल असेल तर उर्वरित भाग रशियाचा असेल. पाकिस्तानची गॅस वितरण कंपनी सुई सदर्न गॅस कॉर्पोरेशन आणि सुई नॉर्दर्न गॅस पाइपलाईन लिमिटेडने...18 Dec 2020 / No Comment / Read More »

‘स्पुटनिक व्ही’ लस १०० टक्के प्रभावी

‘स्पुटनिक व्ही’ लस १०० टक्के प्रभावीमॉस्को, १५ डिसेंबर – रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ लस कोरोना बाधितांवर १०० टक्के प्रभावी ठरणार असल्याचे चाचणीत आढळून आले आहे. स्पुटनिक व्ही लसीच्या चाचणीचे परिणाम, निष्कर्ष जाहीर करण्यात आले. ही लस विकसित करणार्‍या गोमालिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडीमियॉलजी ऍण्ड मायक्रोबायलॉजीने केलेल्या दाव्यानुसार कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर ही लस १०० टक्के प्रभावी ठरली आहे. कोरोनाच्या विरुद्ध ही लस ९१.५ टक्के प्रभावी आहे. लस चाचणी डेटातून उपलब्ध माहितीच्या विश्‍लेषणातून हा निष्कर्ष...16 Dec 2020 / No Comment / Read More »