Posted by वृत्तभारती
Monday, February 6th, 2023
नांदेड, (५ फेब्रुवारी ) – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव रविवारी नांदेडच्या हिंगोली गेट परिसरातील मैदानावर आपल्या पहिल्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री केसीआर यांनी आपल्या पक्षाचा देशभरात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीतच नांदेडमध्ये बैठक होणार होती. परंतु, शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे सभा तहकूब करावी लागली. त्यानंतर ५ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. या सभेच्या तयारीसाठी तेलंगणाचे मंत्री, खासदार आणि आमदार पंधरा दिवसांपासून तळ ठोकून आहेत. हिंगोली गेटच्या...
6 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 27th, 2021
दहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले, चेन्नई/तेलंगणा, २७ नोव्हेंबर – दक्षिण भारतातील संततधार पावसामुळे, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला तडाखा बसला असून, पावसाशी संबंधित घटनांमध्ये ५० लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी बारा जिल्ह्यांतील निवारा केंद्रात हलवण्यात आले असून, चेन्नईतील ६५० लोकांना पाच निवारा केंद्रांत हलवण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली...
27 Nov 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 22nd, 2021
हैद्राबाद, २१ नोव्हेंबर – आंध्रप्रदेशमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या वेगवेगळ्या घटनांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून २८ झाली आहे. यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या सदस्याचाही समावेश आहे. राज्यात १७ जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. भारतीय वायुदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलिस आणि अग्निशमन सेवा कर्मचार्यांनी अनंतपुरमू, कडप्पा आणि चित्तोर जिल्ह्यातील एका पोलिस निरीक्षकासह किमान ६४ जणांची पुरातून सुटका केली. कडप्पा आणि अनंतपुरमू जिल्ह्यात शुक्रवारपासून होत असलेल्या मुसळधार...
22 Nov 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 20th, 2021
चंद्राबाबूंची अनोखी प्रतिज्ञा, अमरावती, १९ नोव्हेंबर – तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी, सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसच्या सदस्यांद्वारे झालेल्या अपमानाच्या निषेधार्थ, आपण उर्वरित कालावधीसाठी विधानसभेत प्रवेश करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. मी मुख्यमंत्री झाल्यावरच सभागृहात पाय ठेवेल, असे नायडू यांनी जाहीर केले. विधानसभेतून बाहेर पडण्यापूर्वी नायडू खूपच भावुक दिसत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी महिला सबलीकरणावरील चर्चेत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध...
20 Nov 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 20th, 2021
हैद्राबाद, १९ नोव्हेंबर – श्री बालाजी देवस्थानसाठी जगप्रसिद्ध असलेल्या तिरुमला येथे मुसळधार पावसाने वाहतूक ठप्प झाली असून व्यंकटेश्वराच्या प्राचीन मंदिरापर्यंत मुख्य मार्गावर पाणी आले आहे. हजारो भाविक तिरुपती, तिरुमला येथे अडकले असून, विमानसेवाही विस्कळित झाली. गुरुवार दुपारपासून पडणार्या पावसाने घाटात पाणी आल्याने घाटरस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच पायी मार्गही बंद केला आहे. चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती येथे पावसाने हाहाकार माजवला आहे. शहरात अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिरुपती आणि...
20 Nov 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, October 13th, 2021
तब्बल साडेचार कोटींच्या नोटांची सजावट, हैदराबाद, १२ ऑक्टोबर – नवरात्रीच्या निमित्ताने देशभरात देवीच्या मंदिरांना अनेक प्रकारे आकर्षक पद्धतीने सजवले जात आहे. त्यात विविध फुलांचा किंवा इतर गोष्टींचा वापर केला जातो. तेलंगणाच्या मेहबूबनगरमध्ये कन्यका परमेश्वरी देवीची नवरात्री निमित्ताने भक्तांनी अर्पण केलेल्या दानाने सजावट करण्यात आली आहे. वर्षभरात देवीला भक्तांनी अर्पण केलेल्या रुपयांच्या नोटांनी हे मंदिर सजवण्यात आले आहे. एकूण ४ कोटी ४४ लाख ४४ हजार ४४ रुपयांच्या नोटांनी देवीचे मंदिर सजवण्यात...
13 Oct 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, October 11th, 2021
आयकर अधिकारीही चक्रावले, हैदराबाद, ११ ऑक्टोबर – आयकर विभागाने हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपवर छापेमारी केली. या छापेमारीत आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्युटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकार्यांना एका आलमारीत तब्बल १४२ कोटी रुपये सापडले आहेत. ही कंपनी आपल्या अधिकाधिक उत्पादनांची निर्यात विदेशात करते. त्यात अमेरिका, युरोप, दुबई आणि अन्य आफ्रिकी देशांचा समावेश आहे. आयकर विभागाने सहा राज्यातील जवळपास ५० ठिकाणी तपासणी मोहीम राबवली आहे. आयकर विभागाच्या छाप्यावेळी खात्यांची पुस्तके आणि...
11 Oct 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, September 27th, 2021
हैदराबाद, २७ सप्टेंबर – इस्लामिक कट्टरतावाद दर्शवण्यासाठी एका हातात शस्त्र आणि दुसर्या हातात ‘कुराण’ असलेल्या एका दहशतवाद्याचे छायाचित्र पाठ्यपुस्तकात वापरण्यात आल्याचे समोर आल्यानंतर तेलंगणात एकच गदारोळ उठला. इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र (इंग्रजी माध्यम) विषयाच्या पुस्तकातील ‘प्रश्न बँके’त या छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे. मात्र, ही बाब समोर आल्यानंतर तत्काळ हा मजकूर हटवण्याचे आदेश तेलंगणा सरकारने दिले आहेत. इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात ‘इस्लामिक कट्टरतावाद’ दर्शवण्यासाठी वापरण्यात आलेले हे छायाचित्र तत्काळ हटवण्याची मागणी स्टुडंटस्...
27 Sep 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 7th, 2020
नवी दिल्ली, ७ डिसेंबर – प्रख्यात तेलुगू अभिनेत्री विजयाशांती यांनी आज सोमवारी भाजपात प्रवेश केला. १९९० च्या दशकात त्यांनी आपली राजकीय कारकीर्द भाजपातूनच सुरू केली होती. यानंतर त्या इतर काही राजकीय पक्षांतही सामील झाल्या होत्या. तेलंगणातील नागरिकांचे हित केवळ भाजपाच जोपासू शकते, यावर माझा विश्वास आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी, आज सकाळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. भाजपाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पक्षाचे सरचिटणीस अरुणसिंह, केंद्रीय...
7 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 5th, 2020
हैदराबाद, ४ डिसेंबर – हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत, ४९ जागांवर विजय मिळविला आहे. आतापर्यंत सत्ता असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीला (टीआरएस) ५८ आणि मोठ्या विजयाचा दावा करणार्या एमआयएमला ४३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकूणच या महापालिकेचे निकाल त्रिशंकू लागले आहेत. मागील निवडणुकीत केवळ चार जागांवर असलेल्या भाजपाला या निवडणुकीत विजयी करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथसिंह...
5 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 3rd, 2020
हैदराबाद, ३ डिसेंबर – महिला उमेदवारांना शारीरिक मर्यादा असते, असे कारण देत त्यांना ‘लाईनवुमन’ चे पद नाकारणार्या वीज कंपन्यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने आज गुरुवारी चांगलेच हासडले. जिथे महिलांसाठी लष्कराची दारे उघडी झाली आहेत, तिथे त्या लाईनवुमेन का होऊ शकत नाहीत, या पदासाठी आलेल्या महिला उमेदवारांची तातडीने चाचणी घेण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. महिलांना लाईनवुमनचे काम नाकारणार्या वीज कंपन्यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणी करताना, न्या....
3 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 30th, 2020
असदुद्दीन ओवैसी यांनी ओकली गरळ, हैदराबाद, ३० नोव्हेंबर – ज्यांना हैदराबादचे नाव बदलायचे आहे त्यांच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील. एकवेळ तुमचे नाव बदलेल पण तरीही हैदराबादचे नाव बदलणार नाही, अशी गरळ एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ओकली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव ‘भाग्यनगर’ करू असे म्हटल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांचा चांगलाच थयथयाट झाला आहे. त्यांचा तोल आणि ताल योगींनी पार बिघडवून टाकला असून त्यामुळे ओवैसी वाटेल तशी...
30 Nov 2020 / No Comment / Read More »