|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 30.33° से.

कमाल तापमान : 30.99° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 55 %

वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

30.99° से.

हवामानाचा अंदाज

27.43°से. - 30.99°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.54°से. - 30.53°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.6°से. - 29.96°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.44°से. - 30.51°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.94°से. - 29.99°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.27°से. - 30.16°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

मादकपदार्थ नियंत्रण विभागाकडून शाहरुखच्या मुलाला अटक

मादकपदार्थ नियंत्रण विभागाकडून शाहरुखच्या मुलाला अटकतिघांसह कोठडीत रवानगी, एनसीबीची कारवाई, क्रूझवरील रेव्ह पार्टीत होती धनिकबाळे, मुंबई, ३ ऑक्टोबर – मुंबईतील अमलीपदार्थांची प्रकरणे काही कमी होण्याचे नाव घेत नाही. मादकपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात् एनसीबीने शनिवारी रात्री उशिरा एका क्रूझवर सुरू असलेल्या रेेव्ह पार्टीवर छापा मारून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह सहा जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर १० तास झालेल्या चौकशीनंतर आर्यनसह तीन जणांना अटक करण्यात आली. उर्वरित तीन जणही सध्या एनसीबीच्या ताब्यात आहेत. दरम्यान, रविवारीही सुरू राहणार्‍या...3 Oct 2021 / No Comment / Read More »

मानहानी प्रकरणात कंगनाला दिलासा नाहीच

मानहानी प्रकरणात कंगनाला दिलासा नाहीचजावेद अख्तर यांच्या विरोधातील याचिका फेटाळली, मुंबई, ९ सप्टेंबर – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत विरोधात सुरू असलेल्या मानहानी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून कंगनाला कोणताही दिलासा मिळालेला नाही. कंगनाने जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे कंगनाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. गीतकार जावेज अख्तर यांनी कंगना विरोधात उच्च न्यायालयामध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कंगनाने दाखल केली होती....9 Sep 2021 / No Comment / Read More »

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराने निधन

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराने निधन‘बिग बॉस’ विजेत्याची अकाली एक्झिट, मुंबई, २ सप्टेंबर – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अतिशय धक्कादायक एक्झिट घेतलेल्या सिद्धार्थच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी मुंबईतील कुपर रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. झोपेतच हृदय विकाराच्या...2 Sep 2021 / No Comment / Read More »

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपलेलोकल सेवा विस्कळीत, विक्रोळीत रस्त्यांना नदीचे स्वरूप, मुंबई, १९ जुलै – राज्याच्या राजधानीला रविवारी पावसाचा जबरदस्त तडाखा बसल्यानंतर आज सोमवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने पुन्हा झोडपून काढले. उल्हासनगर येथे ४०० मि.मी. इतका पाऊस पडला. भारतीय हवामान खात्याने मुंबईत पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. उपनगरे आणि अन्य ठिकाणी अतिमध्यम ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचवेळी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य मार्गावर...20 Jul 2021 / No Comment / Read More »

मुंबईत पावसाचे २९ बळी

मुंबईत पावसाचे २९ बळीअनेक घरांवर भिंती व दरडी कोसळल्या, सर्वत्र हाहाकार, चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये पाऊस ठरला काळ, मुंबई, १८ जुलै – मुंबई आणि आसपासच्या परिसरात शनिवारी रात्रभर मुसळधार पावसाने थैमान घातले. चेंबूर, विक्रोळी आणि भांडुपमध्ये पावसामुळे दरड पडल्याने घरे कोसळली. यात २९ जणांचा मृत्यू झाला. चेंबूरमध्ये २१ जणांचा, विक्रोळीत झोपडपट्टीवर दरड कोसळून सात जणांचा आणि भांडुपमध्ये भिंत कोसळून १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. चेंबूरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही...18 Jul 2021 / No Comment / Read More »

विदेशातून आलिशान गाड्यांची तस्करी

विदेशातून आलिशान गाड्यांची तस्करीमुंबई, १७ जुलै – विदेशातून भारतात आलिशान गाड्यांची तस्करी करणार्‍या टोळीचा पहिल्यांदाच पर्दाफाश करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात प्रतिबंधक अमलीपदार्थ वा मानवी तस्करी अनेकदा उघडकीस आली आहे, पण मागील पाच वर्षांत विदेशातून तब्बल २० आलिशान गाड्यांची भारतात तस्करी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकारणातील लोकांशी असलेले संबंध वापरून आरोपी अशा गाड्यांची भारतात...17 Jul 2021 / No Comment / Read More »

आमिर खान याचा दुसरा ‘तलाक’

आमिर खान याचा दुसरा ‘तलाक’मुंबई, ३ जुलै – बॉलीवूड क्षेत्रातील ख्यातनाम जोडी आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपल्या १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून, त्यामुळे चाहत्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. या दोघांनी अनेक चित्रपटांच्या प्रकल्पांवर आणि पाणी फाऊंडेशन तसेच इतरही अनेक प्रकल्पांवर एकत्रित काम केले आहे. आम्ही दोघे विभक्त होत असलो तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही...3 Jul 2021 / No Comment / Read More »

मुंबईत इमारत दुर्घटनेत ११ ठार; १७ जण गंभीर

मुंबईत इमारत दुर्घटनेत ११ ठार; १७ जण गंभीरसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, मुंबई, १० जून – मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमधील मालवणी परिसरात असलेल्या न्यू कलेक्टर कंपाउंडमधील एका तीन मजली चाळीचा काही भाग बुधवारी रात्री उशिरा कोसळला. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत तीव्र शोक व्यक्त केला. इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी...10 Jun 2021 / No Comment / Read More »

पहिल्याच पावसात मुंबई तुंबली

पहिल्याच पावसात मुंबई तुंबलीठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ, तीन तासांत झाला विक्रमी पाऊस, मुंबई, ९ जून – मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले. अवघ्या तीन तासांमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंबई पूणर्पर्ण तुंबली होती. सांताक्रूझमध्ये १६४.८ मिमी आणि कुलाबामध्ये ३२.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. यामुळे मुंबईची जीवनवाहिनी हार्बर लोकल ठप्प झाली होती. नोकरी आणि अन्य कामांसाठी बाहेर निघालेल्या लोकांची घराकडे...9 Jun 2021 / No Comment / Read More »

ड्रीम मॉलमधील आगीत १० जणांचा मृत्यू

ड्रीम मॉलमधील आगीत १० जणांचा मृत्यू७० कोरोनाबाधितांना सुरक्षित बाहेर काढले, मुंबई, २६ मार्च – मुंबईच्या भांडूप परिसरातील ड्रीम मॉलच्या इमारतीत असलेल्या सनराईस रुग्णालयाला गुरुवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण आगीत दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, ७० बाधितांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या मॉलमध्ये सुमारे ६०० दुकाने आहेत. मुंबई महापालिकेने आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, या आगीत केवळ कोरोनाबाधितांचाच मृत्यू झाला की मॉलमध्ये काम करणार्‍या इतरांचाही त्यात समावेश आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ...26 Mar 2021 / No Comment / Read More »

सचिन वाझे यांना नाकारला अंतरिम जामीन

सचिन वाझे यांना नाकारला अंतरिम जामीनमुंबई, १३ मार्च – मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणी संभाव्य अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेणारे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अंतरिम जामीन देण्यास सत्र न्यायालयाने आज शनिवारी नकार दिला. हिरेन मृत्युप्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक आहे. यासाठी प्रसंगी तुम्हाला कोठडीत घ्यावे लागणार आहे. आमच्याकडे जे पुरावे आहेत, ते पाहू जाता, तुम्हाला दिलासा देता येणार नाही, असे निरीक्षण न्या. शैलेंद्र तांबे यांनी आपला निकाल देताना नोंदविले. वाझे यांनी शुक्रवारी सायंकाळी अटक टाळण्यासाठी न्यायालयात...13 Mar 2021 / No Comment / Read More »

सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली

सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदलीविरोधकांच्या दबावानंतर निर्णय, मुंबई, १२ मार्च – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादात सापडलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली आहे. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत सापडलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्यात आली होती. यासंदर्भात पोलिस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले होते. मात्र, आता पुन्हा त्यांची एसबी-१ म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली...13 Mar 2021 / No Comment / Read More »