Home » छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » आषाढी वारीला उत्साहात प्रारंभ

आषाढी वारीला उत्साहात प्रारंभ

=पालखी पंढरपूरकडे रवाना, वरुण राजाचीही उपस्थिती=
Dnyaneshwar-Palakhi wariपुणे, [८ जुलै] – पंढरीनाथासह सर्व संतांचा जयघोष करीत, ‘जयजय रामकृष्ण हरी’च्या गजरासह हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत आषाढी वारीला आज बुधवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. संत तुकाराम महाराजांची पालखी बुधवारी देहू येथून अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरकडे रवाना झाली. यावेळी वरुणराजानेही उपस्थिती दर्शवून शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित केल्या. पालखी सोहळ्याचे हे यंदाचे ३३० वे वर्ष आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे खोळंबली. तरीदेखील तुकोबांच्या प्रेमापोटी हजारो वारकरी देहूत दाखल झाले. बुधवारी सकाळी काकड आरती, महापूजा आदी विधी पार पाडले. दुपारी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पावसाच्या आगमनाने वारकरी अधिकच उत्साहित झाले होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीने दुपारी साडेतीनच्या सुमारास देहू येथील इनामदार वाड्यातून प्रस्थान केले. यावेळी हजारो भाविकांनी ‘विठ्ठल-वठ्ठल, जयहरी विठ्ठल’ असा गजर केला.
तुकोबांच्या पालखीसोबतच भागवतधर्माची पताका उंच फडकविणार्‍या व वारकर्‍यांना भक्तिरसात ओलेचिंब करणार्‍या संत एकनाथ महाराजांची पालखीही पैठणहून पंढरीकडे रवाना झाली. या दोन्ही पालख्या निघाल्या तेव्हा आनंद, उत्साह व भक्तीची एक लाटच निर्माण झाली व वारकर्‍यांनी विठ्ठलनामाचा जयघोष करून परिसर दुमदुमून टाकला.
तत्पूर्वी, दुपारी बाराच्या सुमारास एकनाथ महाराजांच्या पालखीने प्रस्थान केले होते. या दोन्ही पालख्या रवाना होण्यापूर्वी इंद्रायणी नदीच्या तीरावर जमलेले वारकरी तुकोबांच्या जयघोषात तल्लीन झाले होते. टाळ, मृदंगाचा निनाद सर्वत्र होत होता. संत तुकारामांच्या पालखीमागे सुमारे ३३० दिंड्याही रवाना झाल्या.
संत तुकारामांची पालखी गुरुवारी आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. शुक्रवारी पुण्यात पालखीचे आगमन होईल. पुढील दोन दिवस पुण्यात पालखीचा मुक्काम इनामदार वाड्यात राहणार आहे. यावेळी गिरिजा बापट, आमदार श्रीरंग भरणे, उल्हास पवार, हर्षवर्धन पाटील आणि बबनराव पाचपुते उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23348

Posted by on Jul 9 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (1574 of 2476 articles)


अस्तना, [८ जुलै] - भारत व कझाकिस्तान यांच्या दरम्यान पाच महत्त्वपूर्ण करारांवर आज बुधवारी स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. संरक्षण सहकार्य आणि ...

×