richwood
richwood
richwood
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » चीनमध्ये दरड कोसळून गॅस लाईनचा स्फोट

चीनमध्ये दरड कोसळून गॅस लाईनचा स्फोट

=३३ इमारती जमीनदोस्त=
china-shenzhen-landslideबीजिंग, [२१ डिसेंबर] – चीनच्या शेंझेन शहरातील एका औद्योगिक वसाहतीत दरड कोसळून ‘माळीण’ घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या दुर्घटनेत दरड कोसळल्यानंतर गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला. या स्फोटात ३३ इमारती जमीनदोस्त झाल्या असून आतापर्यंत ९१ जण बेपत्ता झाले आहेत. तर मोठ्या जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेनझेनच्या लियुक्सी नावाच्या इंडस्ट्रियल पार्कमध्ये रविवारी सकाळी दरड कोसळून अनेक मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्यात. त्यानंतर गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज सुमारे ४ किलोमीटर लांब ऐकू आला. या पार्कमधील तब्बल १ लाख चौरस मीटर जागा ढिगार्‍याखाली गेल्याची माहिती शेंझेनमधील प्रशासनानं दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलिस आणि डॉक्टरांसह १५०० जणांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या दुर्घटनेत ३३ इमारती मातीखाली गेल्या असून अनेक जण बेपत्ता असून मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळपर्यंत ९०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मातीखाली अडकलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
२०१४ मध्ये पुणे जिल्हयातील भीमाशंकरजवळ असलेल्या माळीण गावावर असाच ‘काळकडा’ कोसळला होता. यात अख्खं गाव दरडीखाली गाडलं गेलं होतं. रविवारी चीनमध्येही अशीच दुर्घटना घडली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26262

Posted by on 4:05 pm. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google