Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » व्हिएतनामला ५० कोटी डॉलर्सचे कर्ज

व्हिएतनामला ५० कोटी डॉलर्सचे कर्ज

=पंतप्रधान मोदींची घोषणा, १२ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी=
MODI IN VIETNAMहनोई, [३ सप्टेंबर] – भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध आणखी दृढ करण्यासाठी त्या देशाला ५० कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत आणि व्हिएतनाम यांच्यात संरक्षण, आयटी, अंतराळ आणि दुहेरी करप्रणाली यासह १२ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. या करारांमुळे द्विपक्षीय धोरणात्मक सहकार्याचे संबंध आणखी मजबूत होणार आहेत.
पंतप्रधान मोदी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान गुयेन शौन फुक यांच्या उपस्थितीत संबंधित क्षेत्रातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी या करारांवर स्वाक्षरी केली. व्हिएतनामशी द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याचे ध्येय आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमावर असून, दोन्ही देशांमधील भागीदारीचा फायदा आशियासह जगालाही मिळणार आहे, असे मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. गेल्या १५ वर्षांत व्हिएतनामला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.
भव्य स्वागत
तत्पूर्वी, व्हिएतनामची राजधानी हनोई येथे पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राध्यक्षांच्या प्रासादासमोर भव्य स्वागत करण्यात आले. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष ट्रान दाई क्वॉंट यांनी स्वत: मोदींचे स्वागत केले.
पागोडा मंदिराला भेट
या भेटीत मोदी यांनी येथील ऐतिहासिक पागोडा मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी हो ची मिन्ह यांचे वास्तव्य असलेल्या स्टिल्ट हाऊसलाही भेट दिली. व्हिएतनामच्या पंतप्रधानांसह त्यांनी माशांना अन्नही खाऊ घातले. यानंतर पागोडा मंदिरात बौद्ध भिक्खूंना संबोधित करताना, अहिंसा, शांतता आणि सलोखा ही शिकवण व्हिएतनामकडूनच जगाला मिळाली असल्याचे प्रतिपादन मोदींनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29263

Posted by on Sep 4 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (106 of 2483 articles)


=नरेंद्र मोदी, ओबामा उपस्थित राहणार= हांगझोऊ, [३ सप्टेंबर] - चीनच्या निसर्गरम्य हांगझोऊ शहरात उद्या रविवारपासून जी-२० राष्ट्रसमूहाच्या दोन दिवसीय शिखर ...

×