Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » ‘होय, पाकिस्तान नापाकच!’

‘होय, पाकिस्तान नापाकच!’

-• संरक्षण मंत्र्यांची प्रथमच जाहीर कबुली
•- तोयबा, जैशसारख्या दहशतवादी पाकमध्येच,
इस्लामाबाद, ७ सप्टेंबर –
होय, आमचीच जमीन नापाक आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटना आमच्याच देशात सक्रिय आहेत, अशी जाहीर कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी आज गुरुवारी प्रथमच दिली.
आमच्या देशात अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत आणि भारतासह अन्य देशांविरोधातील त्यांच्या कारवाया येथूनच चालतात. या संघटनांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या संघटनांच्या हालचालींवर निर्बंध आणणे आवश्यक आहे, जेणेकरून आमच्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आहे, हे जगाला दाखवता येईल, असे ख्वाजा मोहम्मद यांनी जिओ वाहिनीशी बोलताना सांगितले.
ब्रिक्स परिषदेतील घोषणापत्रात दहशतवादी संघटनांचा उल्लेख करताना या संघटना प्रादेशिक सुरक्षेसाठी धोकादायक असल्यावर ब्रिक्समध्ये एकमत झाले होते. याच अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर त्यांनी ही जाहीर कबुली दिली.
दहशतवादाच्या मुद्यावरून मित्र देशांची वारंवार परीक्षा घेणे पाकिस्तानला परडणारे नाही. चीनसारख्या मित्र देशाच्या संयमाची आम्ही आणखी परीक्षा घेऊ शकत नाही. कारण आता आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन बदलत चालला आहे, असेही त्यांनी सांगितले.
या आधी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी ब्रिक्स परिषदेतील जाहीरनामा नाकारत पाकच्या भूमीत दहशतवाद्यांना आश्रय देण्यात आला नसल्याचा दावा केला होता. आम्ही स्वत:च दहशतवादाने पीडित असल्याचे त्यांनी सांगितले होते.
आज पत्रकारांशी बोलताना ख्वाजा मोहम्मद आसिफ म्हणाले की, मला कोणतेही राजकीय वक्तव्य करायचे नाही. पण देशातील दहशतवादी संघटनांच्या कारवायांकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. दुर्लक्ष केले तर आम्हाला नेहमीच अशा लज्जास्पद स्थितीला सामोरे जावे लागेल आणि पाकला भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील.
पाकने अफगाणिस्तानातही अनेक गंभीर चुका केल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. अफगाणमधील छुप्या युद्धात सहभागी होण्याची पाकला काहीच गरज नव्हती. ९/११ च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही चुकीचा निर्णय घेतला आणि युद्ध ओढवून घेतले, ज्याचा आपल्याशी काही संबंध नव्हता. युद्धामुळे आम्ही विनाकारण अनेकांच्या मृत्युला कारणीभूत ठरलो, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Short URL: http://vrittabharati.in/?p=34910

Posted by on Sep 8 2017. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (26 of 2480 articles)


=खात्याशी जोडणी गरजेची, नवी दिल्ली, ६ सप्टेंबर - देशातील बँकांनी ३० सप्टेंबरपर्यंत १० टक्केशाखांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, अन्यथा ...

×