Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अकबर रोडला महाराणा प्रताप यांचे नाव द्या !

अकबर रोडला महाराणा प्रताप यांचे नाव द्या !

vk-singh3नवी दिल्ली, [१८ मे] – काही महिन्यापूर्वीच दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील औरंगजेब रोडला दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं. या पार्श्‍वभूमीवर आता दिल्लीतील प्रसिद्ध अकबर रोडला महाराणा प्रताप सिंह यांचं नाव देण्याची मागणी परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंह यांनी केली आहे.
महाराणा प्रताप यांनी मुघल बादशहा अकबरला रोखण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. एक सच्चा धर्मनिरपेक्ष आणि रयतेचा राजा अशी त्यांची ओळख होती. तसेच त्यांच्या सैन्यात पठाण, भील्ल आणि आदिवासी अशा समाजातील विविध घटकांना स्थान होतं. व्ही. के. सिंह यांनी नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यात नमूद केलं आहे की, महाराणा प्रताप याचं व्यक्तिमत्व अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे अकबर रोडचं ‘महाराणा प्रताप मार्ग’ असं झाल्यास तो त्यांचा सन्मान ठरेल.
विशेष म्हणजे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्‌टर यांनी व्ही. के. सिंह यांनी अकबर रोडचं महाराणा प्रताप मार्ग असं नामकरण करण्यासाठी पाठपुरावा करावा. असे आवाहन केलं होतं. त्यानंतर सिंह यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच यापूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनीही ही मागणी केली होती. दुर्देवाने महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा योग्य तो सन्मान आतापर्यंत होऊ शकलेला नाही. अशी खंतही सिंह यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.
दरम्यान, दिल्लीत सुमारे ३३ रस्त्यांना मुघल शासनकर्त्यांची नावे असल्याकडेही स्वामी यांनी लक्ष वेधलं होतं.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28312

Posted by on May 18 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (322 of 2450 articles)


=मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना साकडे= नवी दिल्ली, [१८ मे] - दोन वर्ष ‘नीट’ लागू करू नये, सीईटीच राहू द्यावी, असे साकडे मुख्यमंत्री ...

×