Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » आसामात फुलणार कमळ

आसामात फुलणार कमळ

=ममता गड राखणार, जयललितांना धक्का, केरळ कॉंगे्रसमुक्त, एक्झिट पोल्सचे निष्कर्ष=
BJP-FLAG-RALLY-IN-UP-1नवी दिल्ली, [१६ मे] – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आज सोमवारी पूर्ण होताच विविध टीव्ही वाहिन्यांनी जनमत चाचण्यांचे निकालही जाहीर केले. त्यानुसार आसामात भाजपाप्रणीत आघाडी ८१ जागांसह स्पष्ट बहुमताने सत्तेवर येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी गड राखणार असल्याचे भाकीत करण्यात आले. तामिळनाडूत बहुतांश वाहिन्यांनी जयललिता यांच्या हातून सत्ता जाणार असल्याचे भाकीत केले आहे. केरळात मात्र कॉंगे्रसप्रणीत युडीएफची सत्ता जाणार असून, माकपप्रणीत एलडीएफ सत्तेवर येत असल्याचे चित्र आहे. पुद्दुचेरीत कॉंगे्रस सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
एबीपी न्यूज-नील्सन संस्थेच्या मते, १२६ सदस्यीय आसाम विधानसभेत भाजपा-आगप-बीपीएफ आघाडीला ८१ जागा मिळणार आहे. तर, कॉंगे्रसला ३३, एआययुडीएफला १० आणि इतरांना दोन जागा मिळणार आहेत. हा अंदाज खरा ठरल्यास आसामात भाजपा प्रथमच सरकार स्थापन करणार आहे. या संस्थेने एकूण ६३ मतदारसंघातील १४,२७१ मतदारांचे मत जाणून घेतले.
एबीपी न्यूज-नील्सनने पश्‍चिम बंगालची सत्ता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंगे्रसकडे सोपविताना १६३ जागा दिल्या आहेत. कॉंगे्रस व डाव्या आघाडीला १२६, भाजपाला १ व इतरांना ४ जागा दिल्या आहेत. प. बंगालबाबत अंदाज वर्तविताना या संस्थेने २९४ पैकी १४७ मतदारसंघातील ३४,५२६ मतदारांचे मत विचारात घेतले.
सी-व्होटरचा अंदाज
सी-व्होटरनेही आसामात भाजपाला ५७ ते ६० दिल्या आहेत. कॉंगे्रसला ४१, एआययुडीएफला १८ आणि इतरांना १० जागा दिल्या आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंगे्रसला १६७, कॉंगे्रस-डाव्या आघाडीला १२०, भाजपाला ४ आणि इतरांना ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये एलडीएफला ७८, युडीएफला ५८, भाजपाला २ आणि इतरांना २ जागा देण्यात आल्या आहेत. पुद्दुचेरीत १४ जागा जिंकून कॉंगे्रस सर्वांत मोठा पक्ष ठरणार आहे. एआयएनआरसीला ९, अण्णाद्रमुकला ५ आणि इतरांना २ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
इंडिया टुडेचा अंदाज
इंडिया टुडेच्या अंदाजानुसार, आसाममध्ये भाजपाप्रणीत आघाडी ७९ ते ९३ जागांसह स्पष्ट बहुमताने सत्तेवर येणार आहे. कॉंगे्रसला २६ ते ३३, युडीएफला ६ ते १० जागा आणि इतरांना १ ते ४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पश्‍चिम बंगालमध्ये या संस्थेने ममतांच्या तृणमूल कॉंगे्रसला घवघवीत २३३ ते २५३ जागा दिल्या. कॉंगे्रस-डाव्या आघाडीला ३८ ते ५१, भाजपाला ५ आणि इतरांना २ ते ५ जागा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. केरळात एलडीएफला ८८ ते १०१, युडीएफला ३८ ते ४८, भाजपा आघाडीला ३ आणि इतरांना ४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. या संस्थेने मात्र तामिळनाडूची सत्ता एम. करुणानिधी यांच्या द्रमुककडे सोपविली आहे. त्यांच्या मते, २३२ सदस्यीय विधानसभेत द्रमुकला १२४ ते १४० जागा, जयललितांच्या अण्णाद्रमुकला ८९ ते १०१ जागा, भाजपाला ३ आणि इतरांना ४ ते ८ जागा मिळणार आहेत.
टुडेज चाणक्यचे भाकीत
टुडेज चाणक्यनेही आसामात भाजपाला ९०, कॉंगे्रसला २७, एआययुडीएफला ९ व इतरांना ३ जागा दिल्या आहेत. तर, पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूलला २१०, डाव्या आघाडीला ३८ ते ५२, भाजपाला १ ते ५ आणि इतरांना २ ते ५ जागा दिल्या आहेत. दरम्यान, न्यूज नेशननेही तामिळनाडूत जयललितांच्या हातून सत्ता जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या संस्थेच्या मते, अण्णाद्रमुकला ९५ ते ९९, द्रमुकला ११४ ते ११८, भाजपाला ४ आणि इतरांना ९ जागा मिळण्याचे भाकीत केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28287

Posted by on May 16 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (336 of 2453 articles)


=अरुण जेटली यांची स्पष्ट भूमिका= नवी दिल्ली, [१६ मे] - प्रशासकीय व्यवस्थेत अर्थात सरकारच्या कामकाजात न्यायपालिकेच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय ...

×