Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » कॉंग्रेसच्या ३३ सदस्यांवर कारवाई का नाही?

कॉंग्रेसच्या ३३ सदस्यांवर कारवाई का नाही?

=तृणमूल कॉंग्रेसचा सवाल, राज्यसभेतून बहिर्गमन=

New Delhi: Opposition members protest in the Rajya Sabha in New Delhi on Tuesday. PTI Photo / TV GRAB  (PTI12_22_2015_000269A)

New Delhi: Opposition members protest in the Rajya Sabha in New Delhi on Tuesday. PTI Photo / TV GRAB (PTI12_22_2015_000269A)

नवी दिल्ली, [३ मे] – राज्यसभेत सोमवारी गदारोळ झाला त्यावेळी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करणार्‍या कॉंग्रेसच्या ३३ सदस्यांवर कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल तृणमूल कॉंग्रेस पक्षाने मंगळवारी उपस्थित केला.
सोमवारी राज्यसभेत ऑगस्टा वेस्टलॅण्डचा मुद्दा उपस्थित करणारे तृणमूल सदस्य सुखेंदू रॉय यांच्यावर कारवाई करताना हमीद अन्सारी यांनी त्यांना एक दिवसासाठी निलंबित केले होते. परंतु, फक्त आपल्याच सदस्यावर कारवाई झाल्याचा निषेध म्हणून तृणमूलच्या सदस्यांनी मंगळवारी सभात्याग केला.
सकाळी कामकाजाला प्रारंभ होताच तृणमूलच्या डेरेक ओब्रायन यांनी हा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी नियम २५५ नुसार रॉय यांच्यावर कारवाई केली. परंतु, राज्यसभेच्या बुलेटिनमध्ये नमूद केल्याप्रमाणणे रॉय यांनी कधीही आपले आसन सोडले नाही आणि जागेवरूनच मुद्दा उपस्थित केला, असे सांगून कॉंग्रेसच्या ३३ सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करताना नियबाह्य वर्तन केल्याचे बुलेटिनमध्ये नमूद असल्याकडे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांचे लक्ष वेधले आणि कॉंग्रेस सदस्यांवर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला.
हा निर्णय अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी घेतला असल्याने त्यावर मत व्यक्त करण्यास आपण असमर्थ असल्याचे कुरियन यांनी स्पष्ट करताच तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य सभात्याग करत असल्याचे ओब्रायन यांनी सांगितले व ते बाहेर निघून गेले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28152

Posted by on May 4 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (382 of 2450 articles)


=जी-४ राष्ट्रांची मागणी= संयुक्त राष्ट्रसंघ, [३ मे] - संंयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा आराखडा आता कालबाह्य झाला असल्याचे भारतासह जी-४ च्या ...

×